२००७. २०१३. २०२४. २०२४. चॅम्पियन्सचा चॅम्पियन आपला रोहित शर्मा
हुश्स, कसली जबरदस्त Champions Trophy 2025 Final होती ना!!!
आपल्या गोलंदाजांनी शो सुरू केला आणि नंतर आपल्या रो ने दणादण खेळायला सुरूवात केली. त्यापाठोपाठ आपल्या इतर फलंदाजांच्या अमूल्य योगदानामुळे बारतीय क्रिकेट टीमला इतिहास पुन्हा रचण्याची तसेच विक्रमी तिसरी #ChampionsTrophy जिंकण्याची संधी मिळाली! 🏆
चला तर मग बघूया आपल्या हिटमॅनला, त्या खेळातल्या सामनापटूला आपल्या दणदणीत विजयाबद्दल काय सांगायचे आहे ते. त्याच्या सामन्यानंतरच्या सादरीकरण कार्यक्रमात तो काय काय बोलला ते पाहा.
शेवटच्या सामन्याबद्दल आणि एकूणच स्पर्धेबाबत
खूप छान वाटते आहे. आम्ही या संपूर्ण स्पर्धेत खूप चांगले क्रिकेट खेळलो. आता हा निकाल आमच्या बाजूने लागलाय त्याचा खूप आनंद वाटतोय. आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्याबद्दल मी खूप आनंदी आहे.
ओपनर म्हणून त्याच्या आक्रमक खेळाबाबत
हा माझा नैसर्गिक खेळ नाही परंतु मला हे करायचेच होते. तुम्ही काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला टीमचा पाठिंबा लागतो. ते माझ्यासोबत होते. २०२३ वर्ल्डकपमध्ये राहुल भाई आणि आता गौती भाई. मी वेगळ्या स्टाइलमध्ये मागची अनेक वर्षे खेळलो आहे आणि थोडे वेगळे खेळून काही परिणाम साधता येतो का हे मला पाहायचे होते.
इथे काही काळ खेळल्यानंतर आपल्याला पिच कशी आहे ते कळते. मागच्या काही काळापासून मी पायाचा वापर करतो. मी बादही झालोय. पण मी त्यापासून दूर गेलेलो नाही.
फलंदाजीबाबत टीमच्या खोलीबद्दल
या खोलीमुळे मला स्वातंत्र्य मिळते आणि त्याचा फायदा होतो. जडेजा ८ व्या क्रमांकावर येत असल्यामुळे पहिल्या टप्प्यात जोरदार फलंदाजी करण्याचा आत्मविश्वास मिळतो. माझ्या मनात कल्पना स्पष्ट असेपर्यंत मी खूश असतो.
मधल्या फळीत केएल राहुलच्या खेळाबाबत
तो खूप मजबूत आहे. त्याच्यावर कितीही तणाव असला तरी तो दबावाखाली येत नाही. त्यामुळे आम्ही त्याला मधल्या फळीत आणले. तो फलंदाजी अत्यंत शांतपणे करतो आणि परिस्थितीनुसार योग्य शॉट्स खेळतो. तो हार्दिकसारख्या इतरांना त्यांना हवे तसे खेळण्याचे स्वातंत्र्य देतो.
वरूण चक्रवर्तीचे खूप खूप कौतुक!
त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे हे. तुम्ही अशा पिचवर खेळत असता तेव्हा फलंदाजांनी त्याला अंगावर घ्यावे असे तुम्हाला वाटत असते. नेमके तेव्हाच तो धोकादायक ठरतो. त्याला संघात निवडताना आम्ही हाच विचार केला होता.
त्याने या स्पर्धेत आमच्यासाठी सुरूवात केली नाही. परंतु तो न्यूझीलंडविरूद्ध खेळला आणि पाच विकेट्स घेतल्या तेव्हा त्याची गोलंदाजीची क्षमता आम्ही पाहिली आणि आम्हाला त्याचा जास्तीत जास्त वापर करायचा होता. त्याची गोलंदाजी दर्जेदार आहे आणि सुदैवाने वेगवेगळ्या वेळी आम्हाला त्याचा वापर करता आला.