मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणे हे कायम माझे स्वप्न होते- डेवाल्ड ब्रेविस

“माझे स्वप्न सत्यात उतरले.” 

आयुष्यात मला ज्या काही गोष्टी ऐकायच्या होत्या त्यातली ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. डेवाल्ड ब्रेविसने आपल्या आयुष्यात मारलेले ते जोरदार षटकार आणि त्यातला हा एक आपल्या हृदयात खोलवर आणि आतवर गेला आहे. 

विचार करा. ब्रेविस प्रकाशझोतात आला त्याला एक वर्षही झालेले नाही. त्याने १९ वर्षे वयाखालील विश्वचषकात शिखर धवनचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. त्यामुळे तो सामनावीर ठरला आणि त्यानंतर आपल्या #OneFamily मध्ये एका मोठ्या बोली युद्धानंतर सामील झाला. त्यानंतर त्याने सीएसए टी२० चॅलेंजमध्ये ५७ चेंडूंमध्ये १६२ धावा करून विक्रम मोडीत काढला. हे सर्व त्याने २०२२ मध्ये केले. 

आपण पहिल्यावहिल्या एसए२० साठी टीम निवडण्यासाठी फक्त एक महिना उरला आहे. ब्रेविस आपल्या एमआय केपटाऊन या फ्रँचायझीसाठी खेळेल आणि त्याच्या अपेक्षा खूप आहेत. 

“मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न मी कायम पाहिले आहे आणि आता एमआय केपटाऊनमध्ये मी खेळणार आहे. इथे प्रचंड प्रेक्षकसंख्या असेल. त्यामुळे हे व्यासपीठ खूप मोठे आहे. मला खूप मजा येईल,” असे त्याने एसए२० ने प्रसारित केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

“माझ्या मते ही स्पर्धा खूप मस्त होणार आहे. हे सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिकेत येत आहे. त्यामुळे क्रिकेटचे सामने खूप अटीतटीचे होतील. खूप जास्त स्पर्धा असेल. लोकांनी आता तयारी करायला हवी कारण मैदानात फटक्यांची, चौकार-षटकारांची आतषबाजी होईल आणि खूप विकेट्सही पडतील.” 

ब्रेविस अत्यंत महान खेळाडूंसोबत खेळणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आणखी एक स्वप्न सत्यात उतरणे आहेः कागिसो रबाडा, रस्सी वान देर दुसेन, लियाम लिव्हिंग्स्टन, राशीद खान, सॅम कुर्रन आणि आता जोफ्रा आर्चर. 

“हे खूप मस्त आहे!” असे ब्रेव्हिसने या संधीबद्दल म्हटले. “कोणाशी जाऊन चर्चा करायची, कोणाचा सल्ला घ्यायचा? त्यांच्यासोबत ड्रेसिंग रूम आणि मैदानात एकत्र यायला मी खूप उत्सुक आहे.” 

तो स्वतः अत्यंत सुंदर फॉर्ममध्ये या सीझनमध्ये खेळायला येतोय. त्याच्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. आणि तो आपला आहे! 

आम्हीही स्वप्न पाहतोय, डेवाल्ड! आमची पलटन तुला ब्लू आणि गोल्डमध्ये पुन्हा पाहायला आतूर आहे.