अश्विनच्या चेपॉकवरील प्रेमामुळे भारताला १-० ने सहज विजय

चांगली सुरूवात आपल्याला चांगलं फळ देते! टीम इंडियाने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. त्यांनी रविवार (२२ सप्टेंबर) रोजी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर बांग्लादेशविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यात २८० धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी पहिल्या दिवशीच मैदानात येऊन चॅम्पियन टीमची तग धरून ठेवण्याची क्षमता आणि अनुभव यांचे प्रदर्शन घडवले. त्यानंतर मागे वळून बघण्याचे कारणच नव्हते.

चला तर मग, रोहितच्या टीमने चार दिवसांत कसा खेळ केला ते पाहूया.

अश्विन, जडेजा आणि मजबूत भागीदारी

पहिल्या दिवशी टीम इंडिया १४४/६ मुळे खूप अडचणीत होती. परंतु रवीचंद्रन अश्विन (१३३ चेंडूंमध्ये ११३ धावा) आणि रवींद्र जडेजा (१२४ चेंडूंमध्ये ८६ धावा) हे कसोटी क्रिकेटमध्ये दोघे आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत त्याचे एक कारण आहे.

संघाला अडचणीतून सोडवण्याचा हा त्यांचा पहिला प्रसंग नाही आणि शेवटचाही नाही. या जोडीने पाहुण्या संघाला दिवसभर चेंडूचा पाठलाग करायला लावले. त्यांनी १९९ धावांची मजबूत भागीदारी केली. अश्विन तर ऐकतच नव्हता. त्याने क्लास आणि मास या दोन्ही गोष्टी एकत्र आणून भारताला पहिल्याच इनिंगमध्ये ३७६ धावांपर्यंत पोहोचायला मदत केली. 

बूम बूम पुन्हा आघाडीवर

आपल्या जादूगाराचा खेळ पुन्हा बहरला. बूम बूमच्या आणखी एका घातक गोलंदाजीमुळे (४/५०) बांग्ला फलंदाजांना पळता भुई थोडी झाली होती. सिराज आणि आकाश दीप यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्यामुळे पुन्हा एकदा स्टंप्स हवेत इकडेतिकडे उडत असल्याचे दृश्य होते.

चेन्नईच्या बूम बूमच्या आणखी एका अविस्मरणीय कामगिरीचा अनुभव घेता आला. त्याने हसन महमूदला बाद करून ४०० आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा पार पाडला. त्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा २२७ धावांच्या भल्या मोठ्या पहिल्या इनिंगसह फलंदाजीला उतरला.

तरूण तुर्कांना मैदान मोकळे

त्यानंतर ऋषभ पंत (१०९) आणि शुभमन गिल (११९ नाबाद) या तरूण तुर्कांनी धमाल केली. त्यांनी वीकेंडच्या निमित्ताने गर्दीचे चांगलेच मनोरंजन केले. आपला स्पायडी कधी खेळातून बाहेर पडलाच नव्हता असे वाटत होते. त्याने प्रेक्षकांना भरपूर फटक्यांची मेजवानी दिली.

पंतचा वन हँडेड स्लॉग, रिव्हर्स स्वीप आणि पॅडल स्वीप प्रेक्षकांच्या पसंतीला चांगलाच उतरला. दुसरीकडे गिलने क्लास आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टींचा मेळ घालत मोठमोठे शॉट्स अगदी सहजपणे मारले. त्याने १६७ धावांची आणखी एक मोठी भागीदारी केली आणि ५१५ धावांचे लक्ष्य समोर ठेवले.

बूमने भिंत भेदली आणि ॲशने पाडकाम पूर्ण केले.

त्यांची सुरूवात तर चांगली झाली होती. पण बूम बूम एक्स्प्रेस सुरू झाली ती थांबवण्याचे नावच घेत नव्हती. त्याने झाकीर हुसेनला गलीत बाद केले. त्यानंतर ॲशचा शो सुरू झाला. त्याने दोन दिवसांत तीन सत्रांमध्ये सहा विकेट्स घेतल्या आणि भारतीय प्रेक्षकांच्या नजरेचे पारणे फेडले.

आज आपण १-० ने जिंकलो आहोत. आता घरच्या खेळपट्टीवरचा मोठा सीझन आहे आणि आरामाचा हा जास्तीचा दिवस आपण कानपूरसाठी तयारी करत असताना फायदेशीर ठरेल. आपल्याला या सामन्यात आणखी वर्चस्व गाजवण्याची संधी मिळणार आहे. तर पलटन, स्वीप पूर्ण करूया. चालेल ना?

थोडक्यात धावसंख्या: भारताकडून ३७६ (रवीचंद्रन अश्विन ११३, रवींद्र जडेजा ८६; हसन महमूद ५/८३) आणि २८७/४ दिवस (शुभमन गिल ११९*, ऋषभ पंत १०९; मेहदी हसन मिराज २/१०३) बांग्लादेशचा २८० धावांनी पराभव १४९ (शाकीब अल हसन ३२; जसप्रीत बुमरा ४/५०, रवींद्र जडेजा २/१९) आणि २३४ (नजमुल होसेन शांतो ८२, रवीचंद्रन अश्विन ६/६६, रवींद्र जडेजा ३/५८)