आशिया कप २०२२: हार्दिक पंड्याच्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारताचा पाकिस्तानवर पाच विकेटनी विजय
भारताने आपला पारंपरिक स्पर्धक असलेल्या पाकिस्तानवर पाच विकेटनी विजय प्राप्त करून आशिया कप २०२२ ची उत्साहात सुरूवात केली.
कमी धावांच्या सामन्यात भारताला पाकिस्तानवर विजय प्राप्त करणे हार्दिक पंड्याच्या नाबाद ३३ आणि गोलंदाजीत (३/२५) मुळे शक्य झाले. पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवान हा सर्वोत्तम कामगिरी करणारा फलंदाज ठरला. त्याने ४२ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या तर नव्यानेच आलेल्या मोहम्मद नवाझने पहिल्याच सामन्यात ३/३३ अशी कामगिरी केली.
भारताने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने चाहत्यांना आश्चर्यचकित करत ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकची निवड केली आणि रवीचंद्रन अश्विनला ११ च्या संघाबाहेर ठेवले.
त्याचवेळी पाकिस्तानने नसीम शहाला आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी दिली तर शाहनवाज दहानी हा सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या तीनपैकी एक जलदगती गोलंदाज ठरला.
पहिल्या ओव्हरमध्ये पाकिस्तानने ६/० धावा केल्या. मोहम्मद रिझवानला बाद करण्यासाठी दोन वेळा आवाहन करण्यात आले. परंतु तो बचावला. रिझवानने थर्ड अंपायरकडे विनंती करून एलबीडब्ल्यूचा निर्णय मागे घेतला. कारण चेंडू स्टंपवर आदळला नाही. भारताचा बाहेरील कडेला चेंडू लागण्याचे आवाहनही नाकारले गेले.
पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम सर्वप्रथम बाद झाला. भुवनेश्वर कुमारचा लहान चेंडू त्याच्या बॅटचा वेध घेत शॉर्ट फाइन लेगवर अर्शदीप सिंगकडे गेला.
पॉवरप्लेचा टप्पा ४३/२ वर संपला. पाकिस्तानने आपली दुसरी विकेट ५.५ ओव्हर्सवर गमावली. आवेश खानच्या चेंडूला आपल्या बॅटने हलका स्पर्श केला हे फाखर झमनच्या लक्षात आले आणि चेंडू दिनेश कार्तिककडे गेला. अंपायरने बाद घोषित करण्यापूर्वीच तो पॅव्हिलियनला परतला.
हार्दिक पंड्याने तिसऱ्या विकेटसाठी रिझवान आणि इफ्तिकार अहमद यांच्यातील ४५ धावांची भागीदारी मोडली. पंड्याच्या गोलंदाजीला टोलवण्याचा प्रयत्न करत असताना इफ्तिकारच्या बॅटला चेंडूने स्पर्श केला आणि तो सरळ दिनेश कार्तिककडे गेला.
हार्दिकने मोहम्मद रिझवान आणि खुसदील शहा या आणखी दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. हे दोन्ही चेंडू शॉर्ट बॉल्स होते. भारताने सामन्याच्या पहिल्या सत्रात निर्विवाद वर्चस्व गाजवले.
पाकिस्तानने १४.४ ओव्हर्समध्ये १०० धावांचा टप्पा पार केला.
भुवीच्या तीन विकेट्स आणि अर्शदीप सिंगने डेथ ओव्हर्समध्ये घेतलेल्या दोन विकेट्स यांच्यामुळे भारताला पाकिस्तानला १४७ धावांवर सर्व बाद करणे शक्य झाले.
भारतीय जलदगती गोलंदाजांनी एकाच इनिंमध्ये दहाही विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पहिलाच सामना खेळणाऱ्या नसीम शहाने भारताला मोठा धक्का दिला. त्याचा चेंडू केएल राहुलच्या बॅटच्या आतील कडेला लागला आणि स्टंपवर आदळला. भारतीय संघाची पहिली ओव्हर ३/१ वर संपली.
भारताने आठव्या ओव्हरमध्ये ५० धावा पूर्ण केल्या. परंतु रोहितने मोहम्मद नवाजचा चेंडू चुकीच्या पद्धतीने लाँग ऑफवर फटकावला. इफ्तिकार अहमदने कॅच पूर्ण करून भारतीय कर्णधाराची इनिंग संपुष्टात आणली.
नवाजने आणखी एक अत्यंत महत्त्वाची विराट कोहलीची विकेट घेतली. माजी भारतीय कर्णधाराने लाँग ऑफवर चेंडू फटकावला परंतु तो इफ्तिकारच्या हातात जाऊन विसावला. कोहलीने ३४ चेंडूंवर ३५ धावा केल्या.
नसीमने या दिवसातली आपली दुसरी विकेट सूर्यकुमार यादवच्या रूपात घेतली. या तरूण पाकिस्तानी जलदगती गोलंदाजाने स्कायच्या बॅटिंगच्या टप्प्यातून बॅक ऑफ ए लेंथ चेंडू टाकला आणि त्याचे स्टंप्स उडवले.
शेवटच्या ओव्हरमध्ये सात धावा बाकी असताना नवाझने पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजाला बाद केले. त्याच्या सपाट आणि वेगवान चेंडूने स्टंपवर आदळण्यापूर्वी जडेजाच्या मांडीला स्पर्श केला.
हार्जिक पंड्याने सहाव्या विकेटसाठी महत्त्वाच्या ५२ धावांची भागीदारी केली. त्याने एक जोरदार षटकार ठोकून भारताला विजय प्राप्त करून दिला.
हा विजय प्राप्त करून भारताने आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२१ च्या सामन्यातील १० विकेटने झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आता आशिया कप २०२२ च्या ग्रुप टप्प्यात बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी हाँगकाँगशी सामना करेल.