एमआय अँड इंग्लंडः ब्लू आणि गोल्ड परिधान केलेल्या इंग्लिशमॅनला भेटा
काही क्लासिक्स असतात, मग काही कालातीत क्लासिक्स असतात आणि मग, येतो कसोटी क्रिकेटमधला भारत विरुद्ध इंग्लंड सामना. रेड-बॉल क्रिकेटमधील त्यांच्या पहिल्या सामन्यानंतर 92 वर्षांनी या जगप्रसिद्ध प्रतिस्पर्ध्यांमधली ही नवीन आवृत्ती चाहत्यांना खेळाडूंची ताकद, अफाट शक्ती आणि बुद्धिमत्ता यांचे दर्शन घडवेल.
या स्पर्धेला मुंबई इंडियन्सच्या ओळखीचा स्पर्श आहे. काही ख्यातनाम ब्रिटिश खेळाडूंनी आपला ब्लू आणि गोल्ड पूर्वी परिधान केला आहे. आपण आता भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी मालिकेसाठी सज्ज होत असताना भूतकाळात जाऊन या खेळाडूंची ओळख करून घेऊया.
1. ग्रॅहम नेपियर
एमआयमधील वर्षं: २००९, २०१०
खेळलेले सामने: १
धावा: १५
सर्वाधिक धावसंख्या: १५
विकेट्स: १
सर्वोत्तम आकडेवारी: १/२७
देशांतर्गत वर्तुळात एक उत्तम ओळख असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेल्या क्रिकेटपटूंपैकी एक ग्रॅहम नेपियर हा मुंबई इंडियन्ससोबत करार करणारा पहिला इंग्लिश क्रिकेटपटू होता. पण त्याची निवड लिलावाबाहेर झाली होती. २००८ च्या ट्वेंटी२० कप (आता व्हिटॅलिटी टी20 ब्लास्ट म्हणून ओळखल्या जाणार्या) मालिकेत ससेक्स विरुद्धच्या सामन्यात एसेक्ससाठी त्याने ५८ चेंडूंत नाबाद १५२ धावा केल्या. त्यात विक्रमी १६ षटकारांचा समावेश होता. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला 2009 साठी एमआयसोबत खेळण्यासाठी आणण्यात आले.
या अष्टपैलू खेळाडूने ब्लू आणि गोल्डमध्ये फक्त एकच सामना कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध खेळला. त्यात त्याने 15 धावा करून १/२७ अशी कामगिरी केली. २००९ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड संघात बोलावल्यानंतर तो २०१० च्या सीनियर संघात आणि एमआयसाठी खेळू शकला नाही. पण नेपियरने काउंटी क्रिकेटमध्ये आपला खेळ सुरू ठेवला. त्याने २०१३ मध्ये सरे विरुद्ध यॉर्कशायर बँक ४० या सामन्यात ७/३२ अशी कामगिरी केली. त्यात त्याने चार सलग विकेट्स घेतल्या. ग्रॅहम नेपियरने 2016 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
2. एलेक्स हेल्स
खरेदी किंमत: १ कोटी रूपये (कोरे अँडरसनच्या बदली)
एमआयमधील वर्षः २०१५
खेळलेले सामने: ०
कोरे अँडरसनच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आणि तो वेळेत तंदुरूस्त होऊ शकला नाही. त्यामुळे एमआयने इंग्लिश सलामी फलंदाज एलेक्स हेल्सला अत्यंत कमी कालावधीसाठी साइनइन केले. त्यात अंतिम लीग सामना आणि २०१५ चे आयपीएल सीझनचे प्लेऑफ समाविष्ट होते. ब्लू अँड गोल्डमध्ये येण्यापूर्वी हेल्सने २०१४ टी२० विश्वचषकात आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. तिथे तो टी२०आय क्रिकेटमध्ये शंभर धावा काढणारा पहिला इंग्लिश खेळाडू ठरला. (श्रीलंकेविरूद्ध ११६ नाबाद).
त्याच्यासाठी खेळण्याची संधी कधीच आली नाही. परंतु एलेक्स हेल्सने चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध ४१ धावांनी विजय मिळवून दुसरा किताब जिंकला तेव्हा आयपीएल विजेत्या मेडलचा आनंद घेतला.
3. जो बटलर
खरेदी किंमतः ३.८ कोटी रूपये (२०१६ चा लिलाव)
एमआयमधील वर्षः २०१६, २०१७
खेळलेले सामने: २४
धावा: ५२७
सर्वाधिक धावा: पंजाब किंग्सविरूद्ध ७७ (२०१७)
फलंदाजीची सरासरीः २५.०९
स्ट्राइक रेट: १४५.९८
अर्धशतक: १
शतके: ०
प्रतिस्पर्धी गोलंदाजांना पट्ट्यात घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जो बटलरने मुंबई इंडियन्ससोबत आयपीएल क्रिकेटच्या दिमाखदार जगात प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९४१ धावांचा विक्रम, एकदिवसीय क्रिकेटमधील चार शतके सोबत घेऊन बटलर २०१६ मध्ये फॅ-एमआय-लीमध्ये सामील झाला आणि २०१७ मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकण्यासाठीच्या एमआयच्या खेळात महत्त्वाचं योगदान दिलं.
पंजाब किंग्ज विरुद्धच्या २२ व्या सामन्यात त्याने आपला करिश्मा दाखवला. या इंग्लिश यष्टीरक्षक-फलंदाजाने ३७ चेंडूंत ७७ धावा करून एमआय संघाला १५.३ ओव्हर्समध्ये १५५ धावांचा पाठलाग करण्यास मदत केली. या खेळासाठी त्याला सामनापटू पुरस्कार देण्यात आला. मग त्याच्या क्रमवारीत बदल झाला आणि तो वरच्या क्रमांकावर खेळायला गेला. या कामगिरीमुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी मिळाली!
त्यानंतर बटलर राजस्थान रॉयल्सकडे खेळायला गेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने त्याच्या संघाला २०२२ मध्ये आयसीसी टी२० विश्वचषक मिळवायला मदत केली.
4. टायमल मिल्स
खरेदी किंमत: १.५ कोटी रूपये (२०२२ लिलाव)
एमआयमधील वर्षे: २०२२
खेळलेले सामने: ५
विकेट्स: ६
सर्वोत्तम आकडेवारी: राजस्थान रॉयल्सविरूद्ध ३/३५ (२०२२)
संघातून जाणाऱ्या ट्रेंट बोल्टच्या बदली मुंबई इंडियन्सने डावखुरा टी२० स्पेशालिस्ट टायमल मिल्सला संघात आणले. मिल्सने टी२० च्या १५६ सामन्यांमध्ये १७६ टी२० विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला जसप्रीत बूम बूम बुमरासोबत विकेटस घेण्यासाठी एक खतरनाक जोडीदार म्हणून आणण्यात आले होते.
त्याने ब्लू अँड गोल्ड पाच वेळा परिधान केला आणि सहा विकेट्स घेतल्या. त्याने मुंबईतल्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर एमआय पलटनच्या समोर दिल्ली कॅपिटल्सचा स्टार ऋषभ पंतला घरी पाठवले होते.
5. जोफ्रा आर्चर
खरेदी किंमत: ८ कोटी रूपये (२०२२ लिलाव)
एमआयमधील वर्षे: २०२३
खेळलेले सामने: ५
विकेट्स: २
सर्वोत्तम आकडेवारी: राजस्थान रॉयल्सविरूद्ध १/३५ (२०२३)
आपल्या पिढीतील सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक, जोफ्रा आर्चर हा आयपीएल २०२२ च्या लिलावात खरेदी करण्यात आला. बार्बाडोसमध्ये जन्मलेला हा इंग्लिश जलदगती गोलंदाज आपल्या राजस्थान रॉयल्ससोबतच्या तीन-सीझन्सच्या खेळामुळे या स्पर्धेत आधीच घराघरात नावाजला गेला होता. आयपीएल 2023 मध्ये त्याने आपल्या ब्लू आणि गोल्डमध्ये अधिकृत पदार्पण केले कारण आधीचे वर्षभर तो दुखापतग्रस्त होता.
आयपीएल 2023 मध्ये आर्चर पाच सामने खेळला पण त्याच्या दुखापतीने डोके वर काढले आणि त्याला थांबावे लागले. त्याने त्या काळात ९.५० च्या सरासरीने दोन विकेट्स घेतल्या.
6. ख्रिस जॉर्डन
खरेदी किंमत: २ कोटी रूपये (जोफ्रा आर्चरच्या बदली खेळाडू)
एमआयमधील वर्षे: २०२३
खेळलेले सामने: ५
विकेट्स: ३
सर्वोत्तम आकडेवारी: लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध १/७ (२०२३)
ख्रिस जॉर्डन आपल्या खतरनाक यॉर्कर्ससाठी आणि संघासाठी डेथ ओव्हर्समध्ये सामने जिंकण्याची जिद्द यासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेला गोलंदाज आहे. हे वैशिष्ट्य आणि २०२२ मध्ये तो टी२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता हे लक्षात घेऊन जॉर्डनला बार्बाडोसच्या जोफ्रा आर्चर या इंग्लिश खेळाडूची जागा घेण्यासाठी साइन इन केले गेले.
या इंग्लिश जलदगती गोलंदाजाने आयपीएल २०२३ सीझनमध्ये मुंबई इंडियन्सची जर्सी पाच वेळा घातली आणि १०.७७ च्या सरासरीने तीन विकेट्स घेतल्या.