बटलरपासून जॅक्सपर्यंत – आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणारा एमआय इंग्लंड कॉम्बो!

बीजीटीची जबरदस्त स्पर्धा झाल्यानंतर इंग्लंडविरूद्ध भारताच्या आगामी टी२०आय मालिकेमुळे हवा चांगलीच तापली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वांत लहान स्वरूपातील काही सुपरस्टार्स या स्पर्धेत सहभागी होणार असल्यामुळे उत्साह शिगेला पोहोचणार आहे. आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होण्यासाठी तयार असलेले विल जॅक्स आणि रीस टॉप्ले हे इंग्लिश खेळाडू आपल्याला या वेळी खेळताना दिसतील.

पण भारत आणि इंग्लंडदरम्यान येत्या २२ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या या ब्लॉकबस्टर टी२०आय मालिकेच्या आणखी जवळ जात असताना मागच्या काही वर्षांत आपला देखणा ब्लू अँड गोल्ड पोशाख परिधान करणारे इंग्लिश खेळाडू कोण होते हे पाहूया.

  1. ल्यूक वूड

इंग्लिश क्रिकेटमधला एक डावखुरा जलदगती गोलंदाज. त्याला मुंबई इंडियन्सने २०२४ मध्ये साइन केले आणि त्याला पहिले आयपीएल काँट्रॅक्ट मिळाले. तो ऑस्ट्रेलियन डावखुरा गोलंदाज जेसन बेहरेन्डॉर्फऐवजी खेळायला आला आणि ५० लाख रूपयांच्या मूळ किमतीवर त्याला साइन करण्यात आले.

सीझनच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरूद्ध पहिला आयपीएल सामना खेळला तेव्हा या ब्रिटिश खेळाडूने एकही विकेट न घेता दोनेक ओव्हर्स टाकल्या. तो स्पर्धेत दुसऱ्यांदा खेळायला आला तेव्हा दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध आपण जिंकलो. त्याने गोलंदाजी करताना शाय होपची विकेट घेतली तर फलंदाजी करताना एक महत्त्वाचा षटकार ठोकला.

  1. ख्रिस जॉर्डन

डेथ ओव्हर्समध्ये आपल्या गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस जॉर्डनला जोफ्रा आर्चर या त्याच्या इंग्लिश सहकाऱ्याऐवजी खेळायला आणले गेले. २०२२ मध्ये टी२०आय विश्वचषक जिंकल्यानंतर ख्रिस जॉर्डनला गोलंदाजी मजबूत करण्यासाठी मुंबई इंडियन्सने आपल्याकडे आणले. गोलंदाजीबरोबरच जॉर्डनची फिल्डिंग सुंदर आहे आणि चांगली फलंदाजीही करतो. त्यामुळे तो एक चांगला पर्याय ठरला.

या उजव्या हाताच्या जलदगती गोलंदाजाने आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी ६ सामने खेळले आणि ३ विकेट्स घेतल्या.

  1. जोफ्रा आर्चर

इंग्लिश क्रिकेटमधल्या परंपरागत टॅलेंटचा धनी असलेल्या या खेळाडूने आरआरसाठी दणदणीत कामगिरी केली. त्यामुळे आयपीएल २०२२ मध्ये तो सर्वच संघांसाठी आवडता खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने ही संधी साधली आणि ऑक्शन रूममध्ये दोन इतर टीम्ससोबत लढाई करून या सुपरस्टार जलदगती गोलंदाजाला आपल्याकडे आणले.

परंतु, त्याला २०२२ च्या संपूर्ण सीझनमध्ये दुखापत झाल्यामुळे खेळता आले नाही. तो २०२३ मध्ये आपल्याकडे परत खेळायला आला. पण आणखी एका दुखापतीमुळे त्याचा प्रतिष्ठित ब्लू अँड गोल्डसोबतचा प्रवास संपला. मुंबई इंडियन्ससोबतच्या त्याच्या या छोट्या कालावधीत त्याने २ विकेट्स घेतल्या.

  1. टायमल मिल्स

मुंबई इंडियन्सने २०२२ च्या लिलावात या टी२०आय स्पेशालिस्टला आपल्याकडे आणले. या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाला बाहेर जाणाऱ्या ट्रेंट बोल्टऐवजी जसप्रीत बुमराला गोलंदाजीत पूरक ठरण्यासाठी आणण्यात आले.

त्याने ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऋषभ पंतची विकेट घेऊन अत्यंत सुंदर सुरूवात केली. त्या सीझनमधली त्याची सर्वोत्तम कामगिरी राजस्थान रॉयल्सविरूद्ध होती. त्याने या सामन्यात ३५ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या.

  1. जो बटलर

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करणारा आणि सर्वाधिक यशस्वी इंग्लिश क्रिकेटपटू जो बटलर. या स्फोटक विकेटकीपर फलंदाजाने आयपीएलमध्ये पहिला सामना २०१६ मध्ये खेळला. त्याने आपल्या पहिल्या सीझनमध्ये १४ सामन्यांमध्ये २५५ धावा केल्या. त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे मुंबई इंडियन्सच्या २०१७ मधील हल्ल्यात योगदान दिले. त्याने १० सामन्यांमध्ये १५३.६७ च्या सरासरीने २७२ धावा केल्या. त्याची सर्वांत महत्त्वाची कामगिरी किंग्स XI पंजाबविरूद्ध होती. त्या सामन्यात त्याने फक्त ३७ चेंडूंमध्ये ७७ धावा करताना ५ षटकार आणि ७ चौकार ठोकले. त्याच्या आणि इतर खेळाडूंच्या धमाकेदार खेळामुळे मुंबई इंडियन्सला १९९ धावांचे लक्ष्य फक्त १५.३ ओव्हर्समध्ये पूर्ण करणे शक्य झाले.     

या ब्रिटिश खेळाडूला पुढील सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सने आपल्याकडे घेतले. परंतु २०१७ मध्ये चषक जिंकण्यातील त्याचे योगदान अविस्मरणीय ठरले.

  1. एलेक्स हेल्स

या स्फोटक सलामी फलंदाजाने एमआयसोबत फार कमी वेळ घालवला. त्याला २०१५ च्या चषक विजेत्या सीझनमध्ये कोरी अँडरसनचा बदली खेळाडू म्हणून आणण्यात आले होते. हेल स्टॉर्म म्हणून ओळखला जाणारा हा ब्रिटिश फलंदाज स्पर्धेच्या शेपटच्या टप्प्यात संघात सामील झाला. त्यावेळी एक शेवटचा लीग सामना आणि प्लेऑफ्स बाकी होते. त्या सीझनमध्ये तो कोणत्याही सामन्यात खेळू शकला नाही परंतु सीझनच्या शेवटी त्याला विजेत्याचे मेडल मिळाल्यामुळे तो हे कायम लक्षात ठेवेल.

  1. ग्राहम नेपियर

मुंबई इंडियन्ससाठी सर्वप्रथम साइन करण्यात आलेला इंग्लिश क्रिकेटपटू २००९ मध्ये ग्राहम नेपियर होता. तो आपल्या संघात २ वर्षे होता. तो टीमसाठी फक्त एकदाच सामन्यात खेळला. त्याने मॉन वॅन वाइकची महत्त्वाची विकेट घेऊन कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध सामना जिंकायला मदत केली. त्या सामन्यात सुरूवाताल या उजव्या हाताच्या फलंदाजाने महत्त्वाच्या १५ धावा करून टीमला कठीण धावसंख्या गाठायला मदत केली.

आयपीएल २०२५ मध्ये ब्लू अँड गोल्डमध्ये दिसणारे ब्रिटिश फलंदाज

विल जॅक्सने आवश्यकता असेल तेव्हा फटकेबाजी करू शकणारा एक फलंदाज म्हणून स्वतःचे नाव कमावले आहे. त्याच्या नावावर सध्या आयपीएल खेळाडूकडून (५१ चेंडू) पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक वेगवान शतक केल्याचा विक्रम आहे. त्याने हा विक्रम मागील वर्षी गुजरात टायटन्सविरूद्ध आरसीबीसाठी खेळताना केला. हा इंग्लिश फलंदाज अष्टपैलू खेळाडू मैदानात मार्च महिन्यात पाच वेळा विजेत्या संघासाठी उतरेल तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे लागलेल्या असतील.

लिलावादरम्यान मुंबई इंडियन्ससाठी आणखी एक महत्त्वाची खरेदी म्हणजे रीस टॉपले होता. हा ६ फूट ७ इंच उंचीचा डावखुरा जलदगती गोलंदाज आयपीएलमध्ये खेळ सुरू होईल तेव्हा महत्त्वाचा ठरेल. टॉपलेने आपल्या टी२० करियरमध्ये आतापर्यंत २२.८५ च्या सरासरीने २२८ विकेट्स घेतल्या आहेत. या ब्रिटिश खेळाडूने लॉर्डसवर भारताविरूद्ध झालेल्या ओडीआय सामन्यात ३४ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या आणि सर्वोत्तम कामगिरी केली. मुंबई इंडियन्स या सीझनमध्ये सहाव्या वेळी ट्रॉफी उचलण्यासाठी उत्सुक असताना एमआय पलटनला या अनुभवी जलदगती खेळाडूकडून खूप आशा असतील.

खेळाडूचे नाव

एमआयमधले सीझन्स

सामने

धावा/ विकेट्स

ल्यूक वूड

२०२४

१ विकेट

ख्रिस जॉर्डन

२०२३

३ विकेट्स

जोफ्रा आर्चर

२०२३

२ विकेट्स

टायमल मिल्स

२०२२

६ विकेट्स

जो बटलर

२०१६, २०१७

२४

५२७ धावा

एलेक्स हेल्स

२०१५

डीएनबी

ग्राहम नेपियर

२००९, २०१०

१५ धावा