मला ही टीम आवडतेः रोहित शर्माने सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी चाहत्यांचे आभार मानले

टाटा आयपीएल २०२२ हा आमच्यासाठी सोपा प्रवास नव्हता. आम्ही या सीझनचे पहिले आठ सामने हरलो आहोत. आमच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे.

कर्णधार रोहित शर्मा याने या कठीण सीझनचा सामना केला आणि त्याची टीमसाठीची वचनबद्धता कधीही संपणार नाही याची आम्हाला खात्री दिली.

“आम्ही या सामन्यात आमची सर्वोत्तम कामगिरी केलेली नाही. परंतु हे घडते. अनेक मोठे खेळाडू या परिस्थितीतून गेले आहेत. परंतु मला ही टीम आणि येथील वातावरण आवडते,” रोने सोशल मीडियावर सांगितले.

त्याने चाहत्यांचे आणि व्यवस्थापनाचे कठीण काळात सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी आभार मानले.

“आमच्या हितचिंतकांचेही आभार. त्यांनी आतापर्यंत या टीममध्ये आपली निष्ठा आणि एकनिष्ठता दाखवली आहे,” असे त्याने सांगितले.

टीमचे व्यवस्थापन- Mrs. Nita Ambani आणि Akash Ambani आणि क्रिकेट ऑपरेशन्स डायरेक्टर Zaheer Khan आणि महान खेळाडू Sachin Tendulkar – यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले आहे.

आमची सर्वांत मोठी सपोर्ट सिस्टिम- आमची पलटन- आमच्यासोबत या सर्व काळात आपल्या उत्साहाने आम्हाला प्रोत्साहित करते आहे आणि काल रात्री वानखेडेवर आमचे पुनरागमन तिने आणखी खास बनवले आहे.

पलटनने सोशल मीडियावर आपला पाठिंबा सतत कायम ठेवला आहे. त्यामुळे आम्ही पुढे जात राहिलो आणि आम्हाला या सीझनमध्ये नवीन ऊर्जा मिळालीय.

पलटन, आम्हाला माहित्ये की सीझन अपेक्षित होता तसा झालेला नाही.

कर्णधार रो म्हणाला तसे अनेक मोठ्या खेळाडूंना या कठीण कालावधीचा सामना करावा लागतो आणि आम्ही याच परिस्थितीतून जातोय.

खात्री बाळगा, आम्ही पुन्हा जोरात उसळी मारून येऊ. आम्ही हे कायम करत आलोय. कठीण काळ टिकत नाही परंतु कठीण लोक टिकतात. इतर सामन्यांमध्ये जोरात प्रयत्न करूया!