CT25 फायनल | INDvNZ: आपण चॅम्पियन्स आहोत!!!
ता. क.: आमचा आत्मविश्वास इतका जबरदस्त आहे की एडमिनने सामना सुरू होण्यापूर्वीच हेडलाइन लिहिली!!! 😎
… आणि आमच्या मेन इन ब्लूनी १.४ अब्ज भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. आपली विक्रमी तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून चषक घरी आणला! 🇮🇳
या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास आपल्या स्पिनर्सनी प्रतिस्पर्धी संघावर पहिल्या इनिंगमध्ये जाळे विणले आणि त्यांना ५० ओव्हर्समध्ये २५१/७ वर रोखले.
मग धावांच पाठलाग करताना आपला लाडका मुंबईचा राजा त्यांच्या गोलंदाजीवर स्वार झाला आणि जबरदस्त, तडाखेबाज ७६ धावा फटकावून मुंबईचे पाणी त्यांना चाखवले. 💙
हुश्श. सारांश संपला. आता एक्शन बघूया …
कूलदीपची हॉट बॉलिंग!
दुबईच्या उष्ण वातावरणात विकेट्स घेऊन वातावरण कूल कसे ठेवायचे हे यादवजींना नक्कीच माहीत आहे.
किवीजचा स्कोअरबोर्ड पॉवरप्लेच्या शेवटी ६९/१ वर होता तेव्हा कुलदीपला धावा थांबवण्यासाठी आणले गेले. पहिल्याच चेंडूवर विकेट पडली, धोकादायक दिसणारा रचिन रवींद्र (२९ चेंडूंमध्ये ३७ धावा) तात्काळ पॅव्हिलियनला परतला. 👏
नंतरच्या ओव्हरमध्ये या डावखुऱ्या स्पिनरने केन विल्यमसनला बाद केले. तो फारसा त्रास न देता घरी परतला. तोडून टाकलंस भावा कुलदीप!
वरूण चक्रवर्तीचे चक्रव्यूह!
आपल्या पहिल्या विकेटनंतर या जादुई स्पिनरला इनिंगच्या दुसऱ्या टप्प्यात आणले गेले. त्याने ५२ चेंडूंमध्ये ३४ धावा करणाऱ्या ग्लेन फिलिपला बाद केले.
खेळपट्टी थोडी संथ झाल्यामुळे धावा करणे जरा कठीण वाटत होते. शिवाय भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला जराही संधी मिळूच दिली नाही. 💪
३८ ओव्हर्स झाले तेव्हा धावसंख्या १६५/५ वर होती.
डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल यांनी न्यूझीलंडला सावरले
भारताविरूद्ध जबरदस्त रेकॉर्ड असलेल्या या उजव्या हाताच्या फलंदाजाने आधीच्या तीन ओडीआयमध्ये दोन शतके नोंदवली होती. आजच्या सामन्यात तो पुन्हा एकदा लयीत आला होता.
त्याने १०१ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या आणि फक्त तीन चौकार मारले. परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे आणि कठीण टप्प्यात मार्ग कसा काढायचा हे या ३३ वर्षीय खेळाडूने दाखवून दिले.
परंतु, ४६ व्या ओव्हरमध्ये मो. शामीच्या गोलंदाजीवर आपल्या रोने त्याची कॅच घेतली आणि त्यांचा सूर बिघडवून टाकला.
मिशेलचा जोडीदार मायकेल ब्रेसवेल यानेही नाबाद अर्धशतक नोंदवले. त्याने ४० चेंडूंमध्ये आक्रमक ५३ धावा केल्या. त्यात तीन चौकार आणि दोन षट्कार समाविष्ट होते.
या दोघांच्या खेळामुळे न्यूझीलंडला आपल्या ५० ओव्हर्सच्या कोट्यात २५१/७ धावा करता आल्या.
रोहितचा निस्ता राडा!
घाबरायची काय बात, जेव्हा हिटमॅनची आहे साथ… 🤝
धावांचा पाठलाग करताना दुसऱ्याच चेंडूवर आपले इरादे जाहीर करताना भारतीय कर्णधाराने चमत्कार केल्यासारखा एक उत्तुंग षट्कार ठोकला.
नंतर त्याने मागे वळून बघितलेच नाही. संपूर्ण मैदानात त्याने टोलवलेले बॉल सैरावैरा पळत होते आणि सीमारेषांना जाऊन धडकत होते. त्याने 👇 तूफानी षट्कार तर मारलाच पण आपल्या ७६ धावाही पूर्ण केल्या.
दरम्यान शुभमन गिलने एका शहाण्या जोडीदारासारखे त्याला पाठिंबा दिला. या दोघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची पहिली शतकी भागीदारी नोंदवली. सोन्याच्या शहरात सोन्यासारखी कामगिरी करणारे आमचे सोन्यासारखे खेळाडू! 🔥
पण ही भागीदारी मोडण्यासाठी काहीतरी खास होणारच होते. तेव्हा आला ग्लेन फिलिप्सचा एक ब्लाइंडर. त्याने शुभमन गिलला पॅव्हिलियनला पाठवले. ९ ओव्हर्स झाले तेव्हा भारतीय संघ १०६/१ वर होता.
अय्यर, अक्षरने नौका स्थिरावली
विराट कोहली आणि श्रेयस अय्यर एकामागून एक पटापट बाद झाल्यामुळे भारतीय तंबूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी परिस्थिती ताब्यात घेतली आणि ६१ धावांची स्थिर भागीदारी केली.
अय्यर ४८ धावांवर असताना कॅच सुटल्यामुळे वाचला. बापूने २९ धावा केल्या आणि सामना ४२ व्या ओव्हरमध्ये कोणत्या दिशेला जाईल याची खात्री राहिली नाही.
आमच्या उरात होतंय धक धक रं...
४८ चेंडूंमध्ये ४९ धावा. केएल आणि एचपी मध्ये उभे आहेत. काळीज उडून हातात येईल की काय अशी परिस्थिती आहे.
याच्यासाठी शांतता व संयमाची गरज असते आणि या दोघांनी नेमके हेच केले.
लवकरच, आपल्याला ३० चेंडूंमध्ये ३२ धावा हव्या होत्या. या दोन्ही खेळाडूंनी मारलेल्या चौकारांमुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हा आहे क्रिकेटचा वारसा!!!
१२ चेंडूंमध्ये ७ धावा हव्या आहेत. नखे खाऊन संपली आहेत. आणि मग तो क्षण येतो.
जड्डूने विजयी धावा केल्या आणि सगळे भारतीय आपापल्या सोफ्यांवरून उडाले. त्यांनी जल्लोष सादरा केला. होळीच्या आधीच दिवाळी साजरी झाली कारण दुबईत आपण विजयी झालो होतो!!!
थोडक्यात धावसंख्या: न्यूझीलंडचा भारताकडून चार विकेट्सनी पराभव. न्यूझीलंड २५१/७ (डेरिल मिशेल ६३; कुलदीप यादव २/४०) भारत २५४/६ (रोहित शर्मा ७६; मायकेल ब्रेसवेल २/२८).