भारताचा डब्ल्यूटीसी २०२३-२५ चा राजमार्ग: कमॉन भावांनो, फायनलमध्ये जागा पक्की करूया!

भारतीय क्रिकेट टीम आणि चाहत्यांसाठी हे चार महिने खूप धमाल असणार आहेत कारण मेन इन ब्लू घरच्या खेळपट्टीवर आणि परदेशातही दहा कसोटी सामने खेळायला सज्ज आहेत. भारत ३० वर्षांपेक्षा जास्त अंतराने ऑस्ट्रेलियामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे उत्साह शिगेला पोहोचला आहे. 

भारतीय संघ सध्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप्स २०२३-२५ च्या गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या कसोटी सामन्यांदरम्यान चांगली कामगिरी झाल्यास भारतीय टीमला जून २०२५ मध्ये खेळल्या जाणाऱ्या डब्ल्यूटीसीच्या सलग अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळेल.

आपण टीम इंडियाला अभूतपूर्व गोष्ट करण्यासाठी चीअर अप करत आहोत. त्याचवेळी मेन इन ब्लूचा जुलै २०२३ मध्ये सुरू झालेल्या विद्यमान चक्रातील सर्वांत मोठ्या स्वरूपात प्रवास आपण पाहूया.

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज, पहिला कसोटी सामना जुलै २०२३

जुलै २०२३ मध्ये कॅरेबियनमध्ये भारताची डब्ल्यूटीसी मोहीम आणि तरूण यशस्वी जैस्वालच्या कसोटी करियरची एकत्रच सुरूवात झाली. पहिल्याच कसोटी सामन्यात सामनापटूचा किताब मिळवणे ही खूप खास गोष्ट आहे. जैस्वालने हे स्वप्न आपल्या १७१ धावांच्या संयमी आणि सामना जिंकवून देणाऱ्या खेळाद्वारे साध्य केले.

या हिटमॅनने एक शतक पूर्ण करून नेतृत्व केले आणि रवीचंद्रन अश्विनने १२ विकेट्स घेऊन विंडीजभोवती जाळे विणले. त्याचा परिणाम? एक इनिंग आणि १४१ धावांनी दणदणीत विजय.

**********

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज, दुसरा कसोटी सामना जुलै २०२३

विराट कोहलीने आपल्या दणदणीत शतकाद्वारे या बरोबरीत सुटलेल्या सामन्यात भारताला एक मोठी पहिल्या इनिंगची धावसंख्या उभारून दिली. कॅप्टन रोने दोन्ही इनिंग्समध्ये एकामागून एक अर्धशतके पूर्ण करून मागच्या सामन्यात जिथे थांबला होता तिथून सुरूवात केली. रो आणि पॉकेट डायनॅमो ईशान किशन या जोडीने पलटनचे धमाल अर्धशतकांनी मनोरंजन केले. परंतु शेवटच्या दिवशी पावसाने हा सामना चोरला.

भारताने कॅरेबियनमध्ये मालिकेत १-० ने विजय मिळवून नवीन डब्ल्यूटीसी चक्रात आपली पहिली मोहीम पूर्ण केली.

**********

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला कसोटी सामना, डिसेंबर २०२३

या सुंदर देशात आपली पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या आशेने भारतीय टीमने आफ्रिकन सफारीमध्ये खूप प्रयत्न केला. केएल राहुलचे धाडसी शतक (१०१) आणि विराट कोहलीची दमदार कामगिरी (७६) पुरेशी पडली नाही कारण दक्षिण आफ्रिकेने भारताला पहिल्या कसोटीत मोठा विजय मिळवून मागे ढकलले.

बूम बूमची अप्रतिम गोलंदाजी (४/१६) राहुल आणि कोहलीच्या फलंदाजीसोबत लक्षवेधी ठरली.

**********

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका, दुसरी कसोटी, जानेवारी २०२४

या सामन्यात जबरदस्त कमबॅक झाला. २०२१ मध्ये ब्रिस्बेन आणि २०२४ मध्ये केपटाऊन. टीम इंडियाने स्टाइलमध्ये मालिकेत बरोबरी करण्यासाठी पहिला सामना जिंकला आणि तोही विक्रमी वेळेत. उत्तम निकाल देणारा हा सर्वांत लहान कसोटी सामना ठरला.

पहिल्या इनिंगमध्ये मोहम्मद सिराज आणि दुसऱ्या इनिंगमध्ये बूम बूम यांनी सहा विकेट्सची कामगिरी करून यजमान संघाच्या फलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. प्रेक्षकांनी ही कामगिरी पुन्हा पुन्हा पाहिली. भारताने या दौऱ्यात मोठा विजय मिळवला आणि डब्ल्यूटीसी चक्रात महत्त्वाचे गुणही मिळवले.

**********

भारत विरूद्ध इंग्लंड, पहिला कसोटी जानेवारी २०२४

बहुप्रतीक्षित भारत इंग्लंड मालिका अनपेक्षित पद्धतीने सुरू झाली. यजमान संघाने मेन इन ब्लूला २८ धावांनी विजय मिळवून धक्का दिला. ऑली पोपच्या दुसऱ्या इनिंगमधल्या अप्रतिम खेळामुळे (१९६) त्यांना हे शक्य झाले.

बूम बूमच्या अप्रतिम खेळामुळे (४/४१) भारतीय संघाला मात्र घरच्या खेळपट्टीवर दुर्मिळ पराभव पत्करावा लागला.

**********

भारत विरूद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना फेब्रुवारी २०२४

चॅम्पियन संघ पराभवाच्या छायेत असताना कायम आपण नेमके काय करू शकतो हे दाखवतो. भावांनो, हा सामना कसला दणदणीत होता! टीम इंडिया दुसऱ्या कसोटी मालिकेत १०६ धावांसह परतली आणि पहिल्या सामन्यातला पराभव फारसा महत्त्वाचा नव्हता हे दाखवून दिले.

आपला लाडका बूम बूम (६/४५ आणि ३/४६) या वादळी कमबॅकचा हिरो होता. भारतीय पिचवर कोणत्याही जलदगती गोलंदाजाने केलेला हा सर्वोत्तम खेळ होता. ऑली पोपला बाद केल्यानंतर त्याने ठोकलेली आरोळी आपल्या आठवणीत कायम राहील. यशस्वी जैस्वालने आपला उत्तम फॉर्म कायम ठेवत भारतासाठी पाचव्याच कसोटी सामन्यात पहिले द्विशतक पूर्ण केले.

**********

भारत विरूद्ध इंग्लंड, तिसरा कसोटी सामना, फेब्रुवारी २०२४

पहिल्या दिवशी सकाळी भारतीय संघ ३३/३ वर असातना कर्णधार रो (१३१) आणि रवींद्र जडेजा (११२) यांनी टीमला पुढची अनेक वर्षे स्मरणात राहील असा खेळ करून पराभवातून बाहेर काढले. जैस्वालने दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडला सलग दुसरे द्विशतक ठोकून बेझबॉलची भारतीय आवृत्ती दाखवली.

सरफराज खानने पहिल्याच सामन्यात दोन्ही इनिंग्समध्ये अर्धशतके केली आणि जडेजाने दुसऱ्या इनिंगमध्ये घातक गोलंदाजी केली. त्यामुळे भारतीय संघाने ४३४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

**********

भारत विरूद्ध इंग्लंड, चौथा कसोटी सामना, फेब्रुवारी २०२४

टीम इंडियाचे अप्रतिम कमबॅक रांचीमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यातही कायम राहिले. या सामन्यात त्यांनी पाच विकेट्सनी विजय मिळवला. चौथ्या इनिंगमध्ये हिटमॅनच्या तूफानी फलंदाजीने (८१ चेंडूंमध्ये ५५ धावा) कठीण पाठलागासाठी एक मजबूत पाया रचला.

ध्रुव जुरेलने मागच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. या सामन्यात त्याच्या टॅलेंटला पुरेपूर वाव मिळाला. एवढेच नाही तर त्याने दोन्ही इनिंग्समध्ये ९० आणि नाबाद ३९) केलेल्या सुंदर खेळामुळे त्याला सामनापटूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दिग्गज स्पिनर रवीचंद्रन अश्विननेही सहा विकेट्सच्या कामगिरीद्वारे मज्जा केली.

**********

भारत विरूद्ध इंग्लंड, पाचवा कसोटी सामना, मार्च २०२४

धर्मशालामध्ये झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व गाजवले. आपण या सामन्यात एक इनिंग आणि ६४ धावांनी विजय मिळवून तीन दिवसांत ४-१ अशी बाजी मारली. कॅप्टन रो आणि शुभमन गिल यांनी दुसरे शतक नोंदवून इंग्लंडच्या अडचणीत भर टाकली.

या वेळी कुलदीप यादवने सामन्यात ७/१२२ असा इंग्लिश फलंदाजांचा सुपडा साफ केला. अश्विनने मालिकेत दुसरे अर्धशतक नोंदवून सामना नऊ विकेट्ससोबत पूर्ण केला.

यशस्वी जैस्वाल आणि रवीचंद्रन अश्विन हे दोघे ७१२ धावा आणि २६ विकेट्ससह लीडरबोर्डवर टॉपवर होते. भारताने या सामन्यात आणखी एक अविस्मरणीय असा विजय नोंदवला.