INDvENG, पहिला ओडीआय सामना: भारताच्या अप्रतिम खेळामुळे १-० ने विजय!
भारतीय क्रिकेट संघाने २०२५ च्या इंग्लंडच्या भारतीय दौऱ्यातील ओडीआय टप्प्यात चार विकेट्सनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडने जो बटलर आणि जेकब बेथेलच्या अर्धशतकांमुळे २४८/१० धावा केल्या. भारतीय संघाने त्यांचा पाठलाग ३९ ओव्हर्समध्ये सहजपणे केला.
पहिल्या ओडीआय सामन्याचा थोडक्यात वृत्तांत:
जैसू आणि हर्षित राणा यांचे पहिले ओडीआय सामने!
🔊 कर्णधार रो आणि मोहम्मद शामी यांनी या तरूणांना कॅप्स देताना प्रेरणा दिली.
**********
…आणि मग बेन डकेटला बाद करायला एकत्र आले!
यशस्वी जैस्वालने अप्रतिम कॅच पकडला आणि जलदगती गोलंदाज हर्षित राणाला आपली पहिली ओडीआय विकेट मिळाली. याला म्हणतात धमाकेदार एंट्री! 🔥
इंग्लंड – ७७/२ (९.३ ओव्हर्स)
**********
अक्षरच्या बॉलिंगवर पांड्याचा कॅच = धोकादायक जो बटलर पॅव्हिलियनला परतला!
पॉवर प्लेच्या शेवटी इंग्लंडच्या कर्णधाराने ६७ चेंडूंमध्ये ५२ धावा करून आपल्या संघाला स्थिर केले. परंतु तो लगेचच बाद झाला. 😏
इंग्लंड – १७०/५ (३३ ओव्हर्स)
**********
मोहम्मद शामीची कमबॅक विकेट!
तब्बल ४४५ दिवसांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये कमबॅक करताना आपल्या उजव्या हाताच्या जलदगती गोलंदाजाने क्लासिक मोहम्मद शामी स्टाइलमध्ये ब्रायडन कार्सला बाद केले आणि आयसीसी वर्ल्ड कप २०२३ नंतर आपली पहिली ओडीआय विकेट घेतली.
इंग्लंड – २०६/७ (३९.५ ओव्हर्स)
**********
पाहुणा संघ २५० धावांमध्ये गारद!
हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांच्या तीन विकेट्समुळे इंग्लंडला फक्त २४८ धावा करता आल्या. ७५/१ वरून २४८ सर्व बादपर्यंतची त्यांची गोलंदाजी वाखाणण्याजोगी होती! 💪
इंग्लंड - २४८/१० (४७.४ ओव्हर्स)
**********
श्रेयसची दणदणीत इनिंग
धावांचा पाठलाग करताना १९/२ वर श्रेयस अय्यर आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकून घेतले सारे.
या उजव्या हाताच्या फलंदाजाने फक्त ३० चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करताना आठ चौकार आणि दोन उत्तुंग षट्कार ठोकले. त्याच्या या परिपक्व खेळामुळे टीमला सुरूवातीच्या धक्क्यातून सावरायला मदत झाली.
भारत - ११३/३ (१६ ओव्हर्स)
**********
एक सुंदर खेळी, बापूची कमाल बॅटिंग!
शुभमनच्या ८७ धावांनी आपली नौका सावरायला मदत झाली तर अक्षर पटेलने आपले तिसरे ओडीआय अर्धशतक झळकवले. त्याने एकाच वेळ बचाव आणि हल्ल्याचा मेळ साधला.
परंतु तो ५२ धावांवर बाद झाला. आदिल राशीदने अप्रतिम गोलंदाजी करत आपली पहिली विकेट घेतली.
भारत - २३५/६ (३६.२ ओव्हर्स)
त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये भारतीय संघाने खेळ गुंडाळला. रवींद्र जडेजाने ३९ व्या ओव्हरमध्ये फिनिशिंग टच दिला आणि ओडीआय मालिकेची विजयी सुरूवात केली. 💙
थोडक्यात धावसंख्या: इंग्लंडचा भारताकडून ४ विकेट्सनी पराभव. इंग्लंड २४८/१० (जो बटलर ५२; हर्षित राणा ३/५३, रवींद्र जडेजा ३/२६) भारत २५१/६ (शुभमन गिल ८७, श्रेयस अय्यर ५९; साकीब महमूद २/४७).