10 वर्षांचे आव्हान: आपली २०१३ ची विजयी बॅच माहितीय का कुठेय ते.
चषकांवर धूळ बसते पण आठवणींवर कधीच नाही. बरोबर १० वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये आपण विजयी ठरलो आणि यंदा या विजेतेपदाचा १० वा वर्धापनदिन आपण साजरा करत आहोत.
एक संघ म्हणून क्रिकेटमधील उत्तमोत्तम गुणवत्ता असलेले खेळाडू आपल्या संघाचा भाग होते. त्यात २०१३च्या आयपीएल हंगामाने एमआयची लीग सिल्व्हरवेअरची पाच सीझनची प्रतिक्षा संपवली नाही तर एमआयच्या भविष्यातल्या यशाचा पायाही रचला होता. २०१३ मधील संघातील कालानुक्रमे होणारे बदलही महत्त्वाचे ठरले. रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, धवल कुलकर्णी सारख्या खेळाडूंनी सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंगसारख्या ज्येष्ठ व अनुभवी खेळाडूंचा कित्ता गिरवला आणि रिझल्ट काय? तर थेट विजेतेपद खिशात..
तर ११ खेळाडू असलेल्या या विजयी संघातील खेळाडू सध्या कुठे आहेत? ते काय करत आहेत? ते पाहूया.
रोहित शर्माः हा क्रिकेटमधला एक महत्त्वाचा व गुणवान खेळाडू तुम्हाला माहितीच आहे. वयाच्या २५ व्या वर्षी मिडसीझनमध्ये रोहित संघात आला होता व त्याच्यानंतर त्याने प्रत्येक सिझनमध्ये विक्रमाचे डोंगर रचत नेले. आज २०२३ मध्येही रोहित शर्मा एका उंचीवर आपले स्थान राखून आहे. आयपीएलच्या या प्रवासात त्याने चार सीझनचे विजेतेपदही मिळवले आहे.
कायरन पोलार्डः २०१३च्या आयपीएल सीझनमध्ये ‘लॉर्ड’ कायरन पोलार्ड हा ‘ए स्टार परफॉर्मर’ होता. या एकाच सीझनमध्ये कायरनने ४२० धावा केल्या होत्या. प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाची धुलाई त्याने केली होती. शिवाय अप्रतिम गोलंदाजी करत १० विकेटही मिळवल्या होत्या. असा वेस्ट इंडिजचा गुणवान कायरन यंदा २०२३मध्ये मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच म्हणून काम पाहतोय. कायरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आयपीएलमधून निवृत्ती जरी पत्करली असली तरी टी२० लिगमध्ये तो अजूनही खेळत आहे. एक फिनिशर म्हणून त्याची कामगिरी यादगार आहे.
सूर्यकुमार यादवः २०१३मध्ये ‘आपला दादा’ सूर्या संघात होता पण त्या वेळी त्याने एकही सामना खेळला नव्हता. पण हा खेळाडू ‘पर्पल पॅच’मधून जात होता. २०१८मध्ये तो मुंबई इंडियन्सच्या संघात पुन्हा आला आणि आता तो टी-२०मध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणला जातो. शिवाय सर्व प्रकारच्या फलंदाजीसाठीही त्याचे नाव आदराने घेतले जाते. २०२३च्या ब्लू आणि गोल्डमध्ये तो केवळ ऑरेंज कॅप घालू शकतो.
जसप्रीत बुमराः ‘बूम बूम’ बुमराचे आयपीएलमध्ये आगमन धडाक्यात झाले होते. २०१३च्या आयपीएल सीझनमध्ये याने विराट कोहलीला चकवले होते. त्याने केवळ दोन सामने खेळले पण या दोन सामन्यात त्याने तीन विकेट घेतल्या होत्या व संघाला फायदा करून दिला होता. हा खेळाडू यंदाचे विजेतेपद मिळवून देण्यास महत्त्वाचा ठरेल असे वाटते. जसप्रीत बुमरा हा मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी फळीचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. या गुणी खेळाडूने आजपर्यंत झालेल्या १२० सामन्यामध्ये १७० विकेट घेतल्या आहेत.
सचिन तेंडुलकरः लिटल मास्टर सचिन तेंडुलकरचा २०१३चा आयपीएल सीझन हा अखेरचा होता. क्रिकेटमधील या महान खेळाडूने १४ सामन्यात २८७ धावा घेतल्या होत्या. २०१३ साली मुंबई इंडियन्सला मिळालेले विजेतेपद हे सचिनच्या निवृत्तीला दिलेला काव्यगत न्याय म्हणावा लागेल. आणि आता सचिन आमच्या संघाचा आयकॉन, मार्गदर्शक आणि सर्वात मोठ्या चीअरलीडर्सपैकी एक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावेल. जेव्हा मुंबई इंडियन्स मैदानात उतरते तेव्हा सचिनची उपस्थिती जाणवते. काही जण म्हणतात, त्याप्रमाणे ही सचिनची मुंबई आहे आणि ती त्याचीच राहणार.
रिकी पॉटिंगः २०१३च्या पहिल्या सीझनमध्ये या गुणवान ऑस्ट्रेलियन खेळाडूला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी निवडण्यात आले होते. पण सुरुवातीच्या सामन्यात त्याला फारशी छाप पाडता आली नाही परिणामी त्याने कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले. रिकीला कामगिरीत अपयश आले असले तरी पुढच्या एडिशनमध्ये तो संघाचा कोच म्हणून रुजू झाला. एक खेळाडू व कोच अशा भूमिकेत आयपीएल विजेतेपद मिळवणारा तो तिसरा खेळाडू आहे, हे विसरता कामा नये. २०१८ पासून रिकी दिल्ली कॅपिटल्सच्या हॉट सीटवर आहे. आता तो पाचव्या सीझनमध्ये आमच्या संघाचा बॉस आहे.
हरभजन सिंगः ‘टर्बनेटर’ म्हणून ओळखला जाणारा हा महान गोलंदाज २०१३ पासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. त्याने त्या सीझनमध्ये १९ सामन्यात २४ विकेट घेतल्या. हरभजनच्या ऑफस्पीनने भल्या भल्या खेळाडंची भंबेरी उडवली आहे. विशेषतः त्याचा ‘दुसरा’ हा अविश्वसनीय असा आहे. २०२१मध्ये हरभजनने निवृत्ती पत्करली. त्याने राजकारणासारख्या संघर्षमय जगात प्रवेश केला पण त्याचे खेळावरील प्रेम तसेच कायम राहिले. तो टीव्हीवर समालोचक व विश्लेषक म्हणून हिंदी व इंग्रजी भाषेत काम करतो.
मायकेल जॉन्सनः २०१३च्या एडिशनमध्ये मायकेलने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. मायकेलच्या गोलंदाजीपुढे सर्वच संघाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या होत्या. २०१३ व २०१७च्या मुंबई इंडियन्सच्या विजेता संघात तो होता. ४१ वर्षांचा हा खेळाडू ‘एबीसी’ रेडिओसाठी समालोचन करत असून तो ‘लिजंड्स क्रिकेट लीग’ही खेळत आहे.
लसिथ मलिंगाः मुंबई इंडियन्सच्या इतिहासात सर्वोत्तम गोलंदाज म्हणून मलिंगाचे नाव नोंदले गेले आहे. २०१३च्या आयपीएल सीझनमध्ये या गुणी गोलंदाजाने २० विकेट घेतल्या होत्या. भेदक अशा इनस्वींग गोलंदाजीमुळे तो क्रिकेटमधला सर्वात धोकादायक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आपल्या गोलंदाजीचे कसब त्याने जसप्रीत भुमराहला शिकवले आहे. मलिंगा सध्या राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक कुमार संगकारासोबत कार्यरत आहे.
ड्वेन स्मिथ: स्मिथ हा आक्रमक फलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची आक्रमकता त्याने १८ सामन्यांमध्ये ४१८ धावा कुटून दाखवली आहे. गेल्या काही वर्षांत अनेक T20 फ्रँचायझी लीगमध्ये तो खेळत आहे. चौफेर चौकार आणि षटकार फटकावण्याची त्याची कॅरेबियन शैली अनेकदा पाहायला मिळाली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये नैरोबी T20 स्पर्धेत ‘हरी ओम टायटन्स’सोबत तो जोडला आहे.
दिनेश कार्तिकः २०१३ सालच्या मुंबई इंडियन्सच्या तगड्या फलंदाजांच्या यादीत हा खेळाडू गणला जात होता. त्यावेळी या खेळाडूने १९ इनिंग्जमध्ये ५१० धावा केल्या होत्या. आपल्या दमदार शैलीने त्याने दिल्ली (२०१४), बंगळूर (२०१५, २०२२ ते आज), गुजरात (२०१६-१७), कोलकाता (२०१८-२१) असा स्वतःचा चाहता वर्गही तयार केला आहे. दिनेश यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीचा एक भाग असेल. दिनेश उत्तम फलंदाज आहेच पण तो समालोचनही उत्तम करतो.
अंबाती रायुडूः दिनेश कार्तिकची छाप असलेला खेळाडू म्हणजे अंबाती रायडू. मुंबई इंडियन्सच्या मीडल ऑर्डरमधील हा प्रमुख फलंदाज. किरॉन पोलार्ड सोबत याचे नाव घेतले जाते. ३७ वर्षांचा हा खेळाडू २०१८ पासून सीएसके संघाचा म्हणून ओळखला जातो. यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये तो नव्या दमाने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
प्रग्यान ओझाः हरभजन सोबत प्रग्यान ओझा असणे हे गणित होते. २०१३मध्ये मुंबई इंडियन्सच्या प्रतिस्पर्ध्यांचा हा कर्दनकाळ होता. या डावखुऱ्या स्पीन टाकणाऱ्या गोलंदाजाने २०१३च्या सीझनमध्ये १६ सामन्यात १६ विकेट मिळवल्या होत्या. निवृत्ती पत्करल्यानंतर प्रग्यान आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचाचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.
आदित्य तारेः २०१३मध्ये सचिन तेंडुलकरला दुखापत झाल्यानंतर ओपनिंगसाठी आदित्य तारेचे नाव पुढे आले होते. या संधीचे यशात रुपांतर करण्यात कोणतीही कसर आदित्यने ठेवली नाही. त्याने ५ सामन्यात १२३ धावा केल्या होत्या. २०२२मध्ये आदित्यने मुंबई इंडियन्सला सोडचिठ्ठी दिली व उत्तराखंड स्थानिक क्रिकेट सर्किटमध्ये प्रवेश केला. सध्या तो तेथे कार्यरत आहे.
ऋषी धवनः एक खरा ऑल राउंडर म्हणून ऋषी ओळखला जातो. २०१३ सालच्या मुंबई इंडियन्सच्या संघात गोलंदाजीत समतोल साधण्यासाठी ऋषी धवनचा फायदा झाला. पंजाब (२०१४-१५), कोलकाता (२०१७) साठी क्रिकेट खेळल्यानंतर ऋषीने हिमाचल प्रदेशला विजय हजारे चषक जिंकून देण्यात मदत केली होती. २०२२मध्ये पंजाब किंग्जसोबत तो खेळला होता. यंदाही त्याच संघासोबत तो खेळत आहे.
ग्लेन मॅक्सवेलः ‘मिस्टर 360’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने २०१३मध्ये कोणत्या संघासोबत खेळणार याची घोषणा केली नव्हती. पण सध्या गेले दोन सीझन तो आरसीबी सोबत असून त्याच्या दमदार कामगिरीने या सीझनमध्ये सर्वांचे लक्ष त्याच्यावर लागले आहे.
यजुवेंद्र चहलः २०१३मध्ये एक आश्वासक लेगस्पीनर म्हणून चहलची सुरूवात झाली होती. २०२२मध्ये त्याने २७ विकेट मिळवून राजस्थान रॉयल्ससाठी पर्पल कॅप मिळवली होती. यंदा तो याच संघासोबत असेल.
नॅथन कोल्टर नाइलः मुंबई व ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज यांचे एक नाते प्रस्थापित झाले आहे. कोल्टर नाइल हे याचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. २०१३च्या आयपीएल सीझनमध्ये कोल्टर नाइलने पंजाबविरुद्ध एकच विकेट घेतली होती. त्यानंतर तो काही वर्ष बाहेर राहिला होता. पण २०२० व २०२१मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून पुन्हा खेळू लागला. २०२३मध्ये बिग बॅश लिगनंतर कोल्टर नाइल राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे.
अक्षर पटेलः भविष्यातील एक उत्तम ऑल राउंडर म्हणून अक्षरकडे पाहिले जाते. अक्षर एकच सीझन मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. त्याने अंतिम सामन्यात एक झेलही घेतला होता. डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. असा अष्टपैलू अक्षर या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे.
जेकब ओरामः न्यूझीलंडच्या जेकबने २०१३मध्ये मुंबई इंडियन्सकडून एकच सामना खेळला आहे. पण या खेळाडूकडे सामना जिंकण्याचा अनुभव असल्याने तो सर्वांचे लक्ष वेधू शकला. जेकबने क्रिकेट व्यतिरिक्त अन्य क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. २०१०-१४ दरम्यान स्काय टेलिव्हिजनसाठी त्याने समालोचन व विश्लेषक म्हणून काम पाहिले होते. पुढे त्याने न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षकपद भूषवले.
जेम्स फ्रँकलिनः या खेळाडूची मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना दोन सीझनमध्ये ३२७ धावा व ९ विकेट अशी कामगिरी होती. फ्रँकलिनने बांगलादेश प्रीमियर लीग, बिग बॅश लीग व कॅरेबियन लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केलेय. सध्या तो पीएसएलमधील इस्लामाबाद युनायटेडसाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतोय.
आयडेन ब्लिझार्डः मुंबई इंडियन्ससाठी तीन सीझनचा ओपनिंग फलंदाज म्हणून ब्लिझार्ड कार्यरत होता. २०१८मध्ये त्याने निवृत्ती पत्करली. सध्या तो दक्षिण ऑस्ट्रेलियातील कोजो या क्रीडा कंपनीचे संचालक म्हणून काम पाहतोय.
फिल ह्युजेसः ऑस्ट्रेलियात लाल रंगाच्या चेंडूवर खेळण्यातील कामगिरीच्या बळावर फिल ह्युजेसला २०१३मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात घेण्याचे ठरले होते. पण अनेक स्पर्धा पाहता त्याला इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियात देशांतर्गत हंगामात खेळत असताना त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस एक बाउन्सर आदळल्याने वयाच्या २४ व्या वर्षी त्याचे निधन झाले.
धवल कुलकर्णीः खेळाचे चित्र बदलण्याची कुवत असलेला धवल कुलकर्णीची गोलंदाजी आहे. आणि ही किमया त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत करूनही दाखवली आहे. २००८-१३ व २०२०-२१ या काळात धवलने उत्तम कामगिरी करून दाखवली होती. २०२२मध्ये त्याने आयपीएल सामन्यांचे समालोचन करण्याचे ठरवले व त्यानंतर तो स्थानिक क्रिकेटवर लक्ष देत आहे.
मुनाफ पटेलः २०११-१३ या काळात मुनाफ पटेल मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. २०१८मध्ये निवृत्तीनंतर त्याने बडोदा क्रिकेट असो.चे गोलंदाज प्रशिक्षक पद स्वीकारले. तो टीव्हीवरील काही कार्यक्रम व रस्ते सुरक्षा मालिकांमध्ये दिसून येतो.
अबू नेचिमः कोणत्याही दिशेने चेंडूला स्वींग देण्याची किमया अबू करू शकतोय २०१० पासून अबू मुंबई इंडियन्ससोबत ४ सीझन आहे. त्याने २०१३मध्ये तीन विकेटही घेतल्या होत्या. २०१५मध्ये अबू रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला. नागालँडचा हा स्टार खेळाडू २०२२मध्ये झारखंड विरोधात रणजी करंड़क खेळला.
अमितोज सिंगः २०१२मध्ये मुंबई इंडियन्सला जे उत्तम खेळाडू गवसले होते, त्यातील एक खेळाडू म्हणजे अमितोज होता. २०१३मध्ये अमितोजला खेळण्याची संधी मिळाली नाही पण पंजाबचा हा वेगवान गोलंदाज अबू धावी टी१० लिगमध्ये राजपुतांच्या विरोधात खेळताना दिसला.
पवन सुयालः याने २०१३मध्ये एल क्लासिको स्पर्धा खेळली होती. २०२२मध्ये पवन इंडिया कॅपिटल्स टिमकडून लिजंड्स लिग क्रिकेट खेळताना दिसला.
जावेद खानः २०१३च्या सीझनमध्ये दिल्लीचा हा वेगवान गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या नजरेत आला होता. पण जावेदने अचानकपणे क्रिकेटला अलविदा केले. जावेदची चांगली कामगिरी २०१४ साली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यात दिसून आली. या सामन्यात १८ धावात जावेदने ४ बळी घेतले होते.
सुशांत मराठेः मुंबई संघात एक गुणवत्ता असलेला यष्टीरक्षक म्हणून सुशांत मराठेकडे पाहिले जात होते. आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सने सुशांतला संधी दिली नसली तरी सुशांतची कामगिरी मुंबई व क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून भरवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये दिसून आली. २०१६मध्ये उच्च शिक्षणासाठी सुशांतने क्रिकेटचा संन्यास घेतला. त्याने बिझनेस अडमिनिस्ट्रेशनमध्ये उच्च शिक्षण घेतले असून सध्या तो अमेझॉन युकेमध्ये कार्यरत आहे.