आयपीएल २०२५ लिलावाचे एफएक्यूज: रिटेंशन्स, पर्स, अनकॅप्डचे नियम

आपल्याला इथे बरंच काही पचवावं लागणार आहे. अनेक रिटेंशन्स आणि राइट टू मॅच (आरटीएम) कार्ड्स, आरटीएम नियमांमधील बदल, पर्स, वजावटी, अनकॅप्ड खेळाडूंचा नियम. गोंधळलास? काळजी करू नका. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. 

रिटेंशन्स / आरटीएम, काय फरक आहे?

इथला मॅजिक नंबर सहा आहे. प्रत्येक फ्रँचायझीला लिलावावूर्वी रिटेन करता येईल किंवा लिलावाच्या वेळी आरटीएम वापरता येईल. पण जास्तीत जास्त सहा खेळाडू ठेवता येतील. या सहा खेळाडूंपैकी जास्तीत जास्त पाच खेळाडू कॅप्ड होऊ शकतात (भारतीय किंवा परदेशी) आणि जास्तीत जास्त दोन कॅप्ड होऊ शकतात. या वेळची एकूण पर्स प्रत्येक टीमसाठी १२० कोटी रूपयांची आहे. 

ठीकेय, रिटेंशन्स कसे काम करतात?

खेळाडू

पर्सची वजावट

रिटेन केलेला खेळाडू १

१८ कोटी रूपये

रिटेन केलेला खेळाडू 2

14 कोटी रूपये

रिटेन केलेला खेळाडू 3

11 कोटी रूपये

रिटेन केलेला खेळाडू 4

18 कोटी रूपये

रिटेन केलेला खेळाडू 5

14 कोटी रूपये

प्रत्येक अनकॅप्ड खेळाडूची किंमत संघासाठी ४ कोटी रूपये असेल.

परिस्थिती 1: टीमने 6 खेळाडू रिटेन केले (5 कॅप्ड + 1 अनकॅप्ड)

या परिस्थितीत एकूण 79 कोटी रूपये पर्समधून वजा केले जातील आणि टीमकडे लिलावात खर्च करण्यासाठी 41 कोटी रूपये असतील. सहा खेळाडू रिटेन केल्यानंतर त्यांच्याकडे आरटीएम शिल्लक नसतील.

परिस्थिती 2: टीमने 5 खेळाडू रिटेन केले (4 कॅप्ड + 1 अनकॅप्ड)

पर्समधून एकूण 65 कोटी रूपये वजा केले जातील आणि टीमकडे लिलावात खर्च करण्यासाठी 55 कोटी रूपये असतील. पाच खेळाडू ठेवल्यामुळे त्यांच्याकडे एक आरटीएम असेल ज्यातून ते आपल्या आणखी एका विद्यमान खेळाडूला तो लिलावात आल्यानंतर परत ठेवू शकतात.

आणि टीमने एखाद्या खेळाडूला आपल्या रिटेन्ड मूल्यापेक्षा खेळाडूपेक्षा जास्त किंवा कमी पैसे दिल्यास काय होईल?

वरील प्रत्येक परिस्थितीत ऑक्शन पर्समधून ज्या वजावटी दर्शवण्यात आल्या आहेत त्या किमान आहेत. त्या बदलू शकतात. उदाहरणार्थ, टीम रिटेन्ड खेळाडू 1 ला 20 कोटी रूपये देण्याचे ठरवू शकते- जी त्याच्या नियत मूल्यापेक्षा जास्त आहे- आणि त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या पर्समधून अतिरिक्त 2 कोटी रूपये जातील. 

पण समजा एखाद्या टीमने रिटेन केलेल्या खेळाडू 1 ला 15 कोटी रूपये – त्याच्या ब्रॅकेट मूल्यापेक्षा कमी द्यायचे ठरवल्यास त्यांच्या ऑक्शन पर्समधून 18 कोटी रूपये जातील.

कळलं. मग आता नवीन आरटीएम नियम काय आहे?

आपण उदाहरण समजून घेऊयाः एखादा खेळाडू (खेळाडू अ) सध्या टीम अ सोबत आहे. तो लिलावात आला. त्याला टीम ब कडून सर्वाधिक बोली मिळाली 6 कोटी रूपयांची. आता टीम अ ने त्यांच्या आरटीएमचा वापर X वर केला की टीम बला त्यांना योग्य वाटेल तेवढी त्याची किंमत वाढवता येईल. असं म्हणूया की त्यांनी 10 कोटी रूपये किंमत ठरवली. आता, टीम अ ला तो हवा असेल तर ते त्यांचं आरटीएम कार्ड वापरतील आणि खेळाडू X ला 10 कोटी रूपयांवर ठेवून घेतील. अन्यथा, तो 10 कोटी रूपयांत टीम ब कडे जाईल. 

मस्तच. मला मजा येणार आहे. आता टीम्ससाठी त्यांची रिटेंशन यादी जाहीर करण्याची शेवटची तारीख काय आहे?

३१ ऑक्टोबर २०२४, सायंकाळी ५ वाजता. या तारखेपूर्वी एखादा खेळाडू कॅप्ड झाल्यास त्याला कॅप्ड खेळाडू मानले जाईल.