आयपीएल २०२५: एमआय तिकिटांसाठी ऑल इन वन गाइड

इंडियन प्रीमियर लीग २०२५ ची उत्सुकता खूप वाढू लागलीय आणि तो दिवस येण्याची आम्हीही खूप प्रतीक्षा करतोय. 😌

… आणि या वेळी प्रथमच पलटन फक्त एम तिकिटांचा वापर करून वानखेडे स्टेडियमवर येऊ शकतात. मस्तच ना?!

आता या नवीन सिस्टिमचा वापर कसा करायचा अशा विविध प्रश्नांनी तुमच्या डोक्यात थैमान घालण्यापूर्वी आम्ही वारंवार विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो. एका वेळी एकच सवाल, चालतंय काय?

एम तिकीट कसे मिळवायचे?

तुमच्या एम-तिकिटांना नुस्ता स्ट्रेस फ्री एक्सेस मिळवण्यासाठी खालील स्टेप्स वापरा.

• मोबाइल अॅप किंवा ब्राऊझरवर तुमच्या BookMyShow अकाऊंटवर लॉगिन करा.

• “प्रोफाइल” सेक्शनमध्ये जा आणि “युअर ऑर्डर्स” पाहा.

• तुमच्या मुंबई इंडियन्स मॅच तिकिटावर टॅप करा.

• एक विशेष क्यूआर कोड दिसेल.

• टर्नस्टाइलवर क्यूआर कोड सादर करा.

• क्यूआर कोडच्या खाली स्टेडियममध्ये प्रवेश करून तुमच्या सीटपर्यंत पोहोचण्यासाठी दिशादर्शन मिळेल.

मला माझे एम तिकीट पाहण्यासाठी बुक माय शो अॅपची गरज आहे का?

नाही. एम-तिकीट बुकमायशो अॅप किंवा मोबाइल वेबचा वापर करून मोबाइल फोनवर पाहता आणि दाखवता येतात. त्यामुळे व्यवहार तसेच एम तिकीट वापरून स्टेडियमवर प्रवेश करण्यासाठी विद्यमान अकाऊंटमध्ये लॉगिन केलेले असले पाहिजे. युजरने अकाऊंटमध्ये लॉगिन केलेले असल्यामुळे तिकिटे युजरच्या खात्यावर सुरक्षितपणे स्टोअर केलेली असतात.

आमची प्रो टिप: चांगल्या अनुभवासाठी चांगल्या मोबाइल किंवा वायफाय नेटवर्कमध्ये असताना कृपया अॅप उघडा आणि तिकिटे पाहा. तिकीट पाहिल्यानंतर ते अॅपमध्ये सहजपणे उपलब्ध होईल आणि स्टेडियमवर नेटवर्क कमी असतानाही दाखवता येईल.

एम-तिकीट पाहण्यासाठी मला इंटरनेटची गरज आहे का?

हो. तुम्हाला एम तिकीट पाहण्यासाठी तुमच्या प्रोफाइलमधील “माय ऑर्डर्स” विभागात पाहावे लागेल.

आमची प्रोट टिप: तुमच्या प्रोफाइल सेक्शनमध्ये एम तिकीट घरात एकदा पाहा. मग तुम्हाला इंटरनेटशिवायही ते पाहता येईल.

मला एम तिकिटाचा स्क्रीनशॉट / स्क्रीन रेकॉर्डिंग न दाखवता जाता येईल का?

नाही. तुम्हाला जाता येणार नाही. तुम्हाला केंद्रावर प्रवेश करता येणार नाही आणि तुमचे एम-तिकीट रद्द मानले जाईल.

मला स्टेडियमवर इंटरनेटशिवाय एम-तिकिटे कशी पाहता येतील?

तुमचे एम तिकीट तुमच्या बुकमायशो अकाऊंटमध्ये सुरक्षितपणे साठवलेले आहे आणि ते बुकमायशो एपवर लॉगिन करून पाहता येईल. स्टेडियमवर येण्यापूर्वी तुमच्या मोबाइल एपवरील युअर ऑर्डर्स विभाग पाहण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो. तिकीट पाहिल्यानंतर तुमचा एप तुमची तिकिटे सेव्ह करेल आणि इंटरनेट एक्सेस नसला तरीही ते तुम्हाला दाखवता येईल. 

आमची प्रो टिप: सुलभ अनुभवासाठी कृपया मोबाइल किंवा वायफाय नेटवर्क चांगले असताना एप उघडून तिकीट पाहा. पाहिल्यानंतर एम तिकीट एपवर उपलब्ध असेल आणि ते नेटवर्क चांगले नसतानाही स्टेडियमवर दिसू शकेल.

मी चार तिकिटे बुक केली आहे तर मला माझ्या मित्रांसोबतच स्टेडियमवर जायची गरज आहे का?

नाही, तुम्हाला एकत्र जाण्याची गरज नाही. तुम्ही सामन्याच्या दिवसापूर्वी संबंधित मित्राला एम-तिकीट पाठवू शकता आणि सामन्यापूर्वी युअर ऑर्डर्स विभागात जाऊन तिकिटे पाहायला सांगा.

**********

तुमच्या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत अशी आशा आहे.

तसेच, तुमची एमआय फॅमिली मेंबरशिप नक्की घ्या, अशी आग्रहाची विनंती. 👉👈

स्टँड्सवर भेटूया, पलटन.