MI vs LSG: एमआयकडून लखनौ सुपर जायंट्सचा पराभव आणि विजयाचा षट्कार

रविवारी आयपीएल २०२५ च्या १० व्या सामन्यात आपल्या संघाने शानदार कामगिरी केली आणि लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभव करून विजय मिळवला. मुंबईचा हा सलग पाचवा आणि या हंगामातील सहावा विजय आहे.

वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना एमआयने २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स देऊन २१५ धावा केल्या.

याला उत्तर देताना एलएसजीचा संघ २० ओव्हर्समध्येच सर्वबाद झाला आणि त्यांना फक्त १६१ धावा करता आल्या.

MI vs LSG सामन्यात मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी खेळ सुरू केला. या दोन्ही सलामी फलंदाजांनी धावा करायला सुरूवातच केली होती. पण रोहितच्या रूपाने मुंबई इंडियन्सला पहिला झटका बसला. रोहितला फक्त १२ धावा करता आल्या.

यानंतर रायन आणि विल जॅक्स यांनी डाव पुढे नेला आणि संघासाठी महत्त्वाच्या धावा जोडल्या. नवव्या ओव्हरमध्ये रायनला दिग्वेश राठीने बाद केले. रायनने अर्धशतक झळकावले. त्याने ३२ चेंडूत ५८ धावा केल्या. त्यात ६ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.

विल जॅक्सने २१ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २९ धावा केल्या. संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली आणि २८ चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या.

तिलक वर्माने ६ आणि हार्दिक पांड्याने ५ धावा केल्या. नाबाद राहिलेल्या नमन धीरने ११ चेंडूत २५ धावा केल्या तर कॉर्बिन बॉशने २० धावा केल्या.

अशा रितीने मुंबई इंडियन्सने २० ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावून २१५ धावा केल्या.

तिलक वर्माने ६ आणि हार्दिक पंड्याने ५ धावा केल्या. नाबाद राहिलेल्या नमन धीरने ११ चेंडूत २५ धावा केल्या तर कॉर्बिन बॉशने २० धावा केल्या.

यानंतर मिशेल आणि निकोलस पूरन यांनी डाव पुढे नेण्यास सुरूवात केली. सातव्या षटकात, विल जॅक्सने पूरनला बाद करून एमआयला दुसरे यश मिळवून दिले. पूरनने १५ चेंडूत २७ धावा केल्या, ज्यात एक चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्यानंतर विलने ऋषभ पंतला (४) बाद केले.

मुंबईच्या शानदार गोलंदाजीसमोर एलएसजीचे फलंदाज असहाय्य झाले आणि धावगती मंदावली.

ऋषभनंतर लखनौने मिशेलची महत्त्वाची विकेट गमावली. त्याने २४ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या.

लखनौकडून आयुष बदोनीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २२ चेंडूंत ३५ धावांचे योगदान दिले. त्यात दोन चौकार आणि तितकेच षटकार होते. तर डेव्हिड मिलरने २४ आणि रवी बिश्नोईने १३ धावा केल्या. यासह, एलएसजीने २० षटकांत सर्व विकेट गमावून १६१ धावा केल्या.

मुंबईकडून बुमराहने चार तर ट्रेंट बोल्टने तीन विकेट घेतल्या. याशिवाय विल जॅक्सने दोन आणि कॉर्बिन बॉशने एक विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना १ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरूद्ध असेल.

 

थोडक्यात धावसंख्या

मुंबई इंडियन्स: २० ओव्हर्समध्ये २१५/७; रायन रिकेल्टन ५८ (३२), मयंक यादव २/४०

लखनो सुपर जायंट्स: २० ओव्हर्समध्ये १६१/१०; आयुष बदोनी, ३५ (२२), जसप्रीत बुमराह ४/२२