MI vs CSK: रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या शतकी भागीदारीमुळे एमआयकडून सीएसकेचा पराभव
आयपीएल २०२५ च्या आठव्या सामन्यात आपल्या टीमने जबरदस्त कामगिरी करत रविवारी चेन्नई सुपर किंग्सचा ९ विकेट्सनी पराभव करत विजय नोंदवला आणि आपल्या मागच्या पराभवाचा वचपा काढला.
वानखेडे स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात एमआयने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने २० ओव्हर्समध्ये ५ विवेक्टस देऊन १७६ धावा केल्या.
याला उत्तर देताना आपल्या टीमने १५.४ ओव्हर्समध्येच एक विकेट देऊन १७७ धावांचे लक्ष्य पूर्ण केले.
MI vs CSK सामन्यात चेन्नईच्या खेळाची सुरूवात शेख राशीद आणि रचिन रवींद्र यांनी केली. परंतु रचिनला फारसे चांगले खेळता आले नाही. तो पाच धावा करून मिशेल सँटनरच्या गोलंदाजीवर बाद झाला.
यानंतर शेख आणि आयुष म्हात्रे यांनी खेळ पुढे नेला. परंतु सातव्या ओव्हरमध्ये म्हात्रेला दीपक चहरने पॅव्हिलियनला परत पाठवले. या दरम्यान त्याने चार चौकार आणि दोन षट्कारांच्या मदतीने १५ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या. सीएसकेने आठव्या ओव्हरमध्ये शेखची विकेट गमावली. त्याने १९ धावा केल्या.
यानंतर रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकी खेळाने टीमला सावरले आणि एक चांगली धावसंख्या उभारण्यास मदत केली.
चौथ्या विकेटसाठी दुबेने ७९ धावांची भागीदारी केली. त्याने २ चौकार आणि ४ षट्कारांच्या मदतीने ३२ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. जडेजाने नाबाद खेळ करताना ३५ चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या. त्याने दौन चौकार आणि चार षट्कारही मारले.
अशा रितीने चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स देऊन मुंबई इंडियन्ससमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले. याशिवाय महेंद्रसिंग धोनी आणि जेमी ओव्हरटन यांनी प्रत्येकी ४ धावा केल्या.
दुसरीकडे गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास जसप्रीत बुमराने दोन विकेट्स घेतल्या तर दीपक जचहर, अश्विनी कुमार आणि मिचेल सँटरनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
एमआयचा संघ विजयासाठी १७७ धावांचा पाठलाग करायला उतरला. त्यांनी जोरदार सुरूवात केली आणि आपले सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी महत्त्वाच्या धावा केल्या.
परंतु रवींद्र जडेजाने मुंबई इंडियन्सला पहिला झटका दिला. त्याने रायनला म्हात्रेच्या हातात कॅच देऊन बाद केले. रायनने पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली.
रायनने तीन चौकार आणि एका षट्काराच्या मदतीने १९ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या. यानंतर रोहित आणि सूर्यकुमार यादव यांनी जोरदार फलंदाजी करत मैदानात धावांचा पाऊस पाडला.
रोहित आणि सूर्यकुमार यांच्या दमदार नाबाद शतकी भागीदारीने आपल्या टीमला विजय मिळवून देण्यास मदत केली. रोहितने ४५ चेंडूंमध्ये नाबाद ७६ धावा केल्या. त्याने चार चौकार आणि सहा षट्कार मारले सूर्यकुमारने सहा चौकार आणि पाच षट्करारांच्या मदतीने ३० चेंडूंमध्ये नाबाद ६८ धावा केल्या.
अशा रितीने आपल्या टीमने १५.४ ओव्हर्समध्ये एक विकेट देऊन १७७ धावा केल्या आणि आपले लक्ष्य पूर्ण करताना ९ विकेट्सनी विजय नोंदवला.
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना बुधवार दिनांक २३ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरूद्ध असेल.
थोडक्यात धावसंख्या
मुंबई इंडियन्स: १५.४ ओव्हर्समध्ये १७७/१; रोहित शर्मा ७६* (४५), रवींद्र जडेजा १/२८
चेन्नई सुपर किंग्स: २० ओव्हर्समध्ये १७६/५; रवींद्र जडेजा ५३(३५), जसप्रीत बुमराह २/२५