आयपीएल सामना ८ वा | MIvCSK ग्राफिकल पूर्वावलोकन: एल क्लासिकोमध्ये आपले वर्चस्व गाजवण्याची संधी!

#MIvCSK • El Clásico • फेरी दुसरी • होऊन जाऊ दे!!! 💥💥💥

पलटन, आपण पुन्हा एकदा विजयी घोडदौड सुरू केली आहे आणि पुन्हा एकदा विजयासाठी आतूर झालो आहोत.

दोन सलग विजय – डीसीविरूद्ध रोमांच आणि एसआरएचविरूद्ध वर्चस्व यांच्यामुळे क्रिकेटचा #PlayLikeMumbai ब्रँड कायम राहिला आहे. ड्रेसिंग रूममध्ये विजयाची भावना पुन्हा आली आहे आणि आता तिला ब्रेक लावण्यासाठी आपण तयार नाही आहोत.

…आपले सर्वांत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध विजय मिळवून सलग तिसरा विजय नावावर नोंदवण्यासाठी आपण तयार आहोत. स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वांत यशस्वी टीम्स आपल्या बालेकिल्ल्यात आमनेसामने येणार आहेत! 🏟️

अडखळती सुरूवात आता मागे पडली आहे आणि विजय नावावर नोंदवून आपल्या ओळखीच्या प्रदेशात पोहोचण्याची वेळ आली आहे. <पहिल्या चार नंबरमध्ये😌>

आता आमच्या सदाबहार आकडेवारी आणि डेटा सल्लागारांनी तुमच्यासाठी खास आकडेवारी विश्लेषण आणले आहे. ते पाहूया! 💻

MI vs CSK – आयपीएलमध्ये एकास एक रेकॉर्ड

अंतर कमी होत आहे. आपले विजयाचे हक्क आपल्या नावावर येऊ लागले आहेत. 🔥

**********

जलदगती की स्पिनर्स - सामन्यांमध्ये वर्चस्व कोणी गाजवले?

एकूणच यशाचा आनंद घेणाऱ्या दोन्ही टीम्सच्या जलदगती गोलंदाजांनी वर्चस्व गाजवल्याचे दिसते.

परंतु या सीझनमध्ये वानखेडेची खेळपट्टी अत्यंत अनपेक्षित आहे. दोन्ही स्पिनर्स आणि सीमर्स यांनी आतापर्यंत वर्चस्व गाजवले असले तरी मागच्या सामन्यात संथ चेंडूंनी कमाल दाखवली आहे. त्यामुळे या स्पर्धेत हा अंदाज आपण खेळपट्टीवर सोडूया! ✌️

**********

एमआयविरूद्ध थालाची कमजोरी काय आहे?

एमएस धोनी एकदा रंगात आला की तो काय करू शकतो हे तुम्हाला माहीत आहे.

काहीही असले तरी त्याने आपल्याविरूद्ध चांगलीच कामगिरी केली आहे. त्याच्या एकूण विकेट्सच्या ७८.९% आपल्याविरूद्ध आहेत. 💪

**********

सीएसकेविरूद्ध एमआयच्या सर्वाधिक धावांचा पाठलाग

या धावांच्या पाठलागाला पलटनच्या हृदयात खास जागा आहे. आपण उद्या पाठलाग करू शकलो तर आणखी एक होईल.

• आयपीएल २०१५ || लीग टप्पा || चेन्नई|| एमआयचा सहा विकेट्सनी विजय

• आयपीएल २०१९ || पात्रता १|| चेन्नई|| एमआयचा सहा विकेट्सनी विजय

• आयपीएल २०२१ || लीग टप्पा|| दिल्ली|| एमआयचा चार विकेट्सनी विजय

**********

MI𝕩CSK – आयपीएलमध्ये विविध टप्प्यांमध्ये गोलंदाजीची सरासरी

• मुंबई इंडियन्स

• चेन्नई सुपर किंग्स

**********

ठीकेय पलटन, महत्त्वाची माहिती टिपून घेतलीत ना? 🤓 भेटूया मग उद्या वानखेडेवर... आपली ताकद दाखवायला हवी ना! 👊