आयपीएल सामना दहावा | MIvLSG #ESADay पूर्वावलोकन: एका खास कारणासाठी खेळ

पलटन, आपली गाडी सुसाट सुटलीय!! 😎

अत्यंत खडतर झालेली सुरूवात आपण मागे टाकली आहे. चार सलग विजयांमुळे आपल्याला प्लेऑफ्स स्पॉटपर्यंत आणून ठेवले आहे. त्यामुळे आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. 🔥

आपला लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध आगामी सामना फक्त एक क्रिकेट मॅच नसेल. तो २०२५ च्या मोहिमेतील बहुप्रतीक्षित #ESADay आहे आणि आपल्याला या स्वप्ननगरीतल्या विविध स्वयंसेवी संस्थांमधील उत्साही मुलांसमोर खेळायचे आहे. ती आपल्या डोळ्यांनी ब्लू अँड गोल्डमधल्या खेळाडूंना परफॉर्म करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 🥹

कल्पना करा- वानखेडेवर उन्हाळ्याची दुपार. १९००० मुलं आपले सुंदर स्मितहास्य घेऊन उपस्थित आहेत. आपला झेंडा फडकवत आहेत. आपल्या टीमसाठी चिअर अप करत आहेत आणि स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. आहा... आपल्या मनात हा आनंद द्विगुणित झालेला आहे. 💙 आलोच बरं का.... (अश्रू पुसतोय)

आता या टप्प्यावर मागच्या काही ईएसए सामन्यांमध्ये आपल्याला मिळालेले विजय पाहूया. त्यात या मुलांनी आयुष्यातला सर्वोत्तम काळ अनुभवला होता.

७ एप्रिल २०२४ | एमआयकडून डीसीचा २९ धावांनी पराभव

हिटमॅनने आपल्या तोडफोडीने या सामन्याचा टोन निश्चित केला. त्यांनी या भरपूर धावा झालेल्या सामन्यात २७ चेंडूंमध्ये ४९ धावा फटकावल्या.

**********

१६ एप्रिल २०२३ | एमआयकडून केकेआरचा पाच विकेट्सनी पराभव

२०२३ चा सीझन एमआय विमेन्स टीमसाठी ऐतिहासिक होता.

आपल्या मुलींनी डब्ल्यूपीएलचा पहिला सीझन जिंकला आणि त्यामुळे पुरूषांच्या टीमने त्यांच्या उत्तम कामगिरीचा गौरव म्हणून ईएसए डेला त्यांची जर्सी परिधान केली. 👏

**********

१६ एप्रिल २०१७ | एमआयकडून गुजरात लायन्सचा सहा विकेट्सनी पराभव

रो आणि पॉली पुन्हा एकदा दणादण खेळले. त्यांनी १७७ धावांचा पाठलाग करताना अनुक्रमे ४०* (२९) आणि ३९ (२३) धावा फटकावल्या.

**********

२५ एप्रिल २०१५ | एमआयकडून एसआरएचचा २० धावांनी पराभव

तात्याच्या २४ चेंडूंमधल्या ३३ धावांनी आपल्याला १५७ अशी एक चांगली धावसंख्या उभारून दिली. लसिथ मलिंगाच्या जबरदस्त ४/२३ मुळे त्याचा आपण बचावही करू शकलो.

**********

३ मे २०१४ एमआयकडून किंग्स XI पंजाबचा पाच विकेट्सनी पराभव

आपल्या अष्टपैलू खेळामुळे आपल्याला पुन्हा एकदा विजय नोंदवता आला.

**********

ओके ओके, नॉस्टॅल्जिया पुरे आता. उद्याचा सामना आहे.

आम्ही एका खास कारणासाठी खेळायला सज्ज आहोत आणि विजयापेक्षा जास्त काहीही महत्त्वाचे असू शकत नाही! 🤗 लेट्स गो....