आयपीएल सामना ७ | MIvSRH ग्राफिकल पूर्वावलोकन: दोन विजय, दोन एकसारख्या मोहिमा, एक धमाल लढाई!

पलटन, दिल्ली कॅपिटल्सविरूद्धचा मागच्या सामन्यातला आपला विजय खऱ्या अर्थाने आत्मविश्वास वाढवणारा ठरलाय. आपण असं म्हणू शकतो की खेळ आपल्या बाजूला झुकू लागलाय. आणि माहितीय का... आपण अजिबात थांबणार नाही आहोत.  

पुढचा सामना आहे- सनरायझर्स हैदराबाद. कठीण आहे का आव्हान? अर्थातच. पण आपली ब्लू अँड गोल्डमधली पोरं या सीझनमध्ये प्रथमच एकामागून एक विजयासाठी सज्ज आहेत. सराव कठोर आहे, स्मितहास्य परत आलेलं आहे आणि विश्वास अत्यंत मजबूत आहे.

राजधानीतला तो रोमांचक सामना आपल्याला काहीतरी खास सुरू करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ देऊन गेला. फलंदाज तयार होत आहेत. गोलंदाज उत्साहाने फुरफुरत आहेत आणि फील्डर्स मैदानात तयार आहेत. <डीसीविरूद्ध शेवटच्या ओव्हरमधल्या रनआऊट्स मस्त होत्या एकदम. 🤌>

आता हाच उत्साह घेऊन एसआरएचच्या आव्हानाला तोड द्यायची आहे. मोहीम? #PlayLikeMumbai, दोन विजय नावावर आहेत आणि गुणतक्त्यावर वर चढायचे आहे. पलटन कधीच हार मानत नाही हे तुम्हाला माहिती आहे. विशेषतः परिस्थिती बदलत असते तेव्हा!

आता याच टप्प्यावर पाहूया आपल्या आकडेवारी आणि डेटा टीमच्या डेस्कवर काय चाललेय ते! 💻

MI vs SRH – आयपीएलमध्ये एकास एक रेकॉर्ड

मोठ्या सामन्यापूर्वी महत्त्वाची माहिती! 🤓

**********

वानखेडेवर फलंदाजांना षट्कार कुठे ठोकायला आवडतात?

त्या भागांमध्ये बसलेल्या लोकांनी सेफ्टी गियर्स घालावेत. 🔛 👀

**********

आयपीएलमध्ये वानखेडेवर सरासरी पॉवरप्ले धावसंख्या

मागच्या तीन सीझन्समध्ये पॉवरप्लेमध्ये धावसंख्या ५० धावांपेक्षा जास्त आहे. 📈

उद्याच्या सामन्यात तुमचा अंदाज काय आहे? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा! 💬

**********

वानखेडेवर आयपीएलमध्ये सीमारेषापल्याड धावा केल्याची टक्केवारी

दोन जोरदार पॉवरहाऊसेस आमनेसामने येणार आहेत.. चौकार आणि षट्कार मोजणं जरा कठीणच होईल! 😰

**********

वानखेडेवर आयपीएलमध्ये स्पिन गोलंदाजीची सरासरी

स्पिन करून विजय मिळवणार का?

**********

मिशनची माहिती देऊन झाली ✅ आणि आपला ब्लू अँड गोल्डमधला संघ खेळायला तयार आहे.

आता पलटन👋 तुम्हाला माहितीय कारय करायचे आहे ते. वेळेत या आणि आपल्या बालेकिल्ल्यात अगदी घसा बसेपर्यंत मुंबई... मुंबई... चा जल्लोष करा!