पलटन, आयपीएल २०२५ चं वेळापत्रक, #AalaRe!!!!
जागे व्हा, पलटन!! 🤩 बघितलं का कोण आलंय ते?... आयपीएलचं शेड्यूल!! 📝
भारताचा क्रिकेट महोत्सव असलेल्या बहुप्रतीक्षित इंडियन प्रीमियर लीग २०२५ साठी वेळापत्रक प्रकाशित करण्यात आलं आहे आणि आम्हालाही उत्साहाचं उधाण आलंय! <duh!>
मुंबई इंडियन्स ही या स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्तरित्या सर्वाधिक यशस्वी टीम आहे. ती २०२४ च्या कॅम्पेनमधल्या अडचणी दूर ठेवून आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सहाव्या ट्रॉफीसाठी सज्ज झाली आहे.
#ICYMI, चला आणि तुमची MI Family membership for 2025 लवकर घ्या! 😇
आमची ब्लू अँड गोल्डमधली पोरं हुश्शार आयपीएल २०२५ ला रविवार दिनांक २३ मार्च रोजी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध एल क्लासिकोने सुरूवात करतील. हा सामना चेपॉकवर होईल. अरे यार, हा सामना आत्ताच्या आत्ता का होऊ शकत नाही??!
तुम्हाला या दिग्गज टीम्सचा सामना चुकवायची इच्छा नसेलच. आपण त्यांच्याविरूद्ध २०-१७ असे सामने जिंकले आहेत. सुट्टी आत्ताच टाकून ठेवा भावांनो आणि बहिणींनो… 😉
तब्बल ७० सामन्यांच्या लीग टप्प्यानंतर प्लेऑफ्समध्ये एक्शन होईल, जे २० मेपासून खेळवले जातील. ही स्पर्धा २५ मे रोजी ईडन गार्डन्स, कोलकात्यात संपुष्टात येईल.
पलटन, या क्षणी आपला उत्साह थोपवून धरणं फार कठीण आहे हे आम्हाला माहीत आहे. परंतु, लवकरच आपल्या आवडत्या गणवेशात आपण दिसू आणि आपल्या ट्रॉफीच्या कपाटात आणखी एक ट्रॉफी विराजमान करण्यासाठी जिवाचं रान करू. फक्त ३४ दिवस आहेत...
मुंबई इंडियन्सचं आयपीएल २०२५ साठी वेळापत्रक
प्रतिस्पर्धी |
दिनांक |
वेळ |
घरी/बाहेर |
चेन्नई सुपर किंग्स |
२३ मार्च |
सायं ७.३० वाजता |
बाहेर |
गुजरात टायटन्स |
२९ मार्च |
सायं ७.३० वाजता |
बाहेर |
कोलकाता नाइट रायडर्स |
३१ मार्च |
सायं ७.३० वाजता |
घरी |
लखनौ सुपर जायंट्स |
४ एप्रिल |
सायं ७.३० वाजता |
बाहेर |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू |
७ एप्रिल |
सायं ७.३० वाजता |
घरी |
दिल्ली कॅपिटल्स |
१३ एप्रिल |
सायं ७.३० वाजता |
बाहेर |
सनरायझर्स हैदराबाद |
१७ एप्रिल |
सायं ७.३० वाजता |
घरी |
चेन्नई सुपर किंग्स |
२० एप्रिल |
सायं ७.३० वाजता |
घरी |
सनरायझर्स हैदराबाद |
२३ एप्रिल |
सायं ७.३० वाजता |
बाहेर |
लखनौ सुपर जायंट्स |
२७ एप्रिल |
सायं ३.३० वाजता |
घरी |
राजस्थान रॉयल्स |
१ मे |
सायं ७.३० वाजता |
बाहेर |
गुजरात टायटन्स |
६ मे |
सायं ७.३० वाजता |
घरी |
पंजाब किंग्स |
११ मे |
सायं ३.३० वाजता |
बाहेर |
दिल्ली कॅपिटल्स |
१५ मे |
सायं ७.३० वाजता |
घरी |