आयपीएल सामना क्र 9 | SRHvMI ग्राफिकल पूर्वावलोकन: विजयी बिर्यानीचा स्वाद घेऊया!!

आयपीएल २०२५ मधला मुंबई इंडियन्सचा हा नववा सामना आहे आणि या वेळी आपण मोत्यांच्या शहरात सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळायला चाललो आहोत. आपल्या मैदानात प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडणारी टीम म्हणून ही टीम ओळखली जाते.

अर्थात मुंबई इंडियन्स असेल तर हे शक्य होणार नाही. आपण सलग तीन सामने जिंकून या सामन्यात खेळायला येत आहोत. त्यात याच प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध सामन्याचाही समावेश आहे! 💪

अवघ्या पाच दिवसांपूर्वी आपण सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळलो आणि चार विकेट्सनी विजय मिळवताना अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या इनिंगमध्ये १७ व्या ओव्हरपर्यंत एकही षट्कार न देणाऱ्या आपल्या गोलंदाजांचं विशेष कौतुक. आपल्या आत्मविश्वासाबद्दल सांगायला हे पुरेसे आहे! 🔥

आता या परतीच्या प्रवासात राजीव गांधी स्टेडियमवर प्रचंड धावा केल्या जातील. हे मैदान फलंदाजांसाठी एक नंदनवन मानले जाते. त्यामुळे फार प्रतीक्षा न करता ते कसे फुलवायचे हे पाहूया…

SRH vs MI – आयपीएलमध्ये एकास एक आकडेवारी

स्पर्धेतल्या सलग चौथ्या विजयासह १५-१० वर ही आकडेवारी नेण्याची वेळ आली आहे! 😇

**********

आयपीएलमध्ये उप्पलमध्ये सरासरी टीम धावसंख्या

मागच्या सीझनमध्ये स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सरासरी इनिंगची धावसंख्या १९० वर गेल्याचे दिसले होते. 📈

चालू सीझनमध्ये ती २०० च्या वर गेली आहे. त्यामुळे गोलंदाजांसमोर कठीण पेच उभा राहील.

*२०२५ मध्ये आतापर्यंत चार सामने खेळवले गेले आहेत.

**********

हार्दिक 𝕩 हर्षलविकेट्सची आकडेवारी

या दोन्ही जलदगती गोलंदाजांनी संथ गोलंदाजीचा उत्तमरित्या वापर केला आहे. त्यामुळे त्यांना यश मिळाले आहे.

**********

उप्पलवर चौकार, षट्कारांची बरसात!

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चालू सीझनमध्ये आतापर्यंत चार सामने खेळवले गेले आहेत. तब्बल ८८ षट्कार ठोकले गेले असून आयपीएल २०२५ मध्ये इतर कोणत्याही ठिकाणी इतके षट्कार ठोकले गेलेले नाहीत. 🤯 फलंदाजांना या मैदनावर खूप मजा येते. त्यांनी षट्कार मारण्यासाठी एकही जागा सोडलेली नाही.

**********

आयपीएलमध्ये हैदराबादच्या बाद करण्याच्या सुंदर पद्धती

तुमच्या फटकेबाजीदरम्यान थोडीशीही चूक झाली तरी गोलंदाजांना इथे मजा येईल. 😏

**********

आपल्या ब्लू अँड गोल्डमधल्या बॉइजना सगळी माहिती देण्यात आली आहे. ते या मैदानात अलीकडच्या उत्तम फॉर्मच्या पार्श्वभूमीवर आत्मविश्वासाने उतरणार आहेत. 💥

पण मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी #MIvCSK post-match press conference मध्ये सांगितले तसे आपण काहीही गृहित धरणार नाही आहोत!”

त्यामुळे डोक्यात हवा जाऊ न देता आधीचाच जिंकण्याचा दृष्टीकोन घेऊन पुढे जाऊया. अपेक्षित निकाल नक्की येईल! 👊