आयपीएल २०२५: सहावी ट्रॉफी घरी आणण्यासाठी खेळाडूंचे आगमन

पलटन, दिवस कमी कमी होत चाललेयत आणि याचा अर्थ काय हे तुम्हाला नक्की माहीत आहे. मुंबई इंडियन्स कॅम्पमध्ये रेलचेल सुरू झालीय. आयपीएल २०२५ जवळ आली असताना पले खेळाडू आणि कोचेस आपल्या कॅम्पमध्ये येऊ लागलेत, उत्साह आणि आनंदाने आणि सोबतच एम व्हाइबने भारलेलं वातावरण आहे!!! 🕺 

…आणि कल्पना करा कोण आलंय ते? आपला मास्टरमाइंड- महेला जयवर्धने! 💙 आपला किंगमेकर, आपल्या अनेक विजयांमागची एक प्रेरणा- महेला आता घरी परतलाय आणि आणखी एका विजयाला गवसणी घालायला तयार आहे. या टीमला पुढे कसं न्यायचं हो कोणाला माहीत असेल तर तो आहे! <duh!>

ब्लू अँड गोल्डमधले आपले काही नवीन खेळाडू विघ्नेश पुथूर आणि व्ही. एस. राजू हेदेखील आले आहेत. ते ताजेतवाने आहेत आणि खेळायला सज्जही आहे. प्रशिक्षणाची तयारी सुरू झालीय आणि वानखेडेवरची धमाल सुरू होणार आहे. 💪

आपला संघ हळूहळू एकत्र येतोय. त्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट आहे. त्या विक्रमी सहाव्या ट्रॉफीसाठीची भूक अजिबात कमी झालेली नाही. फिटनेस ड्रिल असो वा नेटमधला सराव असो किंवा मौजमजा असो, आपली #OneFamily आणखी एका पॉवरपॅक्ड सीझनसाठी सज्ज आहे. नवीन चेहरे, जुने खेळाडू आणि एमआयचे तेच स्पिरिट- आम्ही तयार आहोत धुमशान घालायला! 😎