चषक #6: आता प्रतीक्षा सुरू

पलटन, क्रिकेटचा वर्षातला सर्वांत आवडता कालावधी सुरू झालाय. एमआयचा संघ हळूहळू एकत्र येतोय, नेट्स तयार आहेत आणि सराव सत्रंही सुरू झाली आहेत. आणि हो, पोरं आत्ताच तयार दिसतायत. अर्थात आम्हाला कधी शंका नव्हतीच 🏏

खेळाडू मैदानात आल्याबरोबर त्यांच्यातली ऊर्जा, त्यांच्या मनात असलेली भूक आणि धमालही पाहायला मिळतेय. फलंदाज फटकेबाजीला तयार आहेत, गोलंदाज आपल्या अस्त्रांना धार लावतायत आणि उत्साह तर शिगोशीग भरलाय!

थोडी गंमत बघूया चला! 👇

खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी मारून सिक्स भिरकवायला तयार आहेत साहेब! 🔥

**********

अरे भावा, असा कॅच पकडायचा असतो! 🧤

**********

केएल श्रीजीत, थांब जरा फोटू काढतो!!! 🚀

**********

आयपीएल सुरू होतेय, मला जायलाच पाहिजे! 🏃

**********

विघ्नेश स्पिन करून विघ्न हटवायला तयार आहे!