पहिला विजय मिळाल्यामुळे आनंद झालायः महेला जयवर्धने

आम्ही डी वाय पाटील स्टेडियमवर आरआरविरूद्ध १५९ धावांचा पाठलाग करून टाटा आयपीएल २०२२ चा पहिला विजय नोंदवल्यामुळे टीममध्ये आनंदाचे वातावरण होते.

प्रमुख मार्गदर्शक महेला जयवर्धनेदेखील या निकालामुळे खूश होते.

“आठ सामन्यांनंतर आमचा हा चांगला विजय होता. आम्ही काही सामन्यांत अत्यंत जवळ येऊन हरलो. त्यामुळे पहिला विजय आमच्यासाठी आनंददायी बाब आहे,” महेला यांनी सामन्यानंतर सांगितले.

महेला यांनी टीमचे प्रचंड कौतुक केले. या मुलांनी चांगला दृष्टीकोन ठेवून कठीण परिस्थितीचा उत्तम सामना केला.

“मला या मुलांचा खूप अभिमान वाटतो. त्यांनी खूप मेहनत केली. आम्ही सामने हरत होतो. तरीही आम्ही प्रक्रिया, सराव आणि तयारीपासून दूर गेलो नाही. सरावाच्या पहिल्या दिवशीचा त्यांचा उत्साह आणि दृष्टीकोन कालही तसाच होता,” महेला म्हणाले.

त्यांनी प्रथमच सामना खेळत असलेल्या कुमार कार्तिकेय सिंगचेही कौतुक केले. त्याने चार ओव्हरमध्ये 1/19 अशी कामगिरी केली आणि ड्रेसिंग रूम पीओटीएम पुरस्कार जिंकला.

“आमची गोलंदाजी खूप चांगली होती. आम्ही बटलरला बराच काळ लांब ठेवले. तरूण कार्तिकेयची कामगिरी उत्तम होती. त्याने पहिल्या सामन्यात अत्यंत देखणी गोलंदाजी केली. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याची समज आणि खेळ पाहण्यासारखा होता. आम्ही त्याला एक महिनाभर नेट्समध्ये पाहत आहोत आणि त्याला संधी देणे योग्य ठरेल असे आमचे मत झाले,” ते म्हणाले.

महेला यांच्या मते फलंदाजीच्या युनिटमधील प्रत्येक खेळाडूने त्याचे काम चांगल्या रितीने पार पाडले. त्यामुळे आम्हाला या कठीण पिचवरही लक्ष्याचा पाठलाग करणे शक्य झाले.

“आम्ही ईशानसोबत चांगली सुरूवात केली. त्याने त्यांच्यावर चांगलाच हल्ला केला आणि आम्हाला वेग प्राप्त करून दिला. त्यानंतर सूर्या आणि तिलक यांनी शांत डोक्याने खेळ करून आम्हाला आवश्यक असलेली मोठी भागीदारी केली. शेवटी थोडी गडबड झाली परंतु टिमी (डेव्हिड) आणि पॉली आणि त्यानंतर डॅनने खेळ संपवला,” ते म्हणाले.

“आम्हाला सुधारणेसाठी आणखी प्रयत्नांची गरज आहे आणि आम्ही ते करत आहोत,” महेला शेवटी म्हणाले.

आमच्या गोलंदाज आणि फलंदाजांच्या उत्तम कामगिरीसोबत सोबत पहिला विजय या दोघांचेही समान योगदान हे उर्वरित सीझनमध्येही कायम राहील अशी आशा आहे आणि आणखी असे खेळ पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत!