"आमच्यासाठी हा नेहमीसारखाच सामना आहे... आम्ही आमच्या ताकदींवर भर देऊ" स्काय

मुंबई इंडियन्स आज लीगचा शेवटचा आणि जिंकायलाच हवं असा सामना सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळणार आहे. पण स्कायच्या मते टीम हा सामना इतर कोणत्याही सामन्यांप्रमाणेच खेळेल.

"हा आमच्यासाठी नेहमीसारखाच एक सामना आहे. मागच्या चार ते पाच सामन्यांमध्ये वानखेडेवर आम्ही काय खेळलो आहोत हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला आमची ताकद माहीत आहे आणि आम्ही त्याचा फायदा घेऊ."

एमआय वानखेडेवर म्हणजे आपल्या बालेकिल्ल्यात आपला शेवटचा सामना खेळणार असल्याची बाब रविवारी सामन्यात त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल.

"आपल्या घरच्या लोकांसमोर खेळण्याचा नेहमीच एक फायदा असतो. कोणालाही लीगचा टप्पा घरच्या खेळपट्टीवर खेळायला आवडेल आणि उद्या पाठिंबाही चांगलाच मिळेल."

प्रतिस्पर्धी संघाची खूप काळजी करण्याऐवजी टीम आपल्या कामगिरीवर जास्त लक्ष देईल असे सूर्याला वाटते. "आपल्यावर आणि आपल्यासाठी काय फायदेशीर आहे यावर लक्ष केंद्रित करणे आणि त्यानुसार खेळणे महत्वाचे आहे."

स्कायकडे अनेक स्ट्रोक्स आणि त्यांना फटकवण्याची क्षमता असली तरी आपण अत्यंत पद्धतशीर खेळतो असं तो म्हणतो.

"मी खेळत असलेल्या फटक्यांचा सराव मी आधीच केलेला असतो, एकतर नेट्समध्ये किंवा माझ्या मनाततरी. मी कायम मैदानानुसार खेळायचा प्रयत्न करतो. मी मोठमोठे षटकार मारण्याऐवजी कमी धोकादायक आणि जास्त फायदेशीर फटके मारायचा प्रयत्न करतो. माझ्या मते मी जितका जास्त वेळ खेळेन तितके टीमसाठी फायदेशीर असेल. मी साधारणपणे 15-20 मिनिटांपेक्षा जास्त सराव करत नाही. माझे धावा करायचे पर्याय कुठे आहेत हे मला माहीत आहे आणि मी त्यानुसार काम करतो. सहजपणे ते जमले नाही तरी ठीक आहे. मी नंतर त्यांच्यावर जास्त चांगल्या प्रकारे काम करायचा प्रयत्न करतो."

मागच्या 18 महिन्यात भरपूर प्रगती आणि थोडा उतार पाहिल्यानंतर सूर्यकुमारला फॉर्ममध्ये येणाऱ्या चढउतारांमध्ये संतुलन साधायला जमले आहे.

"तुम्ही जमिनीवर पाय रोवून आणि संतुलित राहायला हवे हे सांगणे सोपे आहे पण त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष आयुष्यात करणे कठीण. हे संतुलन साधता आले की तुमच्या खेळातही ते दिसून येते."

मोठा सामना खेळायला फक्त काही तास शिल्लक असताना एक मोठ्ठा श्वास घेऊया आणि, just BELIEVE!