चावला, नबी, श्रेयस, शम्स, केकेः एमआयच्या २०२४ च्या स्पिनर्सना भेटा
स्पिन गोलंदाजीची कला- जिथे कलात्मकता आणि धोरण या दोन्ही गोष्टींचा मेळ घातला जातो, त्यातून बॉल आणि स्टंप्स यांच्यामधील रोमान्स पाहायला मिळतो. २००८ पासून आणि हरभजन सिंगपासून मुंबई इंडियन्सकडे कायमच प्रभावी स्पिन गोलंदाज होते. ते सामना जिंकून देणारे आहेत आणि पलटनला जल्लोष करायला एक कारणही देतात.
आपला नवीन आयपीएल सीझन सुरू व्हायला फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. तर आम्ही तुम्हाला मुंबई इंडियन्स क्लास ऑफ २०२४ च्या स्पिन कलाकारांची ओळख करून देत आहोत.
1. पियूष चावला
आमचा ‘प्रोफेसर’. आयपीएलमधल्या सर्वकालीन आघाडीच्या विकेट घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक असलेला पीसी आपल्या खास गोलंदाजी तंत्राची माहिती द्यायला आणि त्याच्या राँग अन्स आणि गुगलीने प्रसिद्ध झालेल्या तंत्रांचा प्रयोग मैदानात करायला मागे हटत नाही. कारण वय म्हणजे फक्त चांगल्या क्रिकेट पिचवरच्या क्रिकेट स्टंपसारखे असते. त्याने २०२३ मध्ये आपला सर्वोत्तम आयपीएल सीझन जगल्यानंतर (२२ विकेट्स) आणि त्याचा सर्वांत मोठा पाठीराखा असलेला मुलगा अद्विक याच्यासोबत पियूष चावला आपल्या लेग स्पिनच्या मदतीने एमआयसाठी बॉलने पुन्हा एकदा परीकथा लिहिण्यासाठी तयार आहे.
2. मोहम्मद नबी
एमआयने मोहम्मद नबीच्या रूपात एक अनुभवी गोलंदाज आणला आहे. तो स्पिनबाबत एक कठोर दृष्टीकोन ठेवतो- साधा, आकर्षक आणि तरीही शास्त्रशुद्ध. आपण अफगाणिस्तानसोबत आंतरराष्ट्रीय सामन्यात किंवा फ्रँचायझी क्रिकेटमध्ये त्याच्या जगाला हलवून सोडणाऱ्या गोलंदाजीची मजा पाहिली. नबीला आपल्या अचूक डॉट्स आणि धावांना जराही जागा न ठेवताना लांबीच्या संदर्भात पिचवर बारीक नजर ठेवून फलंदाजाच्या संयमाचा अंत पाहायला मजा येते. त्याला सामन्याच्या कोणत्याही टप्प्यात गोलंदाजी करायला दिली तरी या अफगाणी महान खेळाडूकडून सामना पालटवणारी कामगिरी पाहायला मिळू शकते.
3. कुमार कार्तिकेय
मेहनत, चिकाटी, इच्छाश्ती आणि ब्लू आणि गोल्ड परिधान करण्याचे वेड- कुमार कार्तिकेयचा चेंडूसह स्पिनर आणि विजेता म्हणून सातत्यपूर्ण विकास याच शब्दांत सारांशरूपाने सांगता येईल. नेटमधील फलंदाजापासून ते बदली खेळाडू आणि मग एका विश्वासू विकेट टेकरपर्यंत प्रवास करून केकेने स्वतःला एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे. त्याला बोलावणे आले की त्याचे सोने करून दाखवतो. हा एक डावखुरा स्पिनर आहे जो लेग ब्रेक, गुगली, कॅरम बॉल आणि स्पिनच्या डिक्शनरीमध्ये असलेला प्रत्येक फरक वापरू शकतो. गोलंदाजीच्या युनिटमध्ये कुमार कार्तिकेयचे असणे प्रतिस्पर्धी संघाला घाबरवून सोडू शकते- हे आपण रणजी ट्रॉफीमधील त्याच्या कामगिरीवरून (नऊ सामन्यांमध्ये ४१ विकेट्स) पाहिले आहे.
4. श्रेयस गोपाल
त्याची घरवापसी झाली आहे. २०१४ मध्ये श्रेयस गोपालने एक वचन दिले. पण आता २०२४ मध्ये हा कर्नाटकमध्ये जन्मलेला केरळचा स्टार दोन गोष्टी आपल्यासाठी करेल- विकेट्स आणि सामने जिंकण्याची निश्चित हमी. हा एक लेग स्पिनर आहे जो आपल्या आदर्श अनिल कुंबळेसारखाच चेंडू अगदी तीव्रतेने घुमवू शकतो. श्रेयस पियूष चावलाचा बॅक अपसारखा आहे. पण दैव बलवत्तर असेल तर आपल्याला हे दोन्ही लेग स्पिनर्स मैदानात येऊन प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो करून सोडताना पाहता येतील.
5. शम्स मुलाणी
मुंबईच्या मैदानात जन्मलेला आणि वाढलेला शम्स मुलाणी आयपीएल २०२४ मध्ये चेंडूला चांगलेच खेळवायला सज्ज आहे. तो अजूनपर्यंत पहिल्या टीममध्ये आलेला नाही. पण शम्सने आपण टीमसाठी एक चांगला गोलंदाज का आहोत हे वारंवार सिद्ध केले आहे- तुम्ही एकदा त्याच्या मुंबईसाठीच्या देशांतर्गत कामगिरीकडे पाहा तर खरे (१७६ फर्स्ट क्लास विकेट्स, ८२ लिस्ट ए विकेट्स आणि ५२ टी२० विकेट्स). डावखुरा स्पिन, पिचचा पुरेपूर वापर करण्याचा आत्मविश्वास आणि स्वतःमध्ये सुधारणा करत राहण्यासाठी त्याची सातत्यपूर्ण तयारी या कारणांमुळे आयपीएलमध्ये लवकरच शम्स मुलाणी- मुंबई स्टारची ओळख पटेल याची खात्री वाटते.