पहिल्या एसए२० लिलावापूर्वी एमआय केपटाऊनकडून आपल्या प्रशिक्षक संघाची घोषणा

एमआय केपटाऊनने आज १९ सप्टेंबर रोजी केपटाऊनमध्ये आयोजित पहिल्या एसए२० खेळाडू लिलावापूर्वी आपल्या प्रशिक्षक संघाची घोषणा केली आहे. एसए२० चे हे पहिलेच वर्ष असून ही दक्षिण आफ्रिकेतील प्रीमियर टी२० क्रिकेट लीग आहे.

माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज सायमन कातीच मुख्य प्रशिक्षक असेल तर दिग्गज दक्षिण आफ्रिकन खेळाडू हाशीम अमला फलंदाजी मार्गदर्शक म्हणून रूजू होणार आहे. सायमनकडे मैदानावरील प्रचंड अनुभव आहे आणि खेळाबाबत त्याचा दृष्टीकोन अत्यंत सखोल आणि बुद्धिमान आहे. हाशीम आपल्या सातत्यपूर्णतेसाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत सर्वाधिक वेगवान २०००, ३०००, ४०००, ५००० आणि ६००० धावांचा विक्रम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केला आहे.

त्यांच्यासोबत न्यूझीलंडचा माजी फलंदाज जेम्स पॅमेंट क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि त्यांचा देशांतर्गत प्रशिक्षक रॉबिन पीटरसन संघाचा महाव्यवस्थापक म्हणून रूजू होणार आहे. हे दोघेही एमआयच्या वातावरणात आधीपासूनच रूळलेले आहेत. पॅमेंट हा मुंबई इंडियन्सचा सध्याचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. तो हीच जबाबदारी निभावणार आहे तर पीटरसनने भूतकाळात मुंबई इंडियन्ससाठी खेळ केला होता. त्यामुळे क्रिकेटचा एमआय ब्रँड एमआय केपटाऊनमध्येही रूजवण्यासाठी हे दोन्ही खेळाडू महत्त्वाचे ठरतात.

रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष श्री. आकाश एम. अंबानी म्हणाले की, एमआय केपटाऊन प्रशिक्षक टीममध्ये सायमन आणि हाशीम यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. जेम्स आणि रॉबिन यांच्यासोबत आमची एक अशी टीम तयार झाली आहे जी दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटचा एमआय ब्रँड पोहोचवेल आणि या क्रिकेटप्रेमी देशात एमआय जपत असलेली मूल्ये आणि नीतीमत्ता आणेल.” 

एमआय केपटाऊनचे मुख्य प्रशिक्षक श्री. सायमन कातीच म्हणाले की, एमआय केपटाऊनचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमले जाणे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. एक नवीन टीम तयार करणे, कौशल्य विकसित करणे आणि टीमची संस्कृती रूजवणे या गोष्टी माझ्यासाठी खूप खास आहेत. मी एमआय

केपटाऊनला अशी एक टीम बनवण्यासाठी उत्सुक आहे जी स्थानिक टॅलेंटला प्रोत्साहन देईल आणि एमआयच्या मूल्यांची जपणूक करेल.”

एमआय केपटाऊनचे फलंदाजी प्रशिक्षक श्री. हाशीम आमला म्हणाले की, एमआय केपटाऊनसोबत ही नवीन जबाबदारी स्वीकारताना मला खूप आनंद वाटतो आहे. एमआयचे मालक, व्यवस्थापन आणि माझे व्यवस्थापक यांचे ही सर्व प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यासाठी आभारी आहे. त्यांनी केलेले नियोजन पाहता आमच्या स्थानिक टॅलेंटला आकर्षित करणारे हे एक अप्रतिम व्यासपीठ ठरेल यात शंका नाही. एक खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून माझा अनुभव मी पूर्णपणे उपयोगात आणेन आणि एमआय केपटाऊनच्या खेळाडूंना सर्वोत्तम खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देईन आणि दक्षिण आफ्रिकन क्रिकेटला आणखी मजबूत बनवू शकेनल.

एमआय केपटाऊनने पहिल्या वर्षासाठी ५ खेळाडूंना साइन केल्याची घोषणा केली आहे- कागिसो रबाडा, डेवाल्ड ब्रेविस, राशीद खान, सॅम कुरन आणि लियाम लिव्हिंग्स्टन.