मॉडर्न इंग्लिश स्कूलचा १९५ धावांनी विजय
एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या मुंबई लेगमधील उपांत्यपूर्व फेरीत मॉडर्न इंग्लिश स्कूलने (चेंबूर) लक्षधाम हायस्कूलवर (गोरेगाव) 195 धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना ऋषभ सदके आणि प्रणव अय्यंगार या मधल्या फळीतील जोडीच्या 195 धावांची भागीदारीच्या जोरावर मॉडर्न इंग्लिश स्कूलने 40 षटकांत 8 बाद 328 अशी मोठी धावसंख्या उभारली. ऋषभने (109 धावा) शानदार शतक झळकावले. प्रणवचे (96) थोडक्यात हुकले.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना लक्षधाम हायस्कूलचा डाव 31.1 षटकांत 133 धावांवर आटोपला. त्यात कर्णधार शमिक एसचे (53) सर्वाधिक योगदान आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूलचा शौर्य केतन (3/25), कनव सैनी (2/14) आणि स्पर्श चव्हाणने (2/30) ठराविक अंतराने विकेट घेत संघाला मोठ्या फरकाने जिंकून देण्यास हातभार लावला.
15 वर्षांखालील मुलींच्या गटात, सेंट कोलंबा शाळेने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलवर 222 धावांच्या फरकाने मात केली. प्रथम फलंदाजी करताना, सलामीवीर मयुरा रावराणे (49) आणि कर्णधार आर्या वाजगेच्या (112) झटपट 172 धावांच्या सलामीच्या जोरावर सेंट कोलंबा शाळेने 3 बाद 294 धावा केल्या.
शालन मुल्ला (2/5), भावना सानपच्या (2/8) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलचा डाव 15.3 षटकांत अवघ्या 72 धावांवर संपला.
संक्षिप्त धावफलक:
14 वर्षांखालील मुले:
• जनरल एज्युकेशन ॲकॅडमी (चेंबूर) - 34.3 षटकांत 2 बाद 170(हर्ष वाच्छानी नाबाद 47, अर्णव पाटील 36, अक्षत जोशी नाबाद 35, शार्दुल फगरे 28) विजयी वि. अल-बरकत मलिक मुहम्मद इस्लाम इंग्लिश स्कूल (कुर्ला) - 39.2 षटकांत सर्वबाद 167 (सनील तामखडे 52, जय गुप्ता 24, आदित्य पांडे 21; सिद्धांत देसाई 3/22, अक्षत जोशी 2/20, अर्णव पाटील 2/21).
16 वर्षांखालील मुले:
• मॉडर्न इंग्लिश स्कूल (चेंबूर) - 40 षटकांत 8 बाद 328(ऋषभ सदके 109, प्रणव अय्यंगार 96; शमिक एस 3/39, मिथुन राजा 2/57) विजयी वि. लक्षधाम हायस्कूल (गोरेगाव) - 31.1 षटकांत सर्वबाद 133 (शमिक एस. 53; शौर्य केतन 3/25, कनव सैनी 2/14, स्पर्श चव्हाण 2/30).
15 वर्षांखालील मुली:
• सेंट कोलंबा स्कूल (गावदेवी) - 19 षटकांत 3 बाद 294 (आर्या वाजगे 112, मयुरा रावराणे 49, भावना सानप नाबाद 35) विजयी वि. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल (वांद्रे) - 15.3 षटकांत सर्वबाद 72 (शालन मुल्ला 2/5, भावना सानप 2/8).
• पराग इंग्लिश स्कूल (भांडुप) - 0.4 षटकांत बिनबाद 16 (तनिषा शर्मा नाबाद 16) विजयी वि. चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूल - 12.1 षटकांत सर्वबाद 15 (स्वरा 4/1, राजसी 2/0, अद्वैत तोरस्कर 2/2).