एमआय स्टार ट्रॅकर- रणजी ट्रॉफी २०२२-२३

संपूर्ण देशभरात रणजी ट्रॉफीची धूम आहे. आपली मुलं जोरदार खेळत आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा घरोघरी सुरू आहे. पलटनचे सुपरस्टार कसे खेळतायत याचा रिपोर्ट आपल्यासाठी खास आणलाय. (प्रत्येक फेरीनंतर अद्ययावत केलेला). चला वाचूया, उत्साह वाढवूया.

समूह टप्पे | चौथी फेरी – ०३-०६ जानेवारी २०२३

शम्स मुलाणी: मुलाणीकडे खास मिडास टच आहे. हात लावेल तिथे पाणी काढेल! या स्पिनरने तामिळनाडूविरूद्ध सामन्यात आपल्या विकेट्सच्या संख्येत सहाची भर घातली (प्रत्येक इनिंगमध्ये तीन). त्यामुळे तो आता चार सामन्यांमध्ये ३० विकेट्स घेऊन दुसऱ्या क्रमाकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला आहे.

अर्जुन तेंडुलकर: या जलदगती गोलंदाजासाठी एक चांगला सामना. त्याने पहिल्या इनिंगमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यात त्यांचा कर्णधार सिजोमोन जोसेफचीही विकेट होती आणि दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला फार काही करण्यासारखे नव्हते कारण गोव्याच्या स्पिनर्सनी त्यांना सामना जिंकून दिला.

कुमार कार्तिकेय: कुमार कार्तिकेयने उत्तम गोलंदाजी केल्यानंतर मध्य प्रदेशसाठी आपल्या फलंदाजीचीही चमक दाखवली आणि तीही शक्तिशाली विदर्भाविरूद्ध. त्याने जोरदार २६ धावा करून त्याच्या संघाला ३०० धावांपर्यंत पोहोचायला मदत केली आणि त्यानंतर सलामी फलंदाज संजय रघुनाथची महत्त्वाची विकेटही घेतली.

नेहल वढेरा: हा आहे पलटनचा नवीन तारा, नेहल वढेरा! या २२ वर्षीय खेळाडूने अगदी स्टाइलमध्ये खेळात आपली एंट्री केली आहे. त्याने गुजरातविरूद्ध पहिल्याच सामन्यात शतक झळकवले. या देखण्या डावखुऱ्या फलंदाजाने २५५ चेंडूंमध्ये १२३ धावा केल्या आणि पंजाबला सामना ३८० धावांनी जिंकायला मदत केली.

हृतिक शौकीन: दिल्लीची धावसंख्या १०/७ वर गेली होती (खरंच सांगतोय आम्ही!) आणि त्यांना आता लाजिरवाणी हार पत्करावी लागणार असे दिसत होते. मग हृतिक शौकीन आला आणि त्याने आपली कमाल दाखवली. या २२ वर्षीय खेळाडूने ९० चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या. त्यात त्याने नऊ चौकार आणि तीन षटकारही ठोकले. शौकीनने आता दोन एफसीमध्ये दोन अर्धशतकेही केली आहेत.

आकाश माधवाल: उत्तराखंडच्या या जलदगती गोलंदाजाने नवीन चेंडू घेऊन आपल्या संघासाठी महत्त्वाची विकेट घेतली. बंगालविरूद्ध फक्त एक गुण मिळवूनदेखील त्याचा संघ एलिट ग्रुप एच्या पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

*************************************************************

ग्रुप टप्पा| फेरी ३- २७-३० डिसेंबर २०२२

शम्स मुलानी: शम्स मुलानीने एकामागून एक १० विकेट्सचा सपाटाच लावून या सीझनमध्ये आपल्या विकेट्सची संख्या २४ वर नेली आहे. त्यामुळे तो आतापर्यंतचा सर्वाधिक विकेट घेणारा संयुक्तरित्या दुसरा खेळाडू ठरला आहे. मुंबईला निकाल फार चांगले मिळाले नाहीत. परंतु मुलानीने पहिल्या इनिंगमध्ये ४/१०९ ची खेळी केली आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीत ६/६५ वर तो गेला.

सूर्यकुमार यादव: राष्ट्रीय संघात खेळण्यापूर्वी आपल्या शेवटच्या खेळात स्कायने सौराष्ट्रविरूद्ध पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केली. परंतु दुर्दैवाने त्याचे शतक पुन्हा एकदा थोडक्यात हुकले. पहिल्या इनिंगमध्ये त्याने १०७ चेंडूंमध्ये ९५ धावा पटकावल्या आणि त्यामुळे मुंबईला २०० धावांचा टप्पा पार करणे शक्य झाले.

अर्जुन तेंडुलकर: कर्नाटकविरूद्ध गोव्याकडून त्याची फार लक्षात ठेवण्यासारखी खेळी त्याने केली नाही. परंतु या अप्रतिम डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाने पहिल्या इनिंगमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने शतकी खेळी करणाऱ्या रवीकुमार समर्थलाही बाद केले.

कुमार कार्तिकेय: मध्य प्रदेशने रेल्वेविरूद्ध अत्यंत रोमांचक सामन्यात दोन विकेट्सनी विजय प्राप्त केला आणि कुमार कार्तिकेयने गोलंदाजीत आपली कमाल पुन्हा एकदा दाखवली. रेल्वेने पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेतली. परंतु कार्तिकेयने पाच विकेट्स पटकावल्यामुळे सामन्यावर पुन्हा एकदा पकड घेतली गेली आणि त्यांना विजयापर्यंत नेले. (हे तर पलटनचं स्पिरिट आहे, नाही का!)

रमणदीप सिंग: त्याचा सीझनचा हा पहिला सामना त्याच्यासाठी हव्या तशा फलंदाजीचा ठरला नाही. तो लवकर बाद झाला आणि गोलंदाजीतही त्याने त्रिपुराविरूद्ध अत्यंत कठीण सात ओव्हर्स टाकल्या. पण हा सामना वाईट सूर्यप्रकाशामुळे बरोबरीत सुटला.

ईशान किशन: तो पटापट धावा करण्याच्या प्रयत्नात एका इनिंगमध्ये १७ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या आणि बाद झाला. परंतु झारखंडचा खेळ सर्व्हिसेसविरूद्ध सर्व टप्प्यांवर अत्यंत प्रभावी होता आणि त्यांनी या वेळी नऊ विकेट्सनी सामना जिंकला.

ग्रुप टप्पा | फेरी २- २०-२३ डिसेंबर २०२२

सूर्यकुमार यादव: टी-२० क्रिकेटचा नवीन “शहनशाह” अत्यंत स्फोटक खेळ करण्याच्या मूडमध्ये होत. त्याने ८० चेंडूंमध्ये ९० धावा केल्या. त्यात त्याने १२ चौकार आणि एक षटकार ठोकून मुंबईची एकूण धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये ६५१-६ पर्यंत नेऊन आपली धमक दाखवली.

शम्स मुलानी: स्थानिक खेळाडू असलेला शम्स मुलाणी हा या दुसऱ्या फेरीत मुंबईचा शिलेदार ठरला. हैदराबादविरूद्ध खेळताना या डावखुऱ्या स्पिनरने पहिल्या इनिंगमध्ये सात विकेट्स घेतल्या आणि फॉलो-ऑनला भाग पाडल्यानंतर त्याने आणखी चार विकेट्स घेऊन सामन्याची आकडेवारी ११/१७६ वर नेली. ** भारी, एक नंबर**

कुमार कार्तिकेय: प्रमोशन मिळण्याइतकी सुंदर गोष्ट दुसरी कुठलीही नसते आणि कार्तिकेय त्याचा पुरेपूर फायदा उचलेल. चंदीगढविरूद्ध दुसऱ्या सामन्यात त्याला कर्णधारपद मिळाल्यानंतर या कर्णधाराने आपले नेतृत्व सिद्ध केले. त्याने या सामन्यात १० विकेट्स घेतल्या (६/२०, ४/४४) आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.  

हृतिक शौकीन: या २२ वर्षीय खेळाडूने महाराष्ट्रविरूद्ध सामन्यात फारशी चमकदार कामगिरी केली नाही. परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने अत्यंत प्रभावी फलंदाजी केली. त्याने ५५ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. त्यात त्याने दोन वेळा चेंडू सरळ मैदानाबाहेर फटकावला.

आकाश मधवाल: ओदिशाचा कर्णधार सुभ्रांशू सेनापती दोन्ही इनिंग्समध्ये आकाश मधवालच्या गोलंदाजीपुढे बाद झाला. या २९ वर्षीय खेळाडूने सामन्यात तीन विकेट्स घेतल्या आणि उत्तराखंडला आपला दुसरा विजय मिळवून द्यायला मदत केली.

अर्जुन तेंडुलकर: झारखंडविरूद्ध झालेल्या जोरदार सामन्यात अर्जुन तेंडुलकरने पहिल्या इनिंगमध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली आणि २६ ओव्हर्समध्ये १/९० ची कामगिरी केली.

*************************************************************

ग्रुप टप्पा| फेरी १ - १३-१६ डिसेंबर २०२२

ईशान किशन: चट्टोग्राममध्ये भारतीय संघासाठी द्विशतक पूर्ण केल्यानंतर आपल्या पॉकेट डायनॅमोने आपले सहावे फर्स्ट क्लास शतक पूर्ण करताना केरळच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दाक्षिणात्य खेळाडूने १९५ चेंडूंमध्ये १३२ धावा केल्या आणि खेळताना त्याने आठ षटकार आणि नऊ चौकार फटकावले.

अर्जुन तेंडुलकर: आपल्या बहुप्रतीक्षित रणजीच्या पहिल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरूद्ध एक शतक फटकावून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याने २०७ चेंडूंमध्ये १२० धावा केल्या. गोव्याने आधी फलंदाजी करून ५४७-९ ची धावसंख्या उभारली. त्याने आपल्या १२० धावांमध्ये १६ चौकार आणि दोन षटकार फटकावले.

सचिन तेंडुलकरने ११ डिसेंबर १९८८ रोजी खेळलेल्या आपल्या पहिल्या रणजी सामन्यात शतक पूर्ण केले होते. अर्जुन तेंडुलकरने १४ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या पहिल्या रणजी सामन्यात शतक पूर्ण केले. कुटुंबाचा वारसा हा असा आहे!

कुमार कार्तिकेय: जम्मू- काश्मीरविरूद्ध पहिल्या इनिंगमध्ये विकेट मिळाली नसतानाही केकेने नवीन चेंडूने खूप अचूक गोलंदाजी केली (नऊ ओव्हर्समध्ये ०/१४). त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये साहिल लोत्राची महत्त्वाची विकेट घेतली आणि मध्य प्रदेशवर निसटता विजय मिळवून दिला.

आकाश मधवाल: सोविमामध्ये आकाश मधवालसाठी खूप काही करण्यासारखे नव्हते कारण उत्तराखंडच्या उर्वरित गोलंदाजांनी नागालँडच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी इतकी धुंवाधार गोलंदाजी केली की नागालँड चौथ्या इनिंगमध्ये फक्त २५ धावांमध्ये सर्वबाद झाला. रणजीच्या इतिहासातली सातव्या क्रमांकाची सर्वांत कमी धावसंख्या ठरली.

शम्स मुलाणी: या अत्यंत बुद्धिमान डावखुऱ्या फलंदाजाने आंध्र प्रदेशविरूद्ध उत्तम गोलंदाजी केली. त्याने दोन्ही इनिंग्समध्ये तीन विकेट्स घेतल्या. मुंबईने हा पहिला सामना नऊ विकेट्सनी जिंकला.