मुंबई इंडियन्सकडून आपल्या वाढत्या जागतिक क्रिकेट पायासाठी मध्यवर्ती टीमची नेमणूक

#वनफॅमिली जागतिक नेटवर्कमध्ये महेला जयवर्धने आणि झहीर खान यांना नवीन जबाबदारी 

मुंबई इंडियन्सच्या मालकांनी महेला जयवर्धने आणि झहीर खान यांची एमआयसाठी एक जागतिक क्रिकेट वारसा उभारण्याच्या हेतूने नवीन जबाबदाऱ्यांवर बढती दिली आहे.

एमआय #वनफॅमिलीचा विस्तार झाल्यामुळे आता कुटुंबात एमआय एमिरेट्स आणि एमआय केपटाऊन मुंबई इंडियन्ससोबत समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे टीम व्यवस्थापनाला मध्यवर्ती टीम असण्याची गरज भासली. त्यामुळे वन फॅमिली ऑफ टीम्समध्ये मूल्ये, तत्वे आणि शिकवण यांच्याबाबत एकात्मता राहील कारण त्यामुळेच एमआय हा संपूर्ण जगातील सर्वाधिक आवडत्या क्रिकेट ब्रँड्सपैकी एक ठरला आहे. या रचनेच्या बांधणीचा भाग म्हणून महेला जयवर्धने आणि झहीर खान यांना एमआयच्या मूल्य यंत्रणेचे सखोल ज्ञान असल्यामुळे आणि त्यांची कामगिरी सिद्ध झालेली असल्यामुळे नवीन जबाबदाऱ्यांवर पदोन्नती देण्यात आली आहे.

महेला जयवर्धने यांची नेमणूक ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स, एमआय म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रुपच्या संपूर्ण जगातील क्रिकेट ऑपरेशन्सला वरिष्ठ नेतृत्व मिळेल. त्यात एकूणच धोरणात्मक नियोजन, एकात्मिक जागतिक हाय प्रोफाइल पर्यावरण तसेच प्रत्येक टीमच्या कोचिंग आणि पाठबळ रचनेची जबाबदारी या गोष्टींचा समावेश आहे. ते टीमच्या मुख्य प्रशिक्षकांसोबत काम करतील आणि एकात्मता, क्रिकेटचा सातत्यपूर्ण ब्रँड आणि एमआयने निश्चित केलेल्या सर्वोत्तम कार्यपद्धतींची अंमलबजावणी या गोष्टींची काळजी घेतील.

झहीर खान यांची नेमणूक ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट एमआय या पदावर करण्यात आले आहे आणि एमआयचे तत्वज्ञान आणि यश यांचे कारण असलेला टॅलेंट ओळखून खेळाडूंचे ग्रूमिंग यांबाबतचा एमआयच्या प्रोग्रामला विविध प्रदेशांमध्ये राबवणे यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रत्येक प्रदेशासोबत विविध प्रकारची आव्हाने येतात आणि झहीरच्या या नवीन जबाबदारीची ही एक महत्त्वाची भूमिका ठरेल आणि त्यामुळे एमआयच्या जगभरातील टीम्सना मदत होऊ शकेल.

श्री. आकाश एम. अंबानी, रिलायन्स जिओ इन्फोकॉममला महेला आणि झॅक यांना आमच्या जागतिक कोअर टीममध्ये पाहताना खूप आनंद होत आहे. हे दोघेही एमआय कुटुंबाचा अविभाज्य घटक आहेत आणि एमआय ज्य प्रकारच्या क्रिकेटचे तत्वज्ञान वागवते त्याचे ते प्रतीक आहेत. आमच्या जगभरातील टीम्समध्ये हे दोघे अशाच प्रकारचे योगदान देतील आणि जगातील क्रिकेटिंग वातावरणात एक मोठा बदल घडवतील याची मला खात्री आहे.”

एमआयचे ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स श्री. महेला जयवर्धने म्हणाले की,एमआयच्या जागतिक क्रिकेट ऑपरेशन्सचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. सौ. अंबानी आणि आकाशचे नेतृत्व आणि मार्गदर्शन यांच्यामुळे एमआय हा सर्वाधिक मौल्यवान जागतिक क्रिकेट फ्रँचायझी ठरला आहे आणि मला एमआय जागतिक स्तरावर वाढताना पाहून खूप आनंद होत आहे. मी क्रिकेटचा एक शक्तिशाली सर्वसमावेशक ब्रँड उभारण्यासाठीच्या या नवीन जबाबदारीसाठी उत्सुक आहे.

एमआयचे ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट श्री. झहीर खान म्हणाले की, या नवीन जबाबदारीसाठी मी खूप उत्सुक आहे आणि सौ. नीता अंबानी आणि आकाश यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबाबत त्यांचे आभार मानतो. एमआय हे एक खेळाडू आणि प्रशिक्षक टीम सदस्य म्हणून माझे घर आहे आणि आता आम्ही या नवीन प्रवासाला सुरूवात करत असताना मी जागतिक क्रिकेट नेटवर्कमधील सर्व भागधारकांसोबत काम करून कुटुंबात सहभागी होऊ शकेल असे नवीन खेळाडू नक्कीच समोर आणेन अशी मला खात्री वाटते.”