रणजी ट्रॉफी २०२२ अंतिम फेरीः मुंबईला ४२ व्या विजयाची आस, बंगळुरूमध्ये मध्य प्रदेशासोबत सामना
देशांतर्गत क्रिकेटचा बलाढ्य असलेला मुंबईचा संघ रणजी ट्रॉफी २०२२ च्या बुधवार दिनांक २२ जून पासून सुरू होणाऱ्या अंतिम फेरीत मध्य प्रदेशचा सामना करणार आहे. हा सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल.
माजी इंडिया अंडर १९ वर्ल्ड कप विजेता कर्णधार पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ पहिल्या इनिंगमधील आघाडीमुळे उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशला मागे टाकल्यावर आपल्या ४७ व्या रजणी ट्रॉफी अंतिम फेरीत पोहोचला आहे.
मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदारच्या नेतृत्वाखाली मुंबईने रणजी ट्रॉफीच्या मालिकेत आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्यांनी उपउपांत्य फेरीत उत्तराखंडचा ७२५ धावांनी पराभव केला आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वांत मोठा विजय मिळवला. मुंबईने १९३० मध्ये साऊथ वेल्सने केलेला विक्रम मोडीत काढला. त्यांनी क्वीन्सलँडवर ६८५ धावांनी विजय मिळवला होता.
सुरूवातीला मुंबईने गोवा आणि ओदिशाला हरवल्यानंतर एलिट डी ग्रुपमध्येही प्रथम स्थान मिळवले. त्यांचा सौराष्ट्रविरोधातील सामना बरोबरीत सुटला.
त्याचवेळी मध्य प्रदेशने बंगालला दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बंगालला १७४ धावांनी हरवले असून १९९८-९९ च्या सीझननंतर प्रथणच रणजी ट्रॉफी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. मध्य प्रदेशचे विद्यमान प्रशिक्षक हेच त्या वेळ टीमचे कर्णधार होते.
आदित्य श्रीवास्तवच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशने यापूर्वी पंजाबला त्यांच्या उपउपांत्य सामन्यात १० विकेट्सनी हरवले होते.
ग्रुपच्या टप्प्यात मध्य प्रदेशने गुजरात आणि मेघालयला हरवून एलिट ए मध्ये प्रथम स्थान पटकावले. त्यांचा केरळविरूद्धचा सामना बरोबरीत संपला.
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात मुंबईचा संघ सर्वाधिक विजयी झालेला संघ असून त्यांनी विक्रमी ४१ वेळा ट्रॉफी जिंकली आहे. माजी कर्णधार आदित्य तरेच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०१५-१६ सीझनमध्ये रणजी ट्रॉफी जिंकली. त्यांनी अंतिम फेरीत सौराष्ट्रला एक इनिंग आणि २१ धावांनी हरवले.
मुंबई आपल्या ४२ व्या विजयासाठी आतूर आहे तर मध्य प्रदेश आपली सर्वोत्तम खेळी करून रणजी ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्न करेल.
रणजी ट्रॉफी २०२२ च्या अंतिम फेरीच्या सुरूवातीला या काही खेळाडूंवर लक्ष देणे गरजेचे आहेः
कुमार कार्तिकेय
मुंबई इंडियन्सचा स्पिनर कुमार कार्तिकेय हा रणजी ट्रॉफीच्या सध्याच्या फेरीत मध्य प्रदेशसाठी एक हिरा ठरला आहे. या २४ वर्षीय डावखुऱ्या स्पिनरने या सीझनमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पाच सामन्यांमध्ये फक्त १.९२ या सरासरीने २७ विकेट्स घेतल्या आहेत. कार्तिकेय हा त्यांच्या उपांत्य फेरीत बंगालविरूद्ध बॉम्ब ठरला होता. त्याने पहिल्या इनिंग्समध्ये तीन विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये पाच विकेट्स काढल्या.
सरफराज खान
मुंबईचा सरफराज खान हा रणजी ट्रॉफी २०२२ मध्ये आघाडीचा फलंदाज ठरला आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने १३३.८३ इतक्या तडाखेबाज सरासरीने पाच सामन्यांत ८०३ धावा कुटल्या आहेत. माजी अंडर १९ वर्ल्ड कप स्टारने आतापर्यंत तीन शतके आणि दोन अर्धशतके फटकावली असून या सीझनच्या सुरूवातीला सौराष्ट्रविरूद्ध २७५ धावा काढल्या आहेत.
शम्स मुलाणी
मुंबईचा डावखुरा स्पिनर शम्स मुलाणी हा या सीझनमध्ये रणजी ट्रॉफीत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. या २५ वर्षीय खेळाडूने १४.५९ च्या सरासरीने पाच सामन्यांत ३७ विकेट्स घेतल्या. सुरूवातीला ग्रुपच्या टप्प्यात मुलाणीने सौऱाष्ट्रविरूद्ध १६७ धावांसाठी ११ विकेट्स काढल्या आहेत. मुलाणीने गोलंदाजीबरोबरच मधल्या फळीत ४८.६६ च्या सरासरीने २९२ धावा काढल्या आहेत.