रेडी. सेट. आयपीएल मेगा ऑक्शन २०२५!

** Drumroll **

२४-२५ नोव्हेंबर.

तुमचे कॅलेंडर्स मार्क करून ठेवा पलटन. आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो आलाय.

आयपीेल २०२५ मेगा ऑक्शन जेद्दा, सौदी अरेबिया येथे होईल. हा बहुप्रतीक्षित कार्यक्रम २४ नोव्हेंबर रोजी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी संपेल.

कुंग फू पांड्या, रो, सूर्या दादा, बूम बूम आणि तिलक वर्मा आपल्याकडे कायम आहेत. त्यामुळे पाच वेळा आयपीएल चॅम्पियन्स असलेल्या आपल्या टीमकडे ४५ कोटी रूपयांची पर्स आहे.

याशिवाय, महेला जयवर्धनेच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षक चमूने मेगा ऑक्शनदरम्यान एक आरटीएम कार्ड आपल्याकडे ठेवलेले असेल. त्याचा वापर आम्ही रिटेंशनदरम्यान मुक्त केलेल्या खेळाडूंना परत आणण्यासाठी करू शकतो.

वाचा: IPL 2025 mega auction FAQs

चला तर मग… तारखा आणि ठिकाण निश्चित आहे. उत्साह शिगेला पोहोचलाय आणि टीम पुन्हा बांधण्याची वेळ आलीय!

आपले काही टॅलेंटेड खेळाडू लिलावात उतरण्यासाठी फक्त काहीच आठवडे शिल्लक आहेत. ते आपल्या नवीन फ्रँचायझींशी जुळवून घेऊन आपल्या लाडक्या क्रिकेट महोत्सवाच्या आणखी एका सीझनसाठी तयार होतील.