आभारी आहोत २०२२ च्या खेळाडूंनो

आपण आता १६ व्या सीझनमध्ये आलो आहोत. पण या मुक्त केलेल्या खेळाडूंच्या बातमीला स्वीकारणे आमच्यासाठी खूप कठीण आहे.

आपण मान्य करूया. आपण मैदानावर केलेली कामगिरी आणि गुण कोष्टकात आपण ज्या स्थानावर होतो त्यावरून २०२२ चा सीझन आपला नव्हताच. पण आमच्या २५ खेळाडूंनी शेवटापर्यंत दिलेला लढा, आठवणी, जुळलेली नाती आणि त्यांचे योगदान यांच्यामुळे मुंबई इंडियन्सला खास बनवले आणि त्यामुळे २०२२ हे वर्षही खूप स्पेशल होते.

दुर्दैवाने खेळाच्या नियमांनुसार आम्हाला खेळाडूंच्या लिलावापूर्वी काहीजणांना सोडून द्यावे लागले. आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत.

एमआय- सीएसके हा खरोखर एक मोठा सामना आणि सोहळा असतो. त्या दिवशी डॅनियल सॅम्सने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली. पहिल्या सामन्यात ४/३०, दुसऱ्या सामन्यात ३/१६ आणि त्याने आमच्या हृदयात स्थान मिळवले आहे. जयदेव उनादकटने आमच्यासाठी अत्यंत कठीण ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली. त्याच्या ज्येष्ठत्वाचा चांगलाच फायदा झाला. मयंक मार्कंडे २०१८ मध्ये आमच्यासोबत १८ वर्षांचा असताना आला. तेव्हापासून आतापर्यंत तो आत्मविश्वास आणि कौशल्यातही मोठा झाला आहे. बसिल थम्पीने अत्यंत मनापासून गोलंदाजी केली आणि कठीण खेळानंतरही त्याने जोरदार पुनरागमन केले. मुरूगन अश्विनची आमच्या पहिल्या सामन्यातील २/१४ ची खेळी आम्हाला एक सुंदर सुरूवात करून देणारी ठरली.

रायली मेरेडिथ अत्यंत सहजपणे ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करतो. आर्यन जुयाल स्वतःला झोकून देऊन अप्रतिम खेळतो, टायमल मिल्स फलंदाजांना चकवतो, अनमोलप्रीत सिंग नजरबंदी करणारे चौकार-षटकार फटकावतो, फॅबियन एलेन, संजय यादव आणि राहुल बुद्धी टीममध्ये उत्साहाने खळखळणारे झरे आहेत. त्यामुळे २०२२ च्या या आठवणी अविस्मरणीय असतील.

आणि अर्थातच, कायरन पोलार्डला विसरून कसे चालेल. तो कुठेच जात नाहीये. तो अजूनही आपल्यासोबत आहे. परंतु त्याचे युग अधिकृतरित्या संपले आहे. त्याने १३ वर्षांत लाखो आठवणी दिल्या आहेत आणि आम्हाला आनंद साजरा करण्यासाठी अगणित क्षण दिले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स XI मध्ये २०२४ पासून त्याची कमतरता जाणवेल. आमच्या लाँगऑनचे दृश्य आता असे दिसणार नाही.

पुढील सीझन येण्यापूर्वी, लिलाव सुरू होण्यापूर्वी आणि पुन्हा एकदा धमाल मस्ती सुरू होण्यापूर्वी, आपल्या #OneFamily कडून खूप आभार!