बोलीयुद्धेः आयपीएल लिलावांमध्ये एमआय- भाग १ (२००८-२०१२)

पूर्ण तयारी झाली आहे. विश्लेषक, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकदेखील सर्वोत्तम धोरणे ठरवण्यासाठी एकत्र येत आहेत. येत्या शुक्रवारी (२३ डिसेंबर रोजी) कोच्चीमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२३ मिनी लिलावात दिग्गज योद्धे मैदानात उतरणार आहेत.

मागील १५ वर्षांत आम्ही पलटनच्या रोस्टरवर खेळातील काही सर्वांत मोठी नावे आणली आहेत आणि भरपूर टॅलेंट असलेल्या काही खेळाडूंचाही शोध लावला आहे. हा मोठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना मागील काही वर्षांतील आपल्या लिलावांमध्ये काय काय घडले हे जाणून घेऊया.

२० फेब्रुवारी २००८ | मुंबई: पाया रचला गेला

मुंबई शहर तुमचे मूळ असल्याचा पहिली घंटा वाजण्यापूर्वीच सचिन तेंडुलकरला तुमचा महान खेळाडू म्हणून साइन करण्याइतका मोठा फायदा दुसरा काहीच असू शकत नाही.

हा पहिला सीझन होता. क्रिकेटमध्ये लिलाव ही एक नवीन संकल्पना होती परंतु विविध संघांमधल्या लढाया अत्यंत अटीतटीच्या होत्या. रणशिंग फुंकले गेले होते. याच ठिकाणी आम्हाला आमच्या दहा वर्षांत संघाचा पाठीचा कणा असलेले आणि आमच्या अनेक विजयांचे प्रणेते हरभजन सिंग आणि लसिथ मलिंगा मिळाले. सनथ जयसूर्या, रॉबिन उत्थप्पा, शॉन पोलॉक ही फक्त एक टीम नव्हती. ती एक भावना होती आणि आता १५ वर्षांनंतरही ती आमच्या रक्तातून उसळते आहे.

काय होऊ शकले असते असा विचार तुमच्या मनात येत असल्यास कल्पना करा की आम्ही एमएस धोनीला मिळवण्यासाठीही प्रचंड प्रयत्न केले. पलटन, विचार करा आणखी कोण कोण असू शकले असते...

खेळाडू

अंतिम किंमत

सनथ जयसूर्या

९७५,००० यूएसडी

हरभजन सिंग

८५०,००० यूएसडी

रॉबिन उत्थप्पा

८००,००० यूएसडी

शॉन पोलॉक

५५०,००० यूएसडी

लसिथ मलिंगा

३५०,००० यूएसडी

लूट्स बोस्मन

१७५,००० यूएसडी

दिलहारा फर्नांडो

१५०,००० यूएसडी

एश्वेल प्रिंस

१७५,००० यूएसडी

९ फेब्रुवारी २००९ | गोवा: जेपी दुमिनेला ९५,००० यूएसडीची डील

या लिलावामध्ये ४३ परदेशी क्रिकेटपटूही सहभागी होते. आम्ही तरूण दक्षिण आफ्रिकन अष्टपैलू खेळाडू जेपी दुमिनेला खरेदी करून तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत महागडी खरेदी केली. तो फक्त एकच महिन्यापूर्वी पहिल्याच खेळात प्रचंड विजयी घोडदौड करत होता. आयपीएल २००९ दक्षिण आफ्रिकेत झाल्यामुळे त्याने ३७२ धावा अक्षरशः कुटल्या (पाच अर्धशतकांसह) आणि आपल्या ऑफ ब्रेक्सनी महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या.

खेळाडू

अंतिम किंमत

जेपी दुमिने

९५०,००० यूएसडी

कायली मिल्स

१५०,००० यूएसडी

मोहम्मद अश्रफउल

७५,००० यूएसडी

१९ जानेवारी २०१०| मुंबई: पॉलीयुगाचा प्रारंभ

२०१० च्या छोट्या लिलावात अवघ्या २३ वर्षांच्या अष्टपैलू खेळाडूला तब्बल ७५०,००० यूएसडीना खरेदी केल्यानंतर संपूर्ण जगाचे डोळे चमकले होते. तिथल्या प्रत्येकाला तो त्यांच्या संघात हवा होता. परंतु त्या दिवशी मुंबई इंडियन्सने एकमेव आणि सर्वांत मोठी खरेदी केली. कायरन पोलार्ड हा सर्वकालीन सर्वांत महान आयपीएल खेळाडूंपैकी एक ठरला. त्याच्या नावावर पाच आयपीएल आणि दोन सीएल टी२० किताब आहेत. त्याशिवाय आमच्या स्मरणात त्याचे अत्यंत तडाखेबाज स्ट्रोक आणि सामने आहेत. गंमतीचा भाग म्हणजे किंग्स XI पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यादरम्यान बोलीयुद्ध सुरूवातीला सुरू झाले. परंतु त्यानंतर डेक्कन चार्जर्सनीही स्वारस्य दाखवायला सुरूवात केली.  

सीएसके आणि एमआय यांनी मैदानात अटीतटीचे सामने खेळले आहेत आणि लिलावातही पॉलीसाठी त्यांनी जंग जंग पछाडले. या दोन्ही टीम्सच्या बजेटची मर्यादा संपली आणि त्यानंतर एक गुप्त आणि रहस्यमय लिलाव करावा लागला. सीएसकेविरूद्ध आपला सर्वांत प्रसिद्ध विजय होता ना हा? पण आम्हाला सांगा, आपल्या पॉलीला आपण पिवळ्या जर्सीमध्ये पाहू शकतो का? *नाही म्हणजे नाही!*

खेळाडू

अंतिम किंमत

कायरन पोलार्ड

७५०,००० यूएसडी

८ आणि ९ जानेवारी २०११| बंगळुरू: हिटमॅनची घरवापसी

२०११ चा मेगा लिलाव हा सर्व फ्रँचायझींच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. टीम्सना लिलावापूर्वी फक्त चार खेळाडूंना आपल्याकडे राखायची परवानगी देण्यात आली होती. एमआयने सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, कायरन पोलार्ड आणि लसिथ मलिंगा यांना आपल्याकडे ठेवले. या मेगा लिलावात दोन नवीन टीमही सहभागी झाल्या होत्या- कोची तस्कर्स केरळ आणि पुणे वॉरियर्स इंडिया.

परंतु आपल्यासाठी लिलावाची मुख्य घटना दुपारी १२.१८ ते १२.२६ दरम्यान झाली. रोहित शर्मा आला आणि पंजाब, डेक्कन चार्जर्स आणि एमआय यांची तिहेरी बोली सुरू झाली. आपण तर कुठे थांबण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे शेवटी २० लाख अमेरिकन डॉलर्सना रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा खेळाडू झाला. त्यानंतर लगेचच अँड्र्यू सायमंड्सदेखील आला. आपण शेवटपर्यंत सीएसकेला मागे सारून पुढे जात होतो.

खेळाडू

अंतिम किंमत

रोहित शर्मा

२,०००,००० यूएसडी

अँड्र्यू सायमंड्स

८५०,००० यूएसडी

मुनाफ पटेल

७००,००० यूएसडी

डेव्ही जेकब्स

१९०,००० यूएसडी

क्लिंट मॅके

११०,००० यूएसडी

जेम्स फ्रँकलिन

१००,००० यूएसडी

मोइझेस हेन्रिक

५०,००० यूएसडी

एडेन ब्लिझार्ड

२०,००० यूएसडी

४ फेब्रुवारी २०१२ | बंगळुरू: एकामागून एक अष्टपैलूंची बोली

एमआयमध्ये आम्ही जगातले काही सर्वोत्तम सलामीचे फलंदाज ब्लू आणि गोल्ड जर्सी परिधान करून खेळायला उतरलेले पाहिले आहेत. २०१२ मध्ये हर्शेल गिब्सदेखील आला.

आम्ही मिशेल जॉन्सनलाही घेतले. त्याने २०१७ च्या अंतिम फेरीत विजय मिळवून देणाऱ्या शेवटच्या ओव्हरने पलटनच्या यशोगाथेत आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. दुर्दैवाने त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे २०१२ मध्ये त्याला खेळता आले नाही. परंतु तो पुढील वर्षी आमच्या पहिल्या विजयी मोहिमेत सहभागी झाला आणि १७ सामन्यांमध्ये २४ खेळाडू बाद करून आमचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला. आम्ही रॉबिन पीटरसनलाही आमच्याकडे ओढून आणला. मग त्याने आमच्यासाठी पराजयाच्या दाढेतून विजय ओढून आणला. (विश्वास बसत नाही का... पंजाबला विचारा!). 

खेळाडू

अंतिम किंमत

हर्शेल गिब्स

५०,००० यूएसडी

मिशेल जॉन्सन

३००,००० यूएसडी

आरपी सिंग 

६००,००० यूएसडी

रॉबिन पीटरसन

१००,००० यूएसडी

थिसरा परेरा

६५०,००० यूएसडी