लिलाव युद्धः आयपीएल लिलावात एमआय- भाग ३ (२०१८-२०२२)

वर्चस्व गाजवण्यापासून ते स्काय दादाचा शोध लागेपर्यंत, ईशान किशनमधला षटकारांचा राजा जगाला दिसण्यापासून ते आपले काही अत्यंत दिग्गज सुपरस्टार गमावण्यापर्यंत आणि नंतर पुनर्बांधणीपर्यंत. २०१८-२२ या काळातले लिलाव आपल्याला अनेक भावनांमधून घेऊन गेले.

२७ आणि २८ जानेवारी २०१८ | बंगळुरू: आपण केपीजना जाऊ देणार नव्हतो

सीएसके आणि आरआर दोन वर्षांनंतर मैदानात उतरले आणि टीम्सना फक्त पाच खेळाडू ठेवण्याची तसेच दोन आरटीएम ठेवण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे सर्वांसाठीच ही एक नवी सुरूवात ठरली. दिल्लीने त्याला लिलावात आपल्याकडे जवळजवळ खेचून घेतलेच होते. पण आपण त्याला आरटीएम केले. कृणाल पंड्याबाबतही असेच काही घडले. एका टप्प्यावर तर आरसीबी, आरआर आणि एसआरएच हे तिन्ही संघ अटीतटीने लढत होते. त्यामुळे त्याची किंमत ४० लाखांच्या त्याच्या मूळ किमतीवरून २२ पट वाढली. पण, आपणसुद्धा त्याला सोडणार नव्हतोच.

त्यानंतर आपण पुन्हा एकदा मुंबईच्या फलंदाजाला आपल्याकडे खरेदी केले. तो २०११-१३ मध्ये आपल्याकडे होता. सूर्यकुमार यादव ३.४ कोटी रूपयांत एमआयकडे परत आला. जगापुढे त्याची स्काय म्हणून ओळख निर्माण होण्यापूर्वीची ही गोष्ट आहे. तो त्या वर्षी आपल्यासाठी सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज ठरला. तेव्हा १९ वर्षाच्या असलेल्या ईशान किशनने विकेट कीपर्सच्या श्रेणीत उसळी मारली आणि आपण सीएसके आणि आरसीबीला धक्का देऊन या पॉकेट डायनॅमोला आपल्या खिशात घातले.

खेळाडू

किंमत (रूपये)

कायरन पोलार्ड

५.४० कोटी

मुस्ताफिझूर रहमान

२.२० कोटी

पॅट कमिन्स

५.४० कोटी

सूर्यकुमार यादव

३.२० कोटी

कृणाल पंड्या

८.८० कोटी

ईशान किशन

६.२० कोटी

राहुल चहर

१.९० कोटी

इविन लुईस

३.८० कोटी

सौरभ तिवारी

८० लाख

बेन कटिंग

२.२० कोटी

प्रदीप संगवान

१.५० कोटी

जेपी दुमिने

१.० कोटी

जेसन बेहरेनडॉर्फ

१.५० कोटी

शरद लुंबा

२० लाख

सिद्धेश लाड

२० लाख

आदित्य तरे

२० लाख

मयंक मार्कंडे

२० लाख

अकिला धनंजय

५० लाख

अनुकूल रॉय

२० लाख

मोहसीन खान

२० लाख

एमडी निधीश

२० लाख

टीएन ढिलाँ

५५ लाख

१८ डिसेंबर २०१८| जयपूर: मलिंगा... मलिंगा...

तो परत आला! आपला गोलंदाजी मार्गदर्शक असलेल्या मलिंगाने २०१८ मध्ये आपल्या २४ खेळाडूंच्या संघात पुनर्पदार्पण केले. दहा वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०१९ मध्ये आपण त्याला पहिल्यांदा खरेदी केले. आणि त्याने केलेली ती विकेट कीपिंग आणि सामना जिंकून देणारी गोलंदाजी, आपल्या सर्वांच्या मनावर कोरली गेली आहे. कायरन पोलार्डने त्याला उचलून घेतले तेव्हा तर डोळे भरून आले होते.

त्या वेळी एमआयने युवराज सिंगला सहाव्या वेळी खरेदी केले. खर्चाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास बरिंदर स्रान हा त्या सीझनचा सर्वांत महागडा खेळाडू ठरला. १९ वर्षांचा अनमोलप्रीत सिंग, १९ वर्षे वयाखालील विश्वचषक सामन्यातला तरूण आणि ताजातवाना खेळाडू, त्यालाही आपण खरेदी केले आणि तेव्हापासून तो आपल्यासोबत आहे.

खेळाडू

किंमत (रूपये)

लसिथ मलिंगा

२.० कोटी

अनमोलप्रीत सिंग

८० लाख

बरिंदर स्रान

३.४० कोटी

पंकज जैस्वाल

२० लाख

रसिक सलाम

२० लाख

युवराज सिंग

१.० कोटी

१९ डिसेंबर २०१९ | कोलकाता: एल क्लासिकोचे कोल्टर नाइल किक्स

या छोट्या लिलावात सकाळीच पहिलेच आलेले नाव ख्रिस लिनचे होते. आपण बोली खूप उशिरा लावली. आणि अगदी सहजपणे २ कोटी रूपयांच्या त्याच्या मूळ किमतीत तो आपल्याकडे आला. आता ३० वर्षांचा असलेला सौरभ तिवारी आणि ज्याला २००८ मध्ये एमआयच्या संघात १९ वर्षे वयाखालील विश्वचषकातला १९ वर्षीय खेळाडू म्हणून आणण्यात आले होते, तो सुद्धा आपल्याकडे मधल्या फळीसाठी आला.

मग एल क्लासिकोचे नाव लिलावाच्या सभागृहात गुंजले. आपण ही फेरी जिंकली. त्यानंतर फक्त सीएसके आणि आपण १ कोटी रूपयांवरून ८ कोटी रूपयांपर्यंत लढून नॅथन कोल्टर-नाइलला आपल्याकडे खेचून आणले. यावेळी झालेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजेः आपण लीगच्या टप्प्यावर गुणसंख्येत पहिल्या क्रमांकावर आलो, पहिली उपांत्य फेरी जिंकलो, मग ट्रॉफी जिंकलो आणि वर्चस्वदेखील गाजवले.

खेळाडू

किंमत (रूपये)

ख्रिस लिन

२.० कोटी

नॅथन कोल्टर- नाइल

८.० कोटी

सौरभ तिवारी

५० लाख

मोहसीन खान

२० लाख

दिग्विजय देशमुख

२० लाख

प्रिन्स बळवंत राय

२० लाख

१८ फेब्रुवारी २०२१ | चेन्नई: सर्व गोलंदाजांची खरेदी!

छुप्या टॅलेंटला बाहेर आणण्याच्या एमआयच्या धोरणाचा भाग म्हणून मार्को जॅन्सनला आणण्यात आले. तो २० वर्षांचा होता आणि २० लाख रूपये किमतीत फक्त आपण त्याच्यावर बोली लावली आणि त्यानंतर लवकरच तो प्रोटीआजसाठी अष्टपैलू खेळाडू ठरला. २०२१ सीझनच्या पहिल्या काही सामन्यांत त्याच्या वेगाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. त्याने १४० किमी वेगाने गोलंदाजी केली आणि अत्यंत तीक्ष्ण बाऊन्सर्सही टाकले. आपल्यासोबत २०१३ आणि २०२० मध्ये दोन वेळा ट्रॉफी जिंकणारा नॅथन कोल्टर- नाइलदेखील आपल्याकडे या वेळी परत आला. त्याची आणखी एक जुनी टीम दिल्ली कॅपिटल त्याला सहजासहजी सोडायला तयार नव्हती. त्यामुळे त्याची किंमत ५ कोटी रूपयांपर्यंत वाढली.

अर्थात या लिलावात एकूणच चर्चा ज्या खेळाडूबद्दल झाली तो होता क्रिस मॉरिस. त्याला आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे १६.२५ कोटी रूपये इतकी किंमत देऊन खरेदी केले गेले. यात आपली भूमिका खूप महत्त्वाची होती. आपण त्याच्यावर प्रथम बोली लावली आणि १३ कोटी रूपयांपर्यंत प्रयत्न करत राहिलो.

खेळाडू

किंमत (रूपये)

एडम मिल्ने

३.२० कोटी

नॅथन कोल्टर नाइल

५.० कोटी

पियूष चावला

२.४० कोटी

जेम्स नीशम

५० लाख

युधवीर सिंग

२० लाख

मार्को जेन्सन

२० लाख

अर्जुन तेंडुलकर

२० लाख

१२ आणि १३ फेब्रुवारी २०२२| बंगळुरू: रिस्टार्ट करण्याची वेळ

या वेळी दोन नवीन टीम सहभागी झाल्या आणि फक्त चार खेळाडू राखण्याची परवानगी होती. त्यानंतर झालेल्या दोन दिवसांच्या भल्या मोठ्या लिलावात पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्सने फार काही हालचाल केली नाही. पण दुसऱ्या दिवशी ईशान किशनचे नाव आल्यावर आपण आपली बोली लावली. पंजाब किंग्सने ७.५ कोटी रूपयांवर हार मानली. गुजरात टायटन्स मध्ये पडली आणि त्यांनी १२.५० कोटी रूपयांपर्यंत वाट पाहिली. एसआरएचने पुढे ताणून धरल्यानंतरही १५.२५ कोटी रूपयांमध्ये पॉकेट डायनॅमो आपल्याकडे परत आला.

आपला सुपर आर्चर जोफ्राचीही अशीच गोष्ट झाली. तो दुखापतग्रस्त होता आणि २०२२ चा सीझन खेळणार नाही हे जवळपास स्पष्ट होते. परंतु त्याचे फक्त नावच पुरेसे होते. त्याची आधीची फ्रँचायझी असलेली राजस्थान रॉयल्स त्याला सहजपणे सोडायला तयार नव्हती. त्यांनी ६.२५ कोटी रूपयांपर्यंत ताणले, मग एसआरएच स्पर्धेत उतरली. पण आपणसुद्धा सज्ज होतो. मग ८ कोटी रूपयांवर बुमरा-आर्चर जोडीचे स्वप्न सत्यात उतरले. टिम डेव्हिडलाही आपण ८.२५ कोटी रूपयांत घेतले. त्याला आपण अगदी सुरूवातीपासून लढत असलेल्या केकेआरच्या ताब्यातून हिसकावून घेतले. या लिलावातून आणखी एक जोडी आपल्याकडे आली. डीबी-टीव्ही, आपले भविष्यातले सुपरस्टार्स आणि पक्के मित्रसुद्धा.

खेळाडू

किंमत (रूपये)

तिलक वर्मा

१.७० कोटी

रमणदीप सिंग

२० लाख

राहुल बुद्धी

२० लाख

अनमोलप्रीत सिंग

२० लाख

डेवाल्ड ब्रेविस

३.० कोटी

आर्यन जुयाल

२० लाख

ईशान किशन

१५.२० कोटी

आर्शद खान

२० लाख

जयदेव उनादकट

१.३० कोटी

मयंक मार्कंडे

६५ लाख

जोफ्रा आर्चर

८.० कोटी

टायमल मिल्स

१.५० कोटी

रायली मेरेडिथ

१.० कोटी

मुरूगन अश्विन

१.६० कोटी

बसिल थम्पी

३० लाख

हृतिक शौकीन

२० लाख

अर्जुन तेंडुलकर

३० लाख

संजय यादव

५० लाख

डॅनियल सॅम्स

२.६० कोटी

टिम डेव्हिड

८.२५ कोटी

फॅबियन एलन

७५ लाख