विजय हजारे ट्रॉफी २०२२: आपल्या मुलांनी काय केले
अलीकडेच पार पडलेल्या आणि मेगा २०२३ आयपीएल सीझनचा पाया ठरणाऱ्या भारतीय देशांतर्गत मर्यादित ओव्हरच्या मालिकेतील संक्षेपातील कामगिरी पाहा. आपले सहा खेळाडू आपापल्या राज्यांच्या टीम्सचा भाग होते आणि त्यांनी विजय हजारे ट्रॉफी २०२२ मध्ये केलेली कामगिरी आणि त्यांची धावसंख्या खालीलप्रमाणे आहे.
तिलक वर्मा
आता यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. आपल्याला आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही. दोन शतकी खेळ्या, एक अर्धशतकी खेळी करून आमच्या या लाडक्या खेळाडूने भारतीय देशांतर्गत मालिकेत तर धावांचा पाऊस पाडलाच पण भारताच्या आगामी बांग्लादेश मालिकेच इंडिया ए स्थान पटकावले. त्याने हैदराबादसाठी १०६ चेंडूंमध्ये १३२ धावा करून सर्वांचे डोळे दिपवले. हिमाचल प्रदेशविरूद्ध झालेल्या या सामन्यात त्याने १० चौकार आणि तीन षटकार मारले.
काही सामन्यांनंतर तो सौराष्ट्रविरूद्ध स्लॉग ओव्हर्समध्ये खेळायला आला. त्याने ३६ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या आणि आणखी काही सामन्यांनंतर त्याने सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरी केली- त्याने मणिपूरविरूद्ध सामन्यात २/२७ अशी गोलंदाजी केली आणि ७७ चेंडूंमध्ये १२७ धावा फटकावल्या. त्याचा हा धावांचा पाठलाग गुजरातविरूद्धही सुरूच राहिला. त्यामुळे टीमच्या इतर फलंदाजांना पुरेसा वेळ मिळू शकला.
हिमाचल प्रदेशविरूद्ध - १३२*
त्रिपुराविरूद्ध – ७ आणि ०/१५
सौराष्ट्रविरूद्ध - ४५
उत्तरप्रदेशविरूद्ध – २२
मणिपूरविरूद्ध - १२६* आणि २/२७
गुजरातविरूद्ध - ६५
चंदीगढविरूद्ध - ५
रमणदीपसिंग
सिंग इज किंग! रमणदीपने या वर्षी पंजाबसाठी खरोखर खेळाचा राजा म्हणता यावेत अशी कामगिरी केली आहे. या अष्टपैलू खेळाडूने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपासून आपला खेळ सुरू केला आणि त्याने प्रतिस्पर्धी संघांच्या चिंध्या केल्या आहेत. त्याने अत्यंत जहाल फायफरसोबत बडोदाच्या फलंदाजांचा धुव्वा उडवून सुरूवात केली. ओदिशाविरूद्ध नंतर झालेल्या एका सामन्यात पंजाबचा संघ ५ खेळाडू बाद होऊन १६८ धावांवर असताना ३६* धावा करून त्यांना २३२ धावांच्या पाठलागात सुरक्षितपणे विजय मिळवून दिला.
बडोदाविरूद्ध - ५/१७
जम्मू आणि काश्मीरविरूद्ध - १५* आणि ०/२३
मध्य प्रदेशविरूद्ध – २९ आणि ०/७
ओदिशाविरूद्ध - ३६* आणि ०/१७
नागालँडविरूद्ध - ०/१५
कर्नाटकविरूद्ध – १७ आणि ०/२६
अर्जुन तेंडुलकर
हा मुंबईचा खेळाडू गोव्यात चांगलीच धमाल करतोय असे दिसते. या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाने या सीझनमध्ये काही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि आपल्या संघाला बिहार आणि अरूणाचल प्रदेशविरूद्ध सामने जिंकायला मदत केली. त्याने विकाश रंजनला अत्यंत कमी धावांवर बाद केले आणि त्यानंतर स्थिरावलेल्या सूर्यवंशला ६३ धावांवर बाद केले. त्याने अरूणाचल प्रदेशविरूद्ध केलेल्या गोलंदाजीत फक्त २८ धावा दिल्या.
अत्यंत कमी धावा देणारा आणि विकेट्सही घेणारा गोलंदाज. दुसरे काय हवे असते!
आंध्रप्रदेशविरूद्ध - ०/१५
बिहारविरूद्ध – २/३२
केरळविरूद्ध - २* आणि ०/५७
तामिळनाडूविरूद्ध– २/६१
अरूणाचलविरूद्ध– १/२८
छत्तीसगढविरूद्ध - ९* आणि २/४४
हरयाणाविरूद्ध - १४* आणि १/२२
कुमार कार्तिकेय
हा डावखुरा स्पिनर निवड समितीच्या नजरेत भरला नाही तरच नवल वाटेल. अत्यंत प्रभावी रणजी आणि स्मॅट सीझननंतर कुमार कार्तिकेयने विजय हजारे ट्रॉफीमध्ये नागालँडविरूद्ध अप्रतिम खेळ केला. त्याने त्यांच्या दोन सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंना बाद केले.
या २४ वर्षीय खेळाडूने त्यांचा कर्णधार होकाइतो झिमोमी यांना विकेट्ससमोर बाद करण्यापूर्वी श्रीकांत मुंडेलाही बाद केले. हे सर्व त्याने फक्त २.५१ च्या सरासरीने साध्य केले. यालाच तर कडक परफॉर्मन्स म्हणतात!
जम्मू आणि काश्मीर - ०* आणि १/३२
ओदिशाविरूद्ध – १/२३
उत्तराखंडविरूद्ध - ९* आणि १/४५
पंजाबविरूद्ध - ६ आणि ०/४३
नागालँडविरूद्ध – २/१८
बडोदाविरूद्ध– १/०
आकाश माधवाल
उत्तराखंडचा हा उजव्या हाताने खेळणारा खेळाडू, आकाश माधवाल याने या वर्षी फलंदाजीची सुरूवात केली आणणि सहा सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतल्या. त्याने नागालँडविरूद्ध आपला सर्वोत्तम खेळ करत दोन विकेट्स घेतल्या आणि त्यांच्या पहिल्या फळीचे कंबरडे मोडले.
त्याने खूप मोठ्या विकेट्स घेतल्या नाहीत तरीही धावांचा वेग रोखण्याची त्याची क्षमता या सीझनमध्ये त्याच्या संघासाठी खूप उपयोगी पडली.
ओदिशाविरूद्ध – ०/२०
पंजाबविरूद्ध – ८ आणि १/५४
मध्य प्रदेशविरूद्ध - ० आणि १/६०
नागालँडविरूद्ध– २/२३
बडोदाविरूद्ध – १३ आणि ०/२४
जम्मू आणि काश्मीरविरूद्ध– ०/३०