विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५: ब्लू अँड गोल्डची आपली टीम गाजवण्यासाठी सज्ज आहे

देशांतर्गत क्रिकेटच्या स्पर्धा आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ चा सीझन संपवून विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ कडे चालल्या आहेत. आपले ब्लू अँड गोल्डमधले बॉइज आगामी लिस्ट ए स्पर्धेसाठी मैदानात उतरायला तयार आहेत.

अलीकडेच झालेल्या स्मॅट स्पर्धेत धमाल केल्यानंतर एमआयचे प्रतिनिधी हाच तूफानी वेग खेळाच्या थोड्या मोठ्या स्वरूपात कायम ठेवण्यासाठी उत्सुक आहेत.

२०२३-२४ मधल्या ५० ओव्हरच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात हरयाणाने राजस्थानचा ३० धावांनी पराभव करून पहिलावहिला विजय नावावर नोंदवला.

या वेळी आपल्याकडचे काही खेळाडू आपल्या टीम्सचे नेतृत्व करतील.

आपला स्काय तर त्याचा फॉर्म कायमच राखणार आहे. त्याच्या या फॉर्ममुळे स्मॅट २०२४ मध्ये मुंबईच्या यशात मोठा वाटा उचलला. तिलक भाऊ हैदराबादचे नेतृत्व करेल आणि त्यांच्या पहिल्यावहिल्या ट्रॉफीसाठी प्रयत्न करेल.

दरम्यान दीपक चहर राजस्थानच्या गोलंदाजी युनिटचे नेतृत्व करेल तर आंध्र प्रदेशचा सत्यनारायण राजू स्मॅट २०२४ मध्ये जेवढ्या विकेट्स घेतल्या त्यापेक्षा जास्त म्हणजे सातपेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा प्रयत्न करेल.

गोव्याच्या अर्जुन तेंडुलकरने मागच्या सीझनमध्ये सहा सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आणि आता तो एक पाऊल पुढे जाण्यासाठी उत्सुक असेल.

विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचे खालील खेळाडू सहभागी होतील.

खेळाडू

टीम

ग्रुप

अर्जुन तेंडुलकर

गोवा

सत्यनारायण राजू

आंध्र प्रदेश

बी

दीपक चहर

राजस्थान

सूर्यकुमार यादव

मुंबई

सी

तिलक वर्मा (कर्णधार)

हैदराबाद

श्रीजित कृष्णन

कर्नाटक

नमन धीर

पंजाब

अश्वनी कुमार

पंजाब

राज बावा

चंदीगढ

डी

पलटन, आपल्याला काय करायचे आहे हे आपल्याला माहीत आहे! स्पर्धा २१ डिसेंबर २०२४ रोजी सुरू होतेय. त्यामुळे ब्लू अँड गोल्डमधल्या आपल्या टीमला चीअर अप करा आणि उत्तम कामगिरीसाठी पाठिंबा द्या! विसरू नका!