स्वागत आहे, जेसन बेर्हेन्डॉर्फ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत झालेल्या लिलावपूर्व व्यवहारात ऑस्ट्रेलियन डावखुरा स्विंग गोलंदाज जेसन बेर्हेन्डॉर्फ आपल्या मुंबई इंडियन्सच्या तंबूत परतला आहे. २०१९ मध्ये आपण आयपीएल चषक जिंकला तेव्हा त्या टीमचा महत्त्वाचा भाग तो होता. आता त्याचे पुनरागमन झाल्यामुळे आमच्याकडे संघात वातावरण आहे.
जेसनने २०१९ मध्ये आपल्यासाठी पाच सामने खेळले. त्यापूर्वी त्याने सीएसकेविरूद्ध जोरदार प्रवेश केला होता. त्याने ४-०-२२-२ अशी खेळी केली होती. सीझनच्या शेवटपर्यंत तो आपल्यासोबत राहू शकला नाही कारण त्याला ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघात विश्वचषकासाठी बोलावण्यात आले होते.
तसे सांगायचे झाले तर जेसन एमआयखेरीज इतर कोणत्याही संघासाठी खेळलेला नाही. २०२१ मध्ये सीएसकेने त्याला बदली खेळाडू म्हणून आणले आणि २०२२ मध्ये तो ७५ लाख रूपयांच्या किमतीत आरसीबीच्या संघासाठी आला. पण... पण... तो एकही सामना खेळलाच नाही.
बेर्हेन्डॉर्फने ऑस्ट्रेलियासाठी नऊ टी२०आय सामने खेळले आहे. त्यात त्याने ७ विकेट्स घेतल्या आणि त्याचा सर्वोत्तम खेळ २१ धावा देऊन ४ विकेट्स घेण्याचा होता. त्याने आतापर्यंत १०५ टी२० सामने खेळले आहेत आणि ७.४१ च्या सरासरीने ११७ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये ८.६८ च्या सरासरीने त्याच्या नावावर पाच सामने आहेत.
ब्लू आणि गोल्ड या आपल्या रंगात तुझं पुन्हा स्वागत आहे. चला आपला किल्ला मजबूत करूया! कधी येतोय सीझन!