घरी स्वागत आहे...
झालं आता, ठरलंय. आता फार विचार करायची गरज नाहीये. कॅल्क्युलेटर्ससुद्धा बाजूला ठेवून द्या. कितीतरी आठवडे विचार आणि चर्चा केल्यानंतर २०२३ चा संघ आता ठरला आहे. तर आता आपण आपल्या #OneFamily मधल्या खेळाडूंची ओळख करून देऊया.
कॅमेरॉन ग्रीन: जोरदार फटकेबाजी करणाऱ्या आणि मध्यमगतीपेक्षा थोड्या जास्त वेगाने गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूचं मुंबई इंडियन्समध्ये आता आगमन झालंय. तो आपल्यासाठी एक उत्तम अष्टपैलू खेळाडू ठरेल. कॅमेरॉन ग्रीन हे पश्चिम ऑस्ट्रेलियातलं एक बडं प्रस्थ. दिल्ली कॅपिटल्ससोबत अत्यंत अटीतटीचं बोलीयुद्ध झाल्यानंतर तो आपल्याकडे आला आहे. त्याच्या करियरचा ग्राफ आजपर्यंत खाली आलेला नाही. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात लक्ष वेधून घेण्यापासून ते एशेसमध्ये केलेली कामगिरी ते भारतीयांविरूद्ध तोफखानाच उघडण्यापर्यंत आणि ऑस्ट्रेलियाच्या २०२२ वर्ल्ड कपमध्ये टी२० संघात स्थान मिळेपर्यंत आणि आता एक भलीमोठी आयपीएल खिशात टाकणं, या सगळ्या गोष्टी तर फक्त एक सुरूवात आहेत.
झे रिचर्ड्सन: आपल्याकडे आता ‘जे’ चं वर्चस्व वाढलंय. जसप्रीत, जोफ्रा, जेसन आणि आता झे. गोलंदाजीची ही जनरेशन जे म्हणायला हवी. वानखेडेवर चांगले जलदगती आणि बाऊन्स टाकता येतात आणि त्यामुळे १५० किमीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणाऱ्यांसाठी ही खास जागा आहे. रिचर्ड्सन हा आणखी एक पश्चिम ऑस्ट्रेलियन असून तो आपले धमाकेदार तोफगोळे कसे वापरतो हे पाहणं रोमांचक ठरेल.
पियूष चावला: आपला हा अत्यंत बुद्धिमान आणि जुना खेळाडू २०२१ नंतर आपल्याकडे परत आलाय. लेग ब्रेक्स, गुगली, टॉप स्पिनर्स, १२० किमीने गोलंदाजी, डेथ ओव्हर्समध्ये भरपूर धावा, काय नाहीये त्याच्या भात्यात तेवढं विचारा. आपल्याकडे तरूण स्पिनर्स असताना हा ३४ वर्षीय खेळाडू आपल्यासाठी अत्यंत उत्तम अनुभव आणणारा आहे.
डुआन जेन्सन: नेटमधला गोलंदाज ते मुंबई इंडियन्सचा गोलंदाज. तुम्हाला एखादी काळजाला भिडणारी गोष्ट ऐकायची असेल तर इथेच थांबा. डुआन जेन्सन हा माजी एमआय गोलंदाज मार्को जेन्सनचा जुळा भाऊ आहे. त्याची उंची ६ फूट ८ इंच आहे आणि सातत्याने १४० किमीने गोलंदाजी करण्याची त्याची ही क्षमता फलंदाजांना नक्कीच धडकी भरवेल.
नेहाल वढेरा: पंजाबचा २२ वर्षीय तरूण फलंदाज आणि भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा २०१९ मधला खेळाडू आता रोहित शर्मा, स्काय, ईशान किशान, डेवाल्ड ब्रेविस यांच्या यादीत आला आहे.
राघव गोयल: मुंबई इंडियन्सच्या अत्यंत नवीन आणि नवख्या टॅलेंटला वाव देण्याच्या योजनेचा भाग म्हणून राघव गोयल हा २०२३ च्या सीझनसाठी अत्यंत योग्य आहे. डावखुरा फलंदाज, डावखुरा स्पिनर तर तो आहेच. त्यामुळे आता तो सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरेल.
शम्स मुलानी: मुंबईचा मुलगा घरी परतलाय! अनेक वर्षं त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर आणि कितीतरी कौशल्यं मिळवल्यानंतर शम्स मुलानी हा आपला खेळाडू, अष्टपैलू आहे आणि तो आता एमआयसाठी खेळायला सज्ज आहे. तो अत्यंत सुंदर डावखुरी गोलंदाजी करतो आणि गरज पडल्यावर विकेट्सही घेऊ शकतो. वानखेडे म्हणजे त्याच्या घरचं अंगण आहे. त्यामुळे अंगणात त्याच्या खेळाला बहर येईल अशी आशा करायला हरकत नाही.
विष्णू विनोद: केरळातून थेट आलाय! एक अप्रतिम विकेट कीपर आणि अनुभवी मधल्या फळीतला फलंदाज असलेला विष्णू विनोद आपल्या २४ खेळाडूंचा संघ पूर्ण करतोय. आजचा दिवस खरोखर खास आणि समाधान देणारा होता.
मुंबई इंडियन्सचा २०२३ चा संघ:
खेळाडू |
किंमत |
कॅमेरॉन ग्रीन |
१७.५ कोटी रूपये |
झे रिचर्डसन |
१.५ कोटी रूपये |
पियूष चावला |
५० लाख रूपये |
डुआन जेन्सन |
२० लाख रूपये |
नेहल वढेरा |
२० लाख रूपये |
राघव गोयल |
२० लाख रूपये |
शम्स मुलाणी |
२० लाख रूपये |
विष्णू विनोद |
२० लाख रूपये |
रोहित शर्मा |
कायम |
सूर्यकुमार यादव |
कायम |
ईशान किशन |
कायम |
जोफ्रा आर्चर |
कायम |
जसप्रीत बुमरा |
कायम |
डेवाल्ड ब्रेविस |
कायम |
तिलक वर्ममा |
कायम |
ट्रिस्टन स्टब्स |
कायम |
आकाश माधवाल |
कायम |
अर्जुन तेंडुलकर |
कायम |
अर्शद खान |
कायम |
हृतिक शौकीन |
कायम |
जेसन बेहरेनडॉर्फ |
कायम |
कुमार कार्तिकेय |
कायम |
रमणदीप सिंग |
कायम |
टिम डेव्हिड |
कायम |