News

प्रत्येक एडलेडचं उत्तर, गब्बा देणार!

By Mumbai Indians

भारताचा पर्थवर दणदणीत विजय, एडलेडवर ऑस्ट्रेलियाचे प्रत्युत्तर, थोडी धमाल आणि मजामस्ती. लेडीज अँड जेंटलमन, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा तिसरा रोमांचक सामना सुरू होणार आहे.

सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे आगामी तीन सामने अत्यंत मसालेदार होतील आणि डब्ल्यूटीसी २०२४-२५ गुणतक्त्याची गुंतागुंत वाढवतील.

मागच्या सामन्यात एडलेड ओव्हलवर झालेल्या १० विकेट्सनी पराभवाने आपल्या सर्वांना दुःख झाले आहे. परंतु सगळे संपलेले नाही.

तुम्हाला २०२१ ची मालिका आठवतेय का? भारतीय क्रिकेट टीमने एडलेडवर ३६ ऑल आट सामन्यातून अप्रतिम कमबॅक केला आणि अत्यंत कठीण परिस्थितीत ब्रिस्बेनचा सामना जिंकला. आपम ३२ वर्षांनी ऑसीजना त्यांच्या बालेकिल्ल्यात पहिल्या पराभवाची चव चाखवली होती.

आता आपल्याला गब्बाचा अहंकार तुटल्याचा क्षण परत एकदा जगायचा आहे! 👇

हा विजय भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कसोटी विजयांपैकी एक ठरला. सोशल मीडियावर तर या विजयाने चांगलाच धुमाकूळ घातला.

गब्बा कसोटी या चालू मालिकेच्या तिसऱ्या सामन्यापूर्वी आपण गब्बा २०२१ कामगिरी साजरी करणाऱ्या सर्वोत्तम X (पूर्वीचे ट्विटर) वरील प्रतिक्रियांचा अनुभव घेऊया!