
MI Junior 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या विजयात अद्वैत तिवारी (६ विकेट) चमकला
विक्रोळीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने मुंबईत सुरू असलेल्या एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट सुपर नॉकआउट स्पर्धेत गुरुवारी माटुंगा प्रीमियर स्कूलचा 7 विकेट राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना, माटुंगा प्रीमियर स्कूलने सलामीवीर हर्षवर्धन सातारकरच्या 58 धावांच्या खेळीच्या जोरावर १२९ धावा केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचा कर्णधार अद्वैत तिवारीने (6/24) अप्रतिम गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना हादरवले. आंबेडकर विद्यालयाने १३० धावांचे माफक लक्ष्य 26.1 षटकांत 3 विकेटच्या बदल्यात पार केले. सलामीवीर अर्णव शेलारने (45) संयमी खेळी करताना मोठ्या विजय सुकर केला.
15 वर्षांखालील मुली गटात पराग इंग्लिश स्कूलने ओंकार इंटरनॅशनल स्कूलवर 10 विकेट राखून मात केली. सोनाली सावच्या (8/4) शानदार गोलंदाजीमुळे ओंकार इंटरनॅशनल स्कूलचा डाव अवघ्या 26 धावांत आटोपला. पराग इंग्लिश स्कूलने 27 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग एकही विकेट न गमावता केवळ 1.3 षटकांत धावांचा पाठलाग केला.
संक्षिप्त धावफलक:
14 वर्षांखालील मुले:
• डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय (विक्रोळी) - 26.1 षटकांत 3 बाद 133 (अर्णव शेलार 45, सन्मित कोठमिरे 20) विजयी वि. माटुंगा प्रीमियर स्कूल - 36.3 षटकांत सर्वबाद 129 (हर्षवर्धन सातारकर 58, अद्वैत तिवारी 6/24, नरेश गोधा 2/15).
• आर.आर. एज्युकेशन ट्रस्ट (मुलुंड) - 40 षटकांत 7 बाद 189 (अथर्व वाडयेकर 52, मेध दैय्या 44, समीक्ष नायर 26; अथर्व फेगडे 2/39, करण कांबळे 2/48) विजयी वि. आदर्श इंग्लिश स्कूल (ठाणे) - 35 षटकांत सर्वबाद 140 (सर्वेश ६८, आर्यन पवार 24; मेध दैया 3/22, जय ठक्कर 3/37, शौर्य नवले 2/16).
15 वर्षांखालील मुली:
• पराग इंग्लिश स्कूल (भांडुप) - 1.3 षटकांत बिनबाद 27 (तनिषा शर्मा नाबाद 13) विजयी वि. ओंकार इंटरनॅशनल स्कूल -12.5 षटकांत सर्वबाद 26 (सोनाली साव 4/8, राजसी 2/5, पूर्वी तिवारी 2/5).
• सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल (वांद्रे) - 5.1 षटकांत 1बाद 63 (ऋतुजा वांधे नाबाद 25) विजयी वि. सेंट अलॉयसियस हायस्कूल - 9.3 षटकांत सर्वबाद 61 (ऐश्वर्या सुब्बय्या 3/14).
{{comment.comment_text}}
{{reply.comment_text}}