News

१३ डिसेंबर आवडण्याची २०८ कारणे!

By Mumbai Indians

२०९२६४ २०८* — या संख्या तुम्हाला ओळखीच्या वाटत असतील, म्हणजे अर्थातच ओळखीच्या आहेत, तर तुम्ही हिटमॅनचे फॅन आहात!

२०१७ मध्ये #OnThisDay, आमच्या आरओने विक्रमी तिसरे ओडीआय शतक झळकवताना १३ चौकार आणि १२ षट्कारांची बरसात केली. मोहालीत आपण श्रीलंकेवर १४१ धावांनी दणदणीत विजय मिळवला तेव्हा तिथली गारेगार थंडी पळून गेली होती.

ही आठवण आणखी महत्त्वाची ठरली कारण याच दिवशी आपल्या तोडफोड रोहित शर्माचा रितिका साजदेसोबत विवाहाची दुसरी एनीव्हर्सरी होती.

आणखी हा महोत्सव सामान्य नव्हता. त्याने हा टप्पा पार केल्यानंतर मरंगळीचे (लग्नाची अंगठी घातलेले बोट) चुंबन घेतले आणि आपल्या पत्नीला प्रेमाची भेट दिली. आहा, रोहितभाऊ... आमच्या तोंडातून एकच उद्गार निघाला...“यार हा किती ऑसम आहे यार!” 🥹

तर, आपण या अप्रतिम खेळाच्या काही अविस्मरणीय क्षणांची उजळणी करूया... मग वाट कसली पाहताय

त्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची तयारी

रोहित शर्माचा ट्रेडमार्क पुल शॉट आपल्या नजरेला एक मेजवानीच असतो! 🤩

**********

काम फत्ते… पण पिक्चर अजून बाकी आहे मित्रा!

१००* (११५) | एक मिनिट भावांनो अजून फक्त सुरूवात आहे.

**********

बोरिवली फास्ट लोकल, ताशी १५० किमीने धावतेय!

१५०* (१३३) | प्रत्येक स्टेशन बॉलरला स्टाइलमध्ये उडवत चाललीय.

**********

पहिल्यांदाच इतकी मजा आली की रो ने ते तीनदा परत परत केलं!

२०८* (१५३) | सूर्यमंडळातला एकच माणूस हे शक्य करू शकतो.

**********

… आणि तुम्ही टीम इंडियासोबत असाल तर तुमची ही अद्भुत कामगिरी केक स्मॅश केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही! 🥳

पलटन, रोहित शर्मा- रितिका साजदे यांना त्यांच्या खास दिवशी शुभेच्छा द्या. इतक्या शुभेच्छा द्या की कमेंट बॉक्स ओसंडून वाहिला पाहिजे. श्रीलंकन संघाविरूद्ध त्याच्या या युगानयुगातल्या सर्वोत्तम क्लासिकच्या आठवणींनाही उजाळा द्या, बरं का! ⤵️