
पाच आयपीएल, दोन सीएलटी२० आणि एक डब्ल्यूपीएल- सर्व ट्रॉफी विजेत्या अंतिम सामन्यांच्या आठवणींना उजाळा
“एमआयमध्ये जिंकणं सर्वकाही होतं. आम्ही त्याला एमआय एटिट्यूड म्हणायचो” – एमआयचा महान खेळाडू अंबाटी रायाडूचं हे वक्तव्य टी२० स्पर्धांमध्ये मुंबई इंडियन्सचा दैदिप्यमान इतिहास दर्शवतं.
सर्वांसाठी एक आणि एकासाठी सर्व याच दृष्टीकोनातून ब्लू आणि गोल्डला यशाचा पाठलाग करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मिळाली असेल तर अपयशाच्या खाईतून यश खेचून आणणं आणि स्पर्धेत मोठी उडी घेणं हे वाक्यप्रचार एमआयने आपल्या संपूर्ण प्रवासात आव्हानांचा सामना केला आणि मेन्स आणि विमेन्स क्रिकेटमध्ये चॅम्पियन कसे झाले या प्रश्नाचं सार आहेत.
आता आपण डब्ल्यूपीएल आणि आयपीएल २०२४ च्या काऊंटडाऊनला सुरूवात करत असताना एमआय ट्रॉफी कॅबिनेटमध्ये जास्तीत जास्त सोनं आणलेल्या त्या अविस्मरणीय सामन्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत.
1. एमआय विरूद्ध आरसीबी, चॅम्पियन्स लीग टी२० २०११ अंतिम सामना- ‘इच्छा असते तिथे मार्ग मिळतोच!’
दुखापतग्रस्त आणि अननुभवी खेळाडू. पण प्रचंड आत्मविश्वास या गोष्टींचा मेळ घालून हरभजनसिंगने आरसीबीविरूद्ध मुंबई इंडियन्सला ३१ धावांनी विजय मिळवून दिला. जेम्स फ्रँकलिनच्या २९ चेंडूंमध्ये ४१ धावा आणि आपला दादा सूर्याच्या १७ चेंडूंमध्ये २४ धावांमुळे एमआयचा दिवस चांगला गेला. त्यांनी आपल्या गोलंदाजांना बचाव करण्यासाठी १३९ धावा दिल्या. भज्जीची (३/२०) आणि युजवेंद्र चहल (२/९) यांच्या स्पिनने बंगळुरूच्या फलंदाजांना धुवून काढले. त्यांचा संघ ४ ओव्हर्समध्ये ३८/० वरून १९.२ ओव्हर्समध्ये सर्वबाद १०८ पर्यंत घरंगळला. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे या सामन्यात एमआयने २० जादा धावा (२ बाय, १ लेग बाय, १ नो बॉल आणि वाइड १४) देऊनसुद्धा हा विजय मिळवला.
2. एमआय विरूद्ध सीएसके, आयपीएल २०२३ अंतिम सामना- ‘नशीब हरले, इतिहासाची रचना झाली’
विजयी अश्वमेधाची सुरूवात! सीएसकेविरूद्ध कायरन लॉर्ड पोलॉर्डचा जबरदस्त खेळ (३२ चेंडूंमध्ये ६० नाबाद धावा) आणि अंबाटी रायाडूकडून झालेली मदत (१४८/९). हरभजन (२/१४), मिशेल जॉन्सन (२/१९) आणि लसिथ मलिंगा (२/२२) यांनी चेन्नईच्या फलंदाजीला २० ओव्हर्समध्ये १२५/९ पर्यंत आणले. ब्लू आणि गोल्डचा डंका इडन गार्डन्सवर दुमदुमला आणि आपण आयपीएल २०१० अंतिम सामन्यातला पराभवावर उतारा काढला.
3. एमआय विरूद्ध आरआर, चॅम्पियन्स लीग टी२० २०१३ अंतिम सामना- टर्बिनेटरचा उदय... पुन्हा एकदा
२०११ - सीएलटी२० मध्ये विजय आणि सामनावीर पुरस्कार
२०१३ - सीएलटी२० मध्ये विजय आणि सामनावीर पुरस्कार
हरभजन सिंगचा मुंबई इंडियन्ससाठी सीरियल पुरस्कार विजेता म्हणून वारसा अद्भुत होता. एक कर्णधार म्हणून चषक जिंकल्यानंतर (२०११), भज्जीने त्यानंतरच्या आवृत्तीत आपल्या विजयी क्षमतेचं प्रदर्शन पुन्हा एकदा घडवलं. ड्वायने स्मिथ (४४), ग्लेन मॅक्सवेल (३७) आणि रोहित शर्मा (३३) यांच्या अप्रतिम खेळानंतर एमआयने धावफलकावर दणदणीत धावा (२०२/६) नोंदवल्या. अजिंक्य रहाणे (६५) आणि संजू सॅम्सन यांच्यामधली १०९ धावांची भागीदारी रॉयल्सच्या फलंदाजीला पुनरूज्जीवित करेल असं वाटत होतं. पण हरभजन सिंगने हस्तक्षेप केला (४/३२). त्यात त्याने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेतल्या (अजिंक्य रहाणे- १६.१, स्टुअर्ट बिनी- १६.४, केवन कूपर- १६.६) त्यामुळे मुंबईचा संघ चॅम्पियन्स लीग टी२० दोन वेळा जिंकणारा पहिला टी२० संघ ठरला.
4. एमआय विरूद्ध सीएसके आयपीएल २०१५ अंतिम सामना- ईडन गार्डन्स रोमान्स, पुन्हा एकदा
आयपीएलचा अंतिम सामना. ईडन गार्डन्स. एमआय विरूद्ध सीएसके आणि मुंबई इंडियन्सचा विजय. आपण या वेळी २०१३ ची पुनरावृत्ती केली. लेंडिल सिमॉन्स (६८) आणि रोहित शर्मा (५०) यांच्या उत्साही अर्धशतकांसोबत कायरन पोलार्ड (३६) आणि अंबाटी रायाडू (३६ नाबाद) यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सची धावसंख्या २०२/५ पर्यंत पोहोचली. आयपीएलच्या अंतिम सामन्यात ही संख्या दुसऱ्यांदा आली. मिशेल मॅकक्लेनगन (३/२५) आणि स्लिंगा मलिंगा (२/२५) यांनी चेन्नईच्या पाठलागाला लगाम घातला आणि एमएस धोनीच्या संघाला विजयापासून ४१ धावांनी वंचित ठेवले.
5. एमआय विरूद्ध आरपीएसजी आयपीएल २०१७ अंतिम सामना- ‘विश्वास ठेवणं थांबवू नका!’
एमआयच्या आजच्या विजयी दृष्टीकोनाला आकार देणाऱ्या सामन्यांपैकी एक सामना म्हणजे हाच. नवीन पुणे सुपरजायंट्सविरूद्ध क्वालिफायर १ मध्ये झालेला पराभव मनात ताजा असतानाच एमआयने हा स्कोअर सेटल केला. कृणाल पंड्याच्या अप्रतिम कामगिरीमुळे (३८ चेंडूंमध्ये ४७ धावा) मुंबईला अडचणीतून बाहेर काढले (७९/७ ते १२९/८) आणि आरपीएसजीसमोर १३० धावांचे लक्ष्य ठेवले. स्टिव्हन स्मिथ (५१) आणि अजिंक्य रहाणे (४४) यांनी पुण्यासाठी लक्ष्य समोर ठेवून पाठलाग शेवटच्या ओव्हरपर्यंत केला. परंतु अंबाटी रायाडूने घेतलेल्या अप्रतिम कॅचमुळे आणि मिच जॉन्सनच्या शेवटच्या चेंडूमुळे अत्यंत निसटता विजय मिळवून आयपीएल २०१७ आपल्या ताब्यात आला.
6. एमआय विरूद्ध सीएसके, आयपीएल २०१९ अंतिम सामना- ‘हँड ऑफ गॉड (लसिथ मलिंगा आवृत्ती)’
तुम्ही एम ने सुरू होणाऱ्या शब्दांची यादी करू शकता का? मुंबई, मलिंगा, मिरॅकल- असाच क्रम हवा. हैदराबादमधल्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर ब्लू आणि गोल्डचा अक्षरशः उसळता समुद्र आला होता. या श्रीलंकन दिग्गज खेळाडूने सीएसकेविरूद्ध याच सामन्यात ती शेवटची ओव्हर टाकली. पण आधी तर तयारी केली पाहिजे ना. लॉर्ड पोलार्डने (२५ चेंडूंमध्ये ४१ नाबाद) धावा करून एमआयला १४९/८ वर पोहोचवले. शेन वॉट्सनने चेन्नईला १९ ओव्हर्समध्ये १४१/५ पर्यंत नेले. राहुल चहर (१/१४ आणि ४ ओव्हर्समध्ये १३ शून्य चेंडू) आणि जसप्रीत बुमरा (१९ ओव्हरमध्ये १, विकेट, २, ०, २, ४ बाय) अशी गोलंदाजी करून स्लिंगा मलिंगा शेवटच्या ओव्हरमध्ये येईपर्यंत महत्त्वाचे टप्पे पार केले. या टप्प्यावर सहा चेंडूंवर १३ धावांवरून तीन चेंडूंवर पाच धावांपर्यंत सामना गेला. मग एका चेंडूवर दोन धावांची गरज होती. लसिथ मलिंगाने शेवटचा संथ- खोल यॉर्कर टाकला आणि सीएसकेचा शार्दुल ठाकूर फक्त एलबीडब्ल्यूच झाला नाही तर मलिंगाने आयपीएलच्या ट्रॉफीसह आणि फॅ-एमआय-लीकडून प्रचंड प्रेम मिळवून क्रिकेट करियरमधून निवृत्ती घेतली.
7. एमआय विरूद्ध डीसी, आयपीएल २०२० फायनल - ‘हायफाय!’
या संध्याकाळी इतिहास नव्याने रचला गेला. विक्रमी पाचवा चषक आणि फक्त विषम वर्षांमध्ये विजय मिळण्याचा इतिहास संपला. दिल्लीने आधी फलंदाजी केली पण त्यांचा संघ चार ओव्हर्समध्ये २२/३ वर आला. श्रेयस अय्यर (६५ नाबाद) आणि ऋषभ पंत (५६) यांनी ट्रेंट बोल्टच्या हल्ल्याला (३/२० आणि पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्स) उत्तर दिले आणि २० ओव्हर्समध्ये १५६/७ वर धावसंख्या नेली. मुंबईच्या वतीने हिटमॅनने ५१ चेंडूंमध्ये ६८ धावा (५ चौकार, चार षटकार) मारून एमआयला दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध विजय मिळवून दिला.
8. एमआय विरूद्ध डीसी, डब्ल्यूपीएल २०२३ अंतिम सामना- आयपीएल आणि डब्ल्यूपीएल किताब जिंकणारी पहिली टीम’
एक ऐतिहासिक पहिला विजय आणि एक इतिहास. हायली मॅथ्यूसकडून (३/५) आणि इसी वाँगच्या (३/४२) तीन विकेट्स तसेच अमेरियाल केरची उपयुक्त गोलंदाजी (२/१८) यांच्यामुळे दिल्ली कॅपिटल्स विमेन्सचा संघ शेवटच्या फळीतल्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करूनदेखील १३१/९ वर आला. पण पाठलागाचा विषय आल्यावर आपली नॅट-स्किव्हर ब्रन्ट (५५ चेंडूंमध्ये ६० नाबाद) आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या ३९ चेंडूंमध्ये ३७ धावांनी धावांचा पाठलाग अचूकपणे केला आणि एमआयला आपला पहिला डब्ल्यूपीएल चषक मिळवून दिला. त्यांनी भारतात ब्लू आणि गोल्ड रंगात क्रिकेटच्या नवीन युगाला प्रारंभ झाल्याचेही दाखवून दिले.