शिक्षण आणि खेळ या दोन्हींमध्ये एकत्रितरित्या मुलांचे आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. २०१० सालापासून मुंबई इंडियन्स ईएसए- सर्वांसाठी शिक्षण आणि खेळ यांना पाठिंबा देत आहे. या उपक्रमाद्वारे रिलायन्स फाऊंडेशनने १८ दशलक्षपेक्षा अधिक मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकला आहे. या उपक्रमाद्वारे भारतातील मुलांना दर्जेदार शिक्षण आणि खेळाच्या संधी दिल्या जातात.
२०१८ साली ईएफएचे रूपांतर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल (ईएसए)मध्ये झाले. ईएसए हा रिलायन्स फाऊंडेशनच्या एका प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे. त्यांनी १३ दशलक्षपेक्षा अधिक मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकण्यासाठी शिक्षण आणि खेळाच्या लक्ष्याधारित क्षेत्रांना एकत्र आणले आहे. ईएसए उपक्रम संपूर्ण वर्षभर शिक्षण आणि खेळ यांच्यावर लक्ष केंद्रित करून सर्वांगीण विकास देण्यासाठी आणि विविध क्रीडा मालमत्तांमध्ये सुविधा, प्रशिक्षण, पायाभूत सुविधा आणि उपकरणे देऊन क्रीडा वातावरणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मुंबई इंडियन्स आपल्या ईएसएच्या माध्यमातून शिक्षणाला पाठिंबा देतात आणि वंचित तसेच दिव्यांग मुलांमध्ये खेळाला प्रोत्साहन देतात.
ईएसएच्या माध्यमातून रिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्ट्स खेळाच्या पायाभूत सुविधा सुधारत आहे, प्रशिक्षकांचे सक्षमीकरण करत आहे, साधनसुविधा पुरवत आहे आणि सुयोग्य खेळाडूंना अनुदानही देत आहे.
रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स ईएसएच्या माध्यमातून पूर्णवेळ निवासी फुटबॉल शिष्यवृत्ती देते, शिक्षण, प्रशिक्षण, विकास आणि आंतरराष्ट्रीय संधी यांच्यावर भर देते.
रिलायन्स फाऊंडेशन ज्युनियर एनबीए ईएसएच्या माध्यातून संपूर्ण भारतभरात शालेय बास्केटबॉल उपक्रमांना मदत देते. त्यासाठी ते प्रशिक्षकांचे सक्षमीकरण करण्यावर भर देतात आणि दर्जेदार उपकरणेही देतात.
- आरंभ – नवी मुंबईत राहणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबांसोबत काम करते. शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये वंचित समाजासाठी काम करतात. स्थलांतरित कुटुंबातील शाळेत नावनोंदणी होऊन दर्जेदार शिक्षण मिळावे याची ते काळजी घेतात.
- आदर्श इंग्लिश स्कूल- मुलांची मने सक्षम असल्यामुळे त्यांना आदराचा, स्वीकार आणि प्रोत्साहित होण्याचा अधिकार असल्याच्या बाबीवर आदर्श इंग्लिश स्कूल विश्वास ठेवते. ते सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सर्वोत्तमतेप्रति वचनबद्ध असून सुरक्षित आणि पोषक वातावरणात दीर्घकालीन शिक्षणासाठी पाया रचून हे साध्य करतात.
- अँजेल एक्स्प्रेस – सुशिक्षित प्रौढांशी नियमित संपर्काद्वारे वंचित मुलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी काम करते. ते जबाबदार निवडी करू शकणाऱ्या मुलांसाठी शैक्षणिक गरजा पूर्ण करणाऱ्या प्रौढांचे व्यासपीठ निर्माण करतात.
- अर्पण- अर्पण ही संस्था हक्कांधारित दृष्टीकोनातून काम करते आणि प्रत्येक बालकाला सुरक्षित राहण्याचा अधिकार असल्याच्या बाबीवर विश्वास ठेवते. या क्षेत्रात १६ वर्षांचा अनुभव असलेल्या अर्पणने आपल्या वैयक्तिक सुरक्षा शिक्षण, प्रशिक्षण आणि प्रसार तसेच डिजिटल शिक्षण या बहुमाध्यम दृष्टीकोनाद्वारे २.५ दशलक्ष पेक्षा अधिक मुले आणि प्रौढांना प्रशिक्षित केले आहे.
- असीमा – वंचित समाजातील मुलांना उत्तम दर्जाचे आणि मूल्याधारित शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. मागील १७ वर्षांच्या कालावधीत या संस्थेने मुंबई तसेच इगतपुरीच्या दूरस्थ आदिवासी समाजातील मुलांसाठी व्यापक कार्य केले आहे.
- क्राय – चाइल्ड राइट्स अँड यू ही संस्था वंचित मुलांसाठी कार्यरत आहे. ती मागील चार दशकांपेक्षा अधिक काळापासून अधिक आनंदी आणि सुदृढ बालपण देण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि भारतीय मुलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व करण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यात शिक्षणाचा हक्क, सुरक्षा आणि संरक्षणाचा हक्क, आरोग्य आणि पोषण आणि सहभागाचा हक्क आहे.
- डोअर स्टेप स्कूल – पदपथांवर राहणारे लोक, झोपडपट्टीतील लोक, बांधकाम मजुरांचे कुटुंब आणि इतर अनेक वंचित कुटुंबांमधील दुर्लक्षित राहणाऱ्या मुलांना शिक्षण आणि आधार देते. ते या वंचित मुलांच्या अगदी डोअर स्टेपपर्यंत शिक्षण नेऊन ही दरी सांधण्याचा प्रयत्न करत आहेत.
- एम्पॉवहर - एम्पॉवहर ही इंडिया या संस्थेकडे ३० वर्षांचा तळागाळातील समाजकार्याचा अनुभव आहे आणि त्याद्वारे समान समाज निर्मितीसाठी ते महिलांचे सक्षमीकरण करतात. एम्पॉवहर इंडिया ही संस्था ग्रामीण समाजासोबत तळागाळात काम करून पायाभूत सुविधा सुधारणे आणि लिंग समानता साध्य करणे यांच्यासाठी कार्यरत आहे, जेणेकरून मुलींना समाजाच्या प्रगतीत समान वाटा उचलता येईल.
- ह्युमना पीपल टू पीपल इंडिया– भारतातील लोकांना एकत्र आणण्यासाठी काम करते जेणेकरून दारिद्र्य आणि इतर अमानुष परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदतीची गरज असलेल्या व्यक्ती आणि समाजांना ज्ञान प्रसारण, कौशल्यविस्तार आणि क्षमता उभारणी करता येईल.
- जाई वकील फाऊंडेशन – ही संस्था बौद्धिकदृष्ट्या अपंग लोकांसोबत काम करते आणि ती बौद्धिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या व्यवस्थापनासाठी मदत करते. बौद्धिक आणि इतर प्रकारचे अपंगत्व जसे ऑटिझम, एपिलेप्सी, सेरेब्रल पाल्सी आणि दृश्य किंवा मूकबधीर अशा प्रकारच्या अपंगत्वांनी ग्रस्त सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरांमधील लोकांना मदत करते.
- मॅजिक बस – ही संस्था भारतातील वंचित समाजातील मुलांचा विकास करण्यासाठी खेळाचा माध्यम म्हणून वापर करून काम करते. त्यांच्या खेळांच्या उपक्रमावर आधारित कार्यक्रमांतून मुलांमध्ये ज्ञान, कौशल्य, सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास वाढीस लागतो.
- मेलजोल – मुलांना समाजात जबाबदारीने योगदान देण्यासाठी आवश्यक त्या संधी देण्याच्या दृष्टीने सामाजिक आणि आर्थिक शिक्षणाच्या माध्यमांचा वापर करते. मेलजोल देशभरातील महापालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि आदिवासी शाळांमधील वंचित मुलांपर्यंत पोहोचते.
- मुंबई मोबाइल क्रेचेस – ही संस्था मुंबईतील बांधकाम मजुरांच्या मुलांसोबत काम करते आणि त्यांना एक सुरक्षित, आनंदी आणि सुदृढ बालपण देण्यास मदत करते. ती मुलांना दर्जेदार शिक्षण, पोषण आहार आणि उज्ज्वल भविष्याचा पाया रचून मदत करते.
- मुक्तांगण – वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाचे सर्वसमावेशक, विद्यार्थी स्नेही, सामाजिक मॉडेल देते.
- ऑस्कर फाऊंडेशन – फुटबॉलच्या माध्यमातून वंचित मुले तसेच तरूणांना त्यांच्या समाजाची जबाबदारी घेण्याचे जीवनकौशल्य देऊन सक्षमीकृत करण्यासाठी शिक्षणाचे मूल्य रूजवते. ऑस्कर ही संस्था एक खास कार्यक्रम चालवते ज्यातून मुलांना आणि तरूणांना खेळच शिकवला जात नाही तर त्यांना शिक्षणाचे मूल्य समजून घेण्यासाठी मदत होते.
- प्रगती हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ट्रस्ट – ही संस्था गंभीर आजारांनी ग्रस्त रूग्णालयात दाखल असलेल्या आणि वंचित मुलांसोबत काम करते. त्याचबरोबर या मुलांना आधार आणि सेवा देण्यासाठी समाज आणि रूग्णालयांसोबत समन्वय साधते. आम्ही आमची कार्ये अशा रितीने तयार करतो जेणेकरून आमच्या कामातून मुलांसाठी सुरक्षित स्थान निर्माण होऊ शकेल.
- प्रथम – प्रथम ही एक नावीन्यपूर्ण अध्ययन संस्था आहे जी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी निर्माण केली गेली आहे आणि ती शिक्षण व्यवस्थेतील दरी सांधण्यासाठी उच्च दर्जाच्या, कमी खर्चिक आणि अंमलात आणण्यासारख्या हस्तक्षेपांवर लक्ष केंद्रित करते.
- प्रेरणा - प्रेरणा ही संस्था बाल संरक्षणाच्या समस्यांवर काम करत असून ती सर्वाधिक धोक्याच्या पातळीत असलेल्या मुलांचे हक्क सुरक्षित करणे, त्यांच्यासाठी सर्वसमावेशक पर्याय निर्माण करणे आणि त्यांना आत्मसन्मानपूर्वक आयुष्य जगता येईल याची काळजी घेते.
- रॉबिनहूड आर्मी – रॉबिनहूड आर्मी ही एक स्वयंसेवकांची, शून्य निधीवर आधारलेली संस्था आहे. ती रेस्टॉरंट्स आणि समाजातील अतिरिक्त अन्न आणून वंचित लोकांना त्याचा पुरवठा करते. रॉबिन हूड एकेडमी ही रस्ते आणि शाळा यांच्यामधील दरी सांधणारा एक पूल आहे. ती मुलांना शाळेत पूर्णवेळ जाण्यासाठी साहित्य आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी देते.
- रूम टू रीड – वर्ल्ड चेंज स्टार्ट्स विथ एज्युकेडेट चिल्ड्रेन® या विचाराने २००० साली स्थापन झालेली रूम टू रीड ही निरक्षरता आणि लिंग असमानतेने मुक्त जगाच्या निर्मितीसाठी कार्यरत आहे. ही संस्था हे ध्येय कायमस्वरूपी कमी उत्पन्न गटातील मुलांना साक्षरता कौशल्ये आणि वाचनाच्या सवयी विकसित करण्यास मदत करून आणि मुलींना शाळेत यशस्वी होऊन आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय घेणे शक्य होण्यासाठी साहाय्य करते.
- सखी फॉर गर्ल्स एज्युकेशन – सखीचे ध्येय समाजाच्या पातळीवर दर्जेदार शिक्षणाच्या जागा निर्माण करण्याचे आहे जेणेकरून मुंबईच्या झोपड्यांमधील प्रत्येक मुलीला आत्मविश्वासाने आपले शिक्षण पूर्ण करता येईल. सखी समाजावर आधारित शाळेनंतरच्या उपक्रमांद्वारे झोपडपट्टीतील इतर मुलींसाठी मूलभूत शैक्षणिक क्षमता उभारणी करत आहे.
- सक्षम ट्रस्ट – सक्षमचे ध्येय समाजात अशा प्रकारे योगदान देण्याचे आहे ज्यातून प्रामाणिकता आणि उत्तम ज्ञानाद्वारे पुढील पिढ्यांमध्ये आमूलाग्र बदल होतील आणि प्रेम आणि निष्ठेचा प्रसार होईल. सक्षम लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी समजून घेणे, विचार करणे आणि उपाययोजना शोधण्याच्या महिलांच्या क्षमतेचे सक्षमीकरण करण्यावर विश्वास ठेवते.
- साक्षरता – साक्षरता ही संस्था अर्थपूर्ण साक्षरतेद्वारे वंचित समाजाच्या आयुष्याचे कल्याण करण्यासाठी कार्यरत आहे. ते या गोष्टीवर विश्वास ठेवतात की सारक्षता फक्त वाचन आणि लेखनापेक्षा बरेच काही आहे. हे असे कौशल्य आहे जे मनांना आकार देते, प्रभावी संवाद शक्य करते आणि आत्मविश्वास वाढवते.
- सेवा सहयोग – सेवा सहयोग फाऊंडेशनचे उद्दिष्ट समाजात एकूणच मूल्यवर्धन करण्यासाठी सामाजिकदृष्ट्या जागरूक समूह आणि व्यक्ती यांना समानधर्मी स्वयंसेवी संस्थांना जोडून घेण्याचे आहे. ते प्रामुख्याने शिक्षण आणि उदरनिर्वाह या गोष्टींवर काम करतात. त्यांचे ध्येय झोपडपट्टीतील महिलांच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह कमावण्याच्या क्षमतेवर काम करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवण्याचे आहे. त्याचबरोबर ते तरूणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी व्यावसायिक शैक्षणिक उपक्रम देतात.
- शिक्षा फाऊंडेशन – शिक्षा फाऊंडेशन ही २००६ मध्ये स्थापन झालेली परोपकारी संस्था असून ती वंचित मुले आणि त्यांच्या शिक्षणाला चालना देते. त्यांचे उद्दिष्ट वंचित मुलांना पायाभूत शिक्षण देणे, कमी खर्चिक पोषण आणि सकस आहार देणे तसेच किशोरवयीन मुलींच्या पाळीच्या दिवसांमध्ये शालेय उपस्थितीच्या समस्यांवर काम करणे हे आहे.
- शिशुविकास स्कूल- शिशु विकास शाळा वंचित मुलांना शाळेत पुन्हा आणून आणि त्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक सहकार्य तसेच मार्गदर्शन देऊन शैक्षणिक संधींचा विस्तार करण्याचे ध्येय ठेवते.
- स्पार्क ए चेंज – कमी उत्पन्नगटातील कुटुंबांमधील शाळकरी मुलांमधील अध्ययनाची दरी सांधण्याच्या हेतूने शाळेनंतरचा उपक्रम देते. शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक उपक्रमांद्वारे उत्तम शैक्षणिक पाया रचण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्याद्वारे त्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान तसेच शिक्षणाप्रती प्रेम वाढीस लागेल आणि त्यामुळे मुलांना शाळेत अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि चांगली कामगिरी करणे शक्य होते.
- तरूण मित्रमंडळ– सामाजिक कार्याच्या विविध क्षेत्रांद्वारे शिक्षण आणि सर्वोत्तमतता यांचा प्रसार करण्यासाठी मदत करते जेणेकरून वंचितांच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन त्यांच्या ज्ञानाची व्याप्ती वाढू शकेल.
- टीच फॉर इंडिया – टीच फॉर इंडिया ही शैक्षणिक समानतेसाठी स्थापन झालेली ना नफा तत्वावरील संस्था आहे. सर्व मुलांनी उत्तम शिक्षण घेतलेच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. यात दोन प्रकारच्या व्यक्ती आहेत. त्यातील एक म्हणजे दोन वर्षे कमी उत्पन्न गटातील आणि कमी स्त्रोत असलेल्या वर्गांना शिकवण्यासाठी वचनबद्ध होणारे आणि स्टाफ कर्मचारी जे धोरणात्मक आधार आणि संघटनात्मक मार्गदर्शनाद्वारे या प्रयत्नांना चालना देतात.
- उम्मीद- ही संस्था विकासाशी संबंधित अपंगत्व घेऊन जन्मलेल्या किंवा अपंगत्वाचा मोठा धोका असलेल्या आणि त्यामुळे समाजाच्या मुख्य धारेत त्यांच्या समावेशाला अडथळे निर्माण होऊ शकतात अशा मुलांसाठी काम करते. ही स्वयंसेवी संस्था ही मुले आणि त्यांच्या कुटुंबांना त्यांना विकसित होण्यास, शिकण्यास आणि आयुष्य पूर्णपणे जगण्यात मदत करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचा विकास करून त्यांचा वापर करते.
- वाचा – वाचा चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था मुंबई येथे स्थित ना नफा तत्वावरील संस्था आहे. ती शिक्षण, आरोग्यसेवा आणि लिंग प्रशिक्षण यांद्वारे वंचित समाजाच्या आयुष्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहे. सक्षमीकृत मुली आणि संवेदनशील मुलांना समानतेचे महत्त्व जाणणाऱ्या प्रौढ व्यक्तींमध्ये रूपांतरित होऊन चांगले नागरिक होण्याची चांगली संधी असते.
- वात्सल्य फाऊंडेशन - वात्सल्य फाऊंडेशनने अशा एका जगाचे स्वप्न उराशी बाळगले आहे ज्यातून प्रत्येक मुलाला कोणत्याही भेदभावाशिवाय आणि त्यांच्या मूलभूत हक्कांच्या खात्रीसाठी एक व्यक्ती म्हणून विकसित होण्यासाठी एक सक्षम वातावरण दिले जाईल. त्यांचा विश्वास आहे की प्रत्येक मूल मोठे होऊन समाजाच्या मुख्य धारेत एक जबाबदार नागरिक म्हणून विकसित होण्याच्या अंगभूत क्षमतेसह जन्मलेले असते. त्यांचे ध्येय या मुलांच्या क्षमतेला वाव देऊन जास्तीत जास्त प्रमाणात योग्य ठिकाणी ती वापरली जाईल याची काळजी घेण्याचे आहे.
- विद्या – विद्या ही ना नफा तत्वावरील स्वयंसेवी संस्था असून ती ३५ वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी आतापर्यंत चार लाख लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकला असून त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त मुली आणि महिला आहेत. त्यांनी आयआयटी दिल्लीच्या परिसरात ५ मुलींपासून वर्गाला सुरूवात केली. आता त्यांचे दिल्ली, गुरूग्रामी, बंगळुरू, मुंबई, पुणे आणि गोवा येथे ७८ प्रकल्प आहेत.
- विपला फाऊंडेशन - विपला फाऊंडेशन ही संस्था भारतीय मुलांना शिक्षण, विकास आणि प्रगतीपासून काहीही रोखू शकत नाही या गोष्टीची काळजी घेण्याच्या विचारावर आधारित आहे. त्यामुळे भारतभरातील धोक्याच्या घटकातील समाजांमधील अगणित मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकला जातो. ते मुलांना आणि अपंगत्व असलेल्या प्रत्येक मुलाला एक सन्मानपूर्वक आणणि स्वयंपूर्ण आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक संधी देण्याचा प्रयत्न करतात.
- युवा – युथ फॉर युनिटी अँड व्हॉलंटरी एक्शन (युवा) ही ना नफा तत्वावरील संस्था असून ती वंचित समाजासोबत काम करते आणि त्यांना सक्षमीकृत करून त्यांचे हक्क मिळवण्यासाठी मदत करते. युवाचे प्रत्यक्ष कार्यस्थळावरील हस्तक्षेप प्रसार प्रयत्न आणि धोरण सल्ला यांच्याशी जोडले गेलेले असतात.
- ३२१ फाऊंडेशन - ३२१ फाऊंडेशनचे ध्येय या वंचित पार्श्वभूमीच्या मुलांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत साक्षरता आणि गणितीय (एफएलएन) कौशल्ये साध्य करण्यासाठी मदत करण्याचे आहे. आम्ही हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मुलाच्या शाळेत काम करणाऱ्या प्रत्येक भागधारकाचे सक्षमीकरण करतो.