सदर गोपनीयता धोरण (“गोपनीयता धोरण”) हे आमच्या इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (“आयएसपीएल”) च्या मालकीच्या, वेबसाइटला www.mumbaiindians.com (the “वेबसाइट”), लागू आहे.
‘आयएसपीएल’ किंवा ‘आम्ही’ या संज्ञा वेबसाइटचे मालक आणि ऑपरेटर्स यांना लागू होतात. ‘तुम्ही’ किंवा ‘वापरकर्ता’ या संज्ञा आमच्या वेबसाइटचे वापरकर्ते किंवा दर्शक यांना उद्देशून आहेत.
आयएसपीएलमध्ये आम्ही आमच्या वेबसाइटच्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि आमच्या वापरकर्त्यांना एक समृद्ध करणारा, सुरक्षित आणि आनंददायी वेबसाइट अनुभव देण्याच्या दृष्टीने सर्व संदर्भात वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्याप्रति वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या वेबसाइटवरून तुमच्याकडून प्राप्त झालेल्या आणि गोळा केलेल्या वैयक्तिक ओळखीची माहिती (“वैयक्तिक माहिती”) चा आदर करतो आणि तिचे रक्षण करतो.
कृपया नोंद घ्या की, हे गोपनीयता धोरण फक्त वेबसाइटच्या वापरकर्त्यांना आणि वेबसाइटवर गोळा केलेली माहिती आणि डेटा लागू आहे आणि वेबसाइट किंवा इतर कोणत्याही माहितीला लागू नाही. तुम्हाला याद्वारे सदर गोपनीयता धोरण काळजीपूर्वक वाचण्याचा तसेच वैयक्तिक आणि इतर माहिती गोळा करण्याचे आणि/ किंवा मिळवण्याचे स्वरूप आणि हेतू आणि अशा माहितीचा वापर, उद्घोषणा आणि देवाणघेवाण या बाबी समजून घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
यात नमूद नसलेल्या संज्ञांचा अर्थ आयएसपीएलच्या वेबसाइटच्या वापराच्या अटी आणि शर्ती ज्या (“वापराच्या अटी”) मध्ये देण्यात आल्या आहेत तोच असेल. सदर गोपनीयता धोरण दिवशी सुधारित करण्यात आले.
सदर गोपनीयता धोरण खालील बाबी स्पष्ट करतेः
- आम्ही तुमच्याकडून तुमच्याबद्दल काय माहिती गोळा करू शकतो.
- आमच्या वेबसाइटवर कुकीजचा वापर आणि भूमिका आणि तत्सम तंत्रज्ञान;
- आम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्याकडून मिळवलेल्या माहितीचे रक्षण आणि वापर कसा करणार;
- आम्ही तुमची माहिती इतर कोणाला कोणत्या परिस्थितीत देऊ शकतो;
- आम्ही तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुमच्या माहितीचा वापर कधी करू शकतो; आणि
- आमच्याकडे तुमची जी माहिती आहे ती अचूक आणि अद्ययावत आहे याची खात्री तुम्ही कशा प्रकारे करू शकता.
- गोळा केलेली माहितीः
- सर्वसाधारणपणे तुम्ही कोण आहात किंवा तुमच्याबद्दल वैयक्तिक माहिती न देता आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. तथापि, युजर प्रोफाइल बनवू शकणार नाही किंवा नोंदणीची गरज असलेल्या वेबसाइटवरील विशिष्ट क्षेत्रे किंवा सेवा पाहू शकणार नाही किंवा तुम्ही कोण आहात आणि/ किंवा आम्हाला तुमच्याबद्दल इतर माहिती देण्याची गरज असलेल्या सेवा वापरू शकणार नाही.
- आम्ही तुमच्याकडून गोळा करत असलेली माहिती तुम्ही ज्या कार्यात सहभागी होऊ इच्छिता त्यावर अवलंबून असेल आणि त्यात कोणत्याही मर्यादेशिवाय तुमचे नाव, इमेल पत्ता, सोशल मीडिया अकाऊंट हँडल/ युजरनेम, मोबाइल नंबर, जन्मतारीख, वय, लिंग सध्याचे शहर/ निवासाचा पत्ता आणि छायाचित्र किंवा फोटो ओळखपत्र यांचा समावेश असेल. त्याशिवाय आम्ही लोकसांख्यिक माहितीही गोळा करू शकतो जसे तुमच्या संगणक, मोबाइल, टॅब्लेट, डिव्हाइस, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्लॅटफॉर्म, मीडिया, इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) पत्ता आणि कनेक्शन, ऑनलाइन एक्टिव्हिटीबाबत माहिती जसे फीचरचा वापर आणि क्लिक पाथ्स तसेच सर्व्हे किंवा ऑनलाइन प्रोफाइलमध्ये तुम्ही देत असलेली इतर माहिती. आम्ही आमच्या वेबसाइटला टेलर करण्यासाठी किंवा तुमचे प्राधान्य किंवा आवडीनुसार वैयक्तिक माहितीसह वैयक्तिक माहितीसोबत लोकसांख्यिक माहिती गोळा करू शकतो.
- वैयक्तिक माहिती
- वैयक्तिक माहिती म्हणजे कोणतीही माहिती जिचा वापर तुमची ओळख पटवण्यासाठी केला जाईल आणि जी अन्यथा सार्वजनिक स्तरावर उपलब्ध नसेल, ज्यात तुमचे पहिले आणि शेवटचे नाव, इमेल पत्ता, मोबाइल क्रमांक, फोन नंबर किंवा इतर संपर्क तपशील यांचा समावेश असेल परंतु तेवढेच मर्यादित नसेल.
- तुम्ही आमच्या वेबसाइटवर संवादासाठी वैयक्तिक युजर प्रोफाइल तयार करता, युजर कंटेंटमध्ये योगदान देता आणि आमच्या रिवॉर्ड्स प्रोग्राममध्ये सहभागी होता तेव्हा तुमच्याकडून आम्ही वैयक्तिक माहिती गोळा करतो. आमच्या वेबसाइट स्टोअरवरून तुम्ही मर्चंडाइज खरेदी करता (लागू असल्यास) तेव्हा किंवा आमच्या कोणत्याही सेवेसाठी नोंदणी करता किंवा स्वेच्छेने अशी कोणतीही माहिती देता तेव्हाही आम्ही तुमची वैयक्तिक माहिती गोळा करू शकतो. तुम्हाला टीमची नावे, सामन्यांची यादी आणि टीमची माहिती, प्रमोशनल साहित्य आणि आयएसपीएल आणि टीमशी संबंधित साहित्य आणि टीमचे मालक, भागीदार आणि प्रायोजकांकडून आलेले संदेश पाठवण्यासाठी आम्ही तुमचे नाव, तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि इमेल यांचा वापर करू शकतो. अशा कोणत्याही संवादात नमूद केलेल्या पद्धतीत यातील कोणत्याही संवादातून तुम्हाला अनसबस्क्राइब करायचे असल्यास तुम्ही आम्हाला कळवले पाहिजे.
- आयएसपीएलकडून सेवा देण्याच्या कालावधीत तुम्ही देऊ इच्छित असल्यास तुमचा युजर प्रोफाइल पासवर्ड, लागू असल्यास आणि इतर कोणतीही वित्तीय माहिती (लागू असल्यास) वगळता कोणतीही संवेदनशील वैयक्तिक माहिती (“एसपीआय”) आयएसपीएलकडून घेतली जात नाही. एसपीआय म्हणजे वैयक्तिक माहिती जसे तुमचा पासवर्ड, शारीरिक, शरीरशास्त्रीय आणि मानसिक आरोग्याची स्थिती, वैद्यकीय नोंदी आणि इतिहास, बायोमेट्रिक माहिती, लैंगिक कल आणि आर्थिक माहिती (जसे बँक खात्याचे तपशील किंवा क्रेडिट कार्ड नंबर). आयएसपीएलकडून गोळा केलेले एसपीआय या गोपनीयता धोरणात किंवा वापराच्या अटींमध्ये किंवा आयएसपीएल आणि तुमच्यामध्ये झालेल्या कोणत्याही अटींमध्ये किंवा कायद्याने अन्यथा आवश्यक असल्याशिवाय तुमच्या घोषित संमतीशिवाय घोषित केले जाणार नाहीत. येथे हे स्पष्ट करण्यात येत आहे की, ही अट वेबसाइटवर तुमच्याशी संबंधित एसपीआयसह सार्वजनिक स्तरावर उपलब्ध असलेल्या माहितीला लागू होणार नाही.
- तुम्ही हे मान्य करता की सेवा पुरवण्याच्या कालावधीत आयएसपीएल वेबसाइटवर पोस्ट करण्यात आलेल्या लेखनातून वैयक्तिक माहिती गोळा करू शकेल आणि याद्वारे तुम्ही आयएसपीएलला या पद्धतीने गोळा केलेली माहिती वेबसाइटवर साठवण्याची आणि प्रदर्शित करण्याची परवानगी देत आहात आणि वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या साहित्याच्या स्वरूपात ती घोषित करण्यास मान्यता देत आहात.
- कुकीज आणि इतर ट्रॅकिंग तंत्रज्ञानः
- आमच्या वापरकर्त्यांसाठी वेबसाइटचा प्रभाव आणि वापरयोग्यता वाढवण्यासाठी आम्ही “कुकीज” आणि इतर ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. “कुकी” म्हणजे एक छोटी लेखी फाइल जिचा वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या आमच्या वेबसाइटवरील हालचालींची माहिती गोळा करण्यासाठी. काही कुकीज आणि इतर तंत्रज्ञानांचा वापर तुम्ही पूर्वी सूचित केलेली वैयक्तिक माहिती आठवण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. अनेक ब्राऊझर्स तुम्हाला कुकीज कंट्रोल करण्याची परवानगी देतात, ज्यात त्या स्वीकारायच्या की नाही आणि त्या कशा प्रकारे काढून टाकायचा यांचा समावेश आहे. तुम्हाला एखादी कुकी मिळाली याची तुम्हाला सूचना देण्यासाठी अनेक ब्राऊझर्स सेट करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या ब्राऊझरसोबत कुकीज ब्लॉक करण्याचा पर्याय निवडू शकता. परंतु तुम्ही तुमच्या कुकीज खोडून काढायच्या किंवा ब्लॉक करायचा पर्याय निवडल्यास तुम्हाला तुमचा मूळ युजर प्रोफाइल आयडी, युजर नेम आणि पासवर्ड या गोष्टी आमच्या वेबसाइटचे काही भाग पाहण्यासाठी नव्याने द्याव्या लागतील.
- ट्रॅकिंग तंत्रज्ञान इंटरनेट डोमेन आणि होस्टची नावे यांच्यासारखी माहिती, तुमच्या भौगोलिक स्थानाबाबतची इतर माहिती, आयपी पत्ते, ब्राऊझर सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टिम टाइप्स, सीपीयू टाइप, इंटरनेटशी जोडण्याची तुमची पद्धत (उदा. नॅरोबँड किंवा ब्रॉडबँड एक्सेसद्वारे कनेक्शन स्पीड), क्लिक पाथ, आणि आमची वेबसाइट पाहिली गेली ती तारीख आणि किती वेळा पाहिली गेली या बाबी आपोआप रेकॉर्ड करू शकतील. आमच्या कुकीजचा वापर आणि इतर ट्रॅकिंग टेक्नॉलॉजीजमुळे आमची वेबसाइट आणि तुमच्या वेब अनुभवात सुधारणा होते. ट्रेंड्स आणि स्टॅटिस्टिक्ससाठी वैयक्तिक माहिती समाविष्ट नसलेल्या माहितीचे विश्लेषण आम्ही करू शकतो.
- मुले:
- आमच्या सेवा आणि आमची वेबसाइट सर्वसाधारण जनतेसाठी आहे. तुमचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास आणि या वेबसाइटचा वापर करायचा असल्यास किंवा आमची उत्पादने किंवा सेवा खरेदी करायच्या असल्यास कृपया तुमच्या आईवडिलांना/ पालकांना तुमच्यावतीने आमच्याकडे नोंदणी करण्याची आणियुजर प्रोफाइल तयार करण्याची विनंती करा. तुम्ही आईवडील/ पालक असा आणि तुमच्या मुलाच्या/ पाल्याच्या वतीने युजर प्रोफाइल तयार केल्यास तुम्ही सदर गोपनीयता धोरण आणि वापराच्या अटींबाबत तुमची संमती निश्चित करत आहात आणि याद्वारे सदर गोपनीयता धोरणानुसार तुमच्या मुलाच्या/ पाल्याच्या वैयक्तिक माहिती गोळा करणे, साठवणे आणि वापर यांना संमती देत आहात. या वेबसाइट किंवा तिच्या इतर कोणत्याही वैशिष्ट्यांचा वापर १८ वर्षांखालील वैयक्तिक मुलाने त्यांच्या पालकांच्या निरीक्षणाखालीच केला पाहिजे.
- वैयक्तिक माहितीचा उपयोगः
- आम्ही तुमच्याकडून आलेल्या आणि गोळा केलेल्या वैयक्तिक माहितीचा तसेच इतर माहितीचा वापर तुम्ही विनंती केलेल्या सेवा देण्यासाठी करू शकतो. ज्यात आमच्या वेबसाइटवर पर्सनल युजर प्रोफाइल तयार करणे आणि नोंदणी करणे, तुम्हाला कस्टमाइज्ड कंटेंट देणाऱ्या सेवा आणि/ किंवा आमच्या रिवॉर्ड्स प्रोग्रामच्या संदर्भात आणि तुमच्या विनंतीवरून आणि अन्यथा गरजेचे असल्यास तुमच्याशी संपर्क करण्यासाठी या बाबींचा समावेश आहे. आम्ही या वैयक्तिक माहितीचा वापर ऑडिटिंग, संशोधन आणि विश्लेषण तसेच आमच्या सेवा कार्यान्वित करून सुधारणा करण्यासाठीही करू शकतो. काही परिस्थितीत आम्ही तृतीय पक्षांना व्यापक बिगर वैयक्तिकम माहिती पुरवू शकतो. आम्ही तृतीय पक्षांचा वापर तुमच्या वैयक्तिक माहितीच्या प्रक्रियेसाठी मदत करण्यासाठी करू तेव्हा त्यांनी आमच्या गोपनीयता धोरणाशी तसेच इतर योग्य गोपनीयता आणि सुरक्षितता उपाययोजनांशी सुसंगत असावे अशी आमची आवश्यकता असेल. आम्ही मर्यादित परिस्थितीत तृतीय पक्षांना माहिती देऊ शकतो. त्यात कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता, घोटाळा किंवा संभाव्य धोका टाळणे आणि आमच्या नेटवर्क आणि सेवांच्या सुरक्षेची हमी यांचा समावेश आहे.
- तथापि, आम्ही वेळोवेळी ही माहिती कायदेशीर किंवा नियामकांची उत्तरदायित्वे पूर्ण करण्यासाठी किंवा अशा प्रकारे घोषित करणे आमच्या हक्कांच्या, इतरांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी किंवा धोका टाळण्यासाठी कायदेशीररित्या सुयोग्य किंवा आवश्यक असल्याचे ठरवल्यास घोषित करू शकतो. त्याखेरीज आम्ही आमच्या वेबसाइटच्या वापरकर्त्यांबाबत माहिती गोळा करून तिचा वापर संख्यात्मक हेतूसाठी करू शकतो. ही माहिती आम्हाला आमच्या वेबसाइटचे वापरकर्ते अधिक चांगल्या प्रक्रारे समजून घेण्यासाठी तसेच आमची वेबसाइट आणि आमच्या सेवा अधिक चांगल्या प्रकारे देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
- इतर कोणत्याही कारणासाठी तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर करण्याचे आम्ही प्रस्तावित करू तेव्हा आम्ही तुम्हाला सर्वप्रथम सूचित करू. तुम्हाला वर नमूद केलेल्या वापरांखेरीज तुमच्या वापरासाठी तुम्हाला तुमची संमती राखून ठेवण्याची किंवा मागे घेण्याचीही संधी दिली जाईल.
- गोपनीयता आणि सुरक्षितताः
- आम्ही कायद्याने आवश्यक असल्याशिवाय किंवा परवानगी दिल्याशिवाय तुमची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवून आणि तिचे रक्षण करू.
- आम्हाला सादर केलेली वैयक्तिक माहिती, हस्तांतरणाच्या वेळी आणि आम्हाला प्राप्त झाल्यावर साठवणूक आणि विल्हेवाटीसाठी संरक्षित करण्यासाठी सर्वसामान्यपणे स्वीकारलेल्या औद्योगिक मानकांचे आम्ही पालन करतो. तुम्ही आमच्या नोंदणी किंवा ऑर्डरच्या अर्जावर संवेदनशील माहिती नमूद केल्यावर आम्ही सिक्युअर सॉकेट लेयर टेक्नॉलॉजी (एसएसएल)चा वापर करून ती इनक्रिप्ट करतो. गोळा केलेली सर्व माहिती सुरक्षितपणे आम्ही नियंत्रित केलेल्या डेटाबेसमध्ये फायरवॉलच्या मागे साठवलेली असते. सर्व्हरची पोहोच पासवर्ड संरक्षित असते आणि सक्तीने मर्यादित असते. इंटरनेटवर हस्तांतरणाची कोणतीही पद्धत किंवा इलेक्ट्रॉनिक साठवणुकीची पद्धत १०० टक्के सुरक्षित नसते. तथापि, आम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीच्या रक्षणासाठी व्यावहारिकदृष्ट्या स्वीकारार्ह पद्धतींचा वापर करत असताना आम्ही त्याच्या संपूर्ण सुरक्षेची हमी देऊ शकत नाही.
- आम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीच्या संपर्कात तुम्हाला उत्पादने किंवा सेवा देण्यासाठी किंवा आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी संपर्कात येऊ शकतील असे आमचे मत असलेले कर्मचारी/ अधिकारी यांना वैयक्तिक माहितीची पोहोच मर्यादित करतो.
- तृतीय पक्ष आमच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आणि आमच्या विशिष्ट सेवा देतात. आमची उत्पादने, माहिती आणि सेवा कार्यक्षमतेने आणि प्रभावशाली पद्धतीने प्रदान करण्यास आम्हाला मदत करण्याच्या हेतूने वैयक्तिक माहितीसह इतर माहिती तृतीय पक्षांना देऊ शकतो. सेवा पुरवठादार हेही एक असे महत्त्वाचे माध्यम आहे ज्याद्वारे आम्ही आमची वेबसाइट आणि मेलिंग लिस्टचे व्यवस्थापन करतो. आम्ही तृतीय पक्ष सेवा पुरवठादार हे गोपनीयता करारनामे आणि अन्यथा यांच्या माध्यमातून आमच्या वतीने वैयक्तिक माहितीचे रक्षण करण्यासाठी उत्तरदायी असतील याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलू. आम्ही आमच्या वतीने काम करण्यासाठी सक्ती नसलेल्या तृतीय पक्षांना तुमची वैयक्तिक माहिती असे हस्तांतरण कायद्याने आवश्यक असल्याशिवाय तुमच्या संमतीशिवाय देणार नाही. त्याचप्रमाणे, ऑनलाइन गोळा केलेली वैयक्तिक माहिती संमतीशिवाय देणे हे आमच्या धोरणाविरूद्ध आहे.
- तुम्ही आम्हाला तुमची वैयक्तिक माहिती देण्याचा पर्याय निवडल्यास आम्ही ही वैयक्तिक माहिती तुमच्या देशातून किंवा अधिकारक्षेत्रातून जगभरातील इतर देश किंवा अधिकारक्षेत्रांमध्ये हस्तांतरित करू शकतो. तुमची वैयक्तिक माहिती गोळा करून भारताच्या प्रदेशात आणि आम्ही वेळोवेळी घोषित करू अशा इतर देशांमध्ये स्थित सर्व्हर्सवर साठवली जाऊ शकते.
- तृतीय पक्ष वेबसाइट्स
- तुम्ही तृतीय पक्ष वेबसाइटच्या लिंकवर क्लिक केल्यास किंवा वेबसाइट सोडून बाहेर गेल्यास तुम्ही आमच्या नियंत्रणाबाहेरील वेबसाइटवर जाल. आम्ही तृतीय पक्षांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे अशा तृतीय पक्षांकडून तुमच्या वैयक्तिक माहितीच्या कोणत्याही वापराची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही आणि आम्ही ज्या गोपनीयता आणि सुरक्षा धोरणाचे पालन करतो तेही त्याच कार्यपद्धतींचे पालन करतील याची हमी आम्ही देऊ शकत नाही. तुम्ही ज्या वेबसाइट्स आणि/ किंवा सेवा पुरवठादाराकडून सेवांची विनंती कराल त्यांच्या गोपनीयता धोरणाची पडताळणी करावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आमच्या वेबसाइटला जोडलेल्या तृतीय पक्षाच्या वेबसाइटला तुम्ही भेट दिल्यास तुम्ही कोणतीही वैयक्तिक माहिती देण्यापूर्वी त्या वेबसाइटचे गोपनीयता धोरण वाचावे.
- तुमच्याशी संपर्क साधणेः
- आम्ही तुम्हाला खालील प्रसंगी तुम्ही आम्हाला दिलेल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून संपर्क साधूः
- तुमच्या युजर प्रोफाइलच्या संबंधात, त्याची पडताळणी आणि वापरासह;
- तुम्ही कोणत्याही सेवेसाठी साइन अप केलेले असल्यास त्याच्या कार्यासाठी जेणेकरून आम्ही तुम्हाला या सेवा देऊ याची खात्री करता येईल;
- तुम्ही पुढील पत्रव्यवहार मिळवण्याचा पर्याय निवडला असल्यास;
- आमच्या रिवॉर्ड्स प्रोग्रामच्या संदर्भात;
- तुम्हाला टीमशी संबंधित चाहत्यांच्या स्पर्धेत किंवा सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी किंवा संबंधित बाबी (सहभाग कायम ऐच्छिक आहे) ; आणि
- आमच्या टीमच्या बातम्या, टीमचे कार्यक्रम, टीमच्या सामन्यांची यादी, टीमचे प्रमोशनल साहित्य, भागीदारांचे प्रमोशन्स, टीमशी संबंधित उत्पादने आणि सेवा यांची विक्री यांबाबत, तुम्ही हे मिळवण्यासाठी स्पष्टपणे विनंती केलेली नसल्यास तुम्हाला माहिती देण्यासाठी.
- नियंत्रणात बदल:
- आयएसपीएलची मालकी किंवा नियंत्रण बदलणार असल्यास तुमची वैयक्तिक माहिती हस्तांतरित केली जाऊ शकते. अशा हस्तांतरणामुळे तुमच्या वैयक्तिक माहितीच्या वापरात प्रत्यक्ष बदल झाल्यास तुम्ही असे हस्तांतरण परवानगी देण्यासाठी कोणते पर्याय नाकारायचे याबाबत आम्ही तुम्हाला सूचना देऊ.
- अचूकता:
- तुम्ही आम्हाला दिलेल्या वैयक्तिक माहितीच्या मर्यादेत आम्ही अचूक आणि विद्यमान वैयक्तिक माहिती राखण्यास इच्छुक आहोत. आम्ही तुमच्याकडून आमच्या वेबसाइटवर वैयक्तिक माहिती देऊ तेव्हा तुम्हाला ती वैयक्तिक माहिती अद्ययावत किंवा दुरूस्त करण्याची गरज असल्यास कृपया खाली दिलेल्या इमेल पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधा आणि आमच्याकडे असलेल्या वैयक्तिक माहितीतील बदल लवकरात लवकर समाविष्ट करण्यासाठी आम्ही आवश्यक ते प्रयत्न करू.
- आमच्याकडे सध्या असलेली तुमची माहिती अद्ययावत किंवा दुरूस्त करायची असल्यास किंवा प्राप्त करायची असल्यास तुम्ही आम्हाला येथे इमेल पाठवू शकता- info@mumbaiindians.com. आम्ही तुमचा इमेल प्राप्त झाल्यावर चौदा (१४) दिवसांत माहिती पाठवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करू.
- संमती; दुरूस्ती; कायदा
- या वेबसाइटचा वापर करून तुम्ही या गोपनीयता धोरणाच्या अटींना तसेच वर नमूद केलेल्या उद्दिष्टांसाठी तसेच पद्धतीने वैयक्तिक माहितीचा वापर आणि व्यवस्तापनासाठी संमती देत आहात. सदर गोपनीयता धोरणात बदल झाल्यास आम्ही हे बदल आमच्या वेबसाइटवर योग्य त्या कालावधीसाठी दिसेल अशा ठिकाणी पोस्ट करून तुमच्या नजरेत येतील याची पुरेशी काळजी घेऊ.
- तुमची भेट आणि गोपनीयतेबाबत कोणत्याही प्रकारचा वाद असल्यास तो या गोपनीयता धोरणाच्या सापेक्ष आहे. सदर गोपनीयता धोरणाचे प्रशासन आणि कार्यान्वयन भारतीय प्रजासत्ताकाच्या कायद्यांनुरूप केले जाईल. तसेच तुम्ही याद्वारे निर्विवाद आणि कधीही रद्द न होणारी मान्यता देत आहात की भारतातील मुंबई येथील न्यायालयांना या गोपनीयता धोरणातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विवादाशी संबंधित खटले चालवण्याचा विशेषाधिकार असेल.