
“विजयाची भावना आनंददायी आहे; २०१७ चा पराभव जिवाला लागला होता”: भारताने इतिहास रचल्यानंतर हार्दिक आणि इतरांची
विजय. डान्स. आनंद. मिठ्या. इतिहास! आपण भारताचा ऐतिहासिक चॅम्पियन्स ट्रॉफीमधला विजय साजरा करण्यासाठी फटाके फोडायला जात असताना आपल्याला विजय मिळवून दिल्याबद्दल इतर खेळाडूंना काय म्हणायचे आहे ते ऐकूया..
रोहित शर्मा| सामनापटू| विजयी कर्णधाप: “खूप छान वाटते आहे. आम्ही या संपूर्ण स्पर्धेत खूप चांगले क्रिकेट खेळलो. आता हा निकाल आमच्या बाजूने लागलाय त्याचा खूप आनंद वाटतोय. आम्ही ज्या प्रकारे खेळलो त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. हा माझा नैसर्गिक खेळ नाही परंतु मला हे करायचेच होते. तुम्ही काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला टीमचा पाठिंबा लागतो. ते माझ्यासोबत होते. २०२३ वर्ल्डकपमध्ये राहुल भाई आणि आता गौती भाई. मी वेगळ्या स्टाइलमध्ये मागची अनेक वर्षे खेळलो आहे आणि थोडे वेगळे खेळून काही परिणाम साधता येतो का हे मला पाहायचे होते.”
शुभमन गिल: “खूप मस्त वाटतेय. जवळपास बराचसा वेळ मी मागे बसून रोहितच्या फलंदाजीचा आनंद घेत होतो. आम्ही एकमेकांशी बोलत होतो आणि ही भागीदारी आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. तो मला म्हणाला तू कितीही चेंडू मागे राहिला असलास तरी त्याने फरक पडत नाही. फक्त धावफलकाकडे बघत राहा आणि तुला शेवटपर्यंत खेळायचे आहे. खूप समाधान वाटते आहे. २०२३ मध्ये आम्ही शेवटच्या सामन्यात हरलो होतो. आता ही स्पर्धा जिंकणे ही अप्रतिम भावना आहे. इंग्लंडविरूद्ध ओडीआय सुरू करून सलग आठ ओडीआय जिंकणे ही स्वप्नवत बाब आहे.”
विराट कोहली: “खूप मजा आली. ऑस्ट्रेलियाचा दौरा कठीण झाला होता. त्यामुळे आम्हाला पुनरागमन करायचे होते आणि त्यासाठी मोठी स्पर्धा हवी होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. इतक्या चांगले खेळणाऱ्या तरूणांसोबत खेळताना बरेच काही शिकायला मिळते. ड्रेसिंग रूममध्ये इतके टॅलेंट आहे आणि ते भारतीय क्रिकेटला योग्य दिशेने नेत आहेत. आम्हाला एकमेकांशी अनुभव सांगताना आणि संधी मिळेल तेव्हा प्रभाव टाकताना (वरिष्ठांची जबाबदारी) मजा येते पण हे तरूण अत्यंत वेगाने प्रगती करत आहेत. त्यामुळेच आम्ही एक शक्तिशाली टीम आहोत.”
कुलदीप यादव: “आम्ही ४ स्पिनर्सना खेळवतोय हे सांगणे सोपे आहे. परंतु चार स्पिनर्सना मैदानात सांभाळणे कठीण असते. रोहितने ज्या प्रकारे गोष्टी हाताळल्या ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. फलंदाजाला वाचणे, कोणता फलंदाज कोणत्या परिस्थितीत वर येईल, मग कोणी कधी गोलंदाजी करायची हे ठरवण्यासाठी खूप नियोजन लागते. हे एकाच दिवसात होत नाही.”
श्रेयस अय्यर: “खूप चांगली भावना आहे ही. मला काही सुचत नाहीये. शब्दांत सांगणे कठीण आहे. ही माझी पहिली आयसीसी ट्रॉफी आहे. आणि माझ्याकडे व्यक्त व्हायला शब्द नाहीत. सगळ्यांची कामगिरी खूप उत्तम होती. खूप मजा आली. खरे सांगायचे तर मला तणावाखाली खेळायला आवडते. माझा खेळ तणावाखाली बहरतो असे मला वाटते. मी या परिस्थितीतून आधीही गेलो आहे आणि विजयात योगदान देताना मला खूप आनंद वाटला.”
हार्दिक पांड्या: “आयसीसी स्पर्धा आणि विशेषतः चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. २०१७ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला होता. आम्ही त्या वेळी जिंकू शकलो नाही. आता या वेळी सर्वांचे योगदान खूप महत्त्वाचे होते.”
केएल राहुल: “मी हे कॅमेऱ्यासमोर बोलू शकतो की नाही माहीत नाही. पण मी खूप तणावाखाली होतो. आमच्याकडे आणखी काही फलंदाज येणारे होते. पण मला टेंशन आले होते. अशा परिस्थितीत शांतता आणि संयम राखणे खूप महत्त्वाचे असते. मी पाचपैकी तीन सामन्यांमध्ये (या सीटीमध्ये) अशा परिस्थितीत खेळलो आहे आणि एका सामन्यात मला पाकिस्तानविरूद्ध फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. शब्दांत सांगणे कठीण आहे. आमचे कौशल्य आणि लहानपणापासून आम्ही ज्या प्रकारे क्रिकेट खेळलो त्यात खूप आव्हानांचा सामना करावा लागला. आम्हाला बॅट हातात पकडल्यापासून प्रोफेशनल क्रिकेटपटू बनण्याचा निर्णय घेतानाही तणावाचा सामना करावा लागला. बीसीसीआयने आम्हाला ज्या प्रकारे तयार केले आणि देशांतर्गत क्रिकेटने प्रशिक्षित केले आहे त्यातून आम्हाला अशा परिस्थितीत ताण हाताळणे आणि उत्तम कामगिरी करणे शक्य झाले आहे.”