पहिल्या १७ दिवसांचे आयपीएल २०२४ चे वेळापत्रक- चार एमआय सामन्यांच्या तारखा लिहून ठेवा!
शिट्ट्या बाहेर काढा. सायरन वाजवा. ढोल ताशे झांजा तयार ठेवा आणि दुनिया हिला देंगे हम असा जल्लोष करायला सज्ज राहा. कारण आयपीएल २०२४ चे वेळापत्रक आले आहे. त्यामुळे, पलटन तुमचे कॅलेंडर्स काढा आणि ब्लू आणि गोल्डमध्ये रंगण्यासाठी तयारी करा. समर स्लॅम सुरू होतोय!!
आपण नवीन तयारीने सज्ज होऊन सहाव्या अजिंक्यपदासाठी तयार होत असताना कॅलेंडरवर खुणा करायला विसरू नका. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे. आयपीएलने सध्या पहिल्या फक्त १७ दिवसांचे सामने (२१ सामने) जाहीर केले आहेत. त्याचे कारण आहे भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका आणि त्या होतील एप्रिल आणि मे २०२४ मध्ये. त्यामुळे चला तर माहिती बघूया.
आपला पहिला प्रतिस्पर्धी कोण आहे? आपण नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सला टक्कर देणार आहोत. तारीख? २४ मार्च.
आपल्या घरच्या खेळपट्टीवरचा पहिला सामना? वानखेडे स्टेडियमवर म्हणजे आपल्या बालेकिल्ल्यात १ एप्रिल रोजी आपण राजस्थान रॉयल्सना आमंत्रित करतोय.
आयपीएल २०२४ च्या पहिल्या १७ दिवसांत मुंबई इंडियन्सचा प्रवास:-
दिनांक |
वेळ (आयएसटी) |
प्रतिस्पर्धी |
स्थळ |
२४ मार्च २०२४ |
सायं. ७.३० |
गुजरात टायटन्स |
अहमदाबाद |
२७ मार्च २०२४ |
सायं. ७.३० |
सनरायझर्स हैदराबाद |
हैदराबाद |
१ एप्रिल २०२४ |
सायं. ७.३० |
राजस्थान रॉयल्स |
मुंबई |
April 7, 2024 |
सायं. ३.३० |
दिल्ली कॅपिटल्स |
मुंबई |
हार्दिक ‘कुंग फू’ पांड्याच्या नेतृत्वाखालील रोहित ‘हिटमॅन’ शर्मा, आपला दादा सूर्या आणि जसप्रीत बूम बूम बुमरा यांच्यासोबत आमची मुंबई तुम्हाला अत्यंत अटीतटीचे क्रिकेट आणि मनोरंजन देण्यासाठी सज्ज आहे.
चला पलटन, कमेंट्समध्ये तुमचे प्रेम आणि उत्साहाचा पाऊस पाडा आणि तुमच्या आवडत्या टीमला पाहण्यासाठी तुम्ही तुमची लाडकी जर्सी घालून कुठे आणि कसे जाणार आहात ते सांगा.