News

कायरन पोलार्डः एका दिमाखदार आंतरराष्ट्रीय करियरचा समारोप

By Mumbai Indians

कायरन पोलार्डकडे एक सिक्सरवर सिक्सर फटकावणारा पॉवरहाऊस म्हणून पाहिले जाते.

त्याने २० जून २००८ मध्ये वेस्ट इंडिजच्या संघासाठी टी२० चा पहिला सामना खेळला. परंतु त्याला टी २० करियरच्या पहिल्या तीन सामन्यांत त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.

तो चौथ्या टी २० सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी गेला तेव्हा तो ट्रॅकमधून पुढे आला आणि अत्यंत सहजपणे ऑफ स्पिनर जीतेन पटेलच्या त्याला आलेल्या पहिल्याच चेंडूवर मिड ऑफवर षटकार ठोकला.

एवढ्या वर्षानंतर आता पॉलीची खेळण्याची ही स्टाइल सर्वांच्या परिचयाची झाली आहे. त्याला विकेटवर सेटल होण्यासाठी किंवा तिचा अभ्यास करण्याची गरज नाही. त्याच्याकडे सरळ हल्ला करण्याची युक्ती होती. त्यामुळेच तो या पिढीतल्या व्हाइट बॉल क्रिकेटच्या सर्वांत महान खेळाडूंपैकी एक ठरला आहे.

२० एप्रिल २०२२ रोजी पॉलीने आता आपण १५ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.

टी २० वर्ल्ड कप ट्रॉफी, ३२४ सामन्यांमध्ये ४२७५ धावा आणि ९७ विकेट्स आणि त्यातील ६३ सामने कर्णधार म्हणून खेळले आहे. त्याच्या या उत्तुंग करियरवरून हा खेळाडू वेस्ट इंडिजसाठी किती महान होता हे दिसून येते.

पॉलीने वेस्ट इंडिजसाठी तीन शतके झळकवली. ही तिन्ही शतके त्याने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात काढली असून त्यातील पहिले शतक त्याने भारताविरूद्ध ११ डिसेंबर २०११ रोजी काढले.

२६८ चे लक्ष्य साध्य करताना विंडीज ३६-४ वर धडपडत होते. त्यावेळी सहाव्या क्रमांकावर पॉली आला आणि त्याने ११० चेंडूंमध्ये ११९ धावा टोलवल्या.

दुसऱ्या ठिकाणी आपले जोडीदार बाद होत असतानाही त्याने हल्ला कायम ठेवला आणि विंडीजचा स्कोअर २३३ वर नेला. या वेळी तो शेवटची विकेट म्हणून आऊट झाला.

विंडीजसाठी २०१२ मध्ये टी२० वर्ल्ड कप विजयातून आपण त्याला कधीही विसरू शकत नाही हे सिद्ध झाले आहे.

पॉली या मालिकेत उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरूद्ध मैदानात उतरला. तो १६ व्या ओव्हरमध्ये १४० धावा आणि ३ विकेटनंतर खेळायला आला. त्याने १५ चेंडूंमध्ये धमाकेदार ३८ धावा काढल्या आणि तो शेवटच्या चेंडूवर बाद होईपर्यंत त्याने विंडीजला २०५ धावांपर्यंत नेले होते.

त्याने त्यानंतर एका ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. परंतु त्या ओव्हरमध्ये त्याने २९ चेंडूंमध्ये ६३ धावा काढणाऱ्या धोकादायक जॉर्ज बेलीला आणि त्याच ओव्हरमध्ये पॅट कमिन्सला बाद केले. त्यानंतर विंडीज अंतिम फेरीत पोहोचले आणि त्यांनी ही ट्रॉफी जिंकली.

नॅशनल टीममध्ये प्रवेश झाल्यानंतर सहा वर्षांनी पॉलीने त्यांचा नियमित कर्णधार ड्वायने ब्रावोला जांघेत इजा झाल्यानंतर किंग्स्टन येथे भारताविरूद्ध आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचे कर्णधारपद भूषविले. त्याने सुरूवातच विजयाने केली. विंडीजने हा सामना एका विकेटने जिंकला.

पॉलीने २०१९ मध्ये प्रथमच टी २० सामन्यात विंडीजचे कर्णधारपद भूषविले. त्याने हा सामना ३० धावांनी जिंकला. त्याने ३२ धावा काढल्या आणि तीन ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतल्या.

पॉलीने ४ मार्च २०२१ रोजी आणखी एक विक्रम नोंदवला. तो एका ओव्हरमध्ये सहा षटकार ठोकणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा खेळाडू ठरला.

अकिला धनंजयने हॅटट्रिक विकेट घेतल्यानंतर तो ५ व्या क्रममांकावर आला. सहाव्या ओव्हरमध्ये धनंजय आणखी विकेट्स काढण्याच्या तयारीने आला.

परंतु पॉलीने त्याला सीमारेषेपार रस्ता दाखवला. त्याने सलग सहा चेंडूंना सीमापार टोलवले आणि जागतिक क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले.

त्याने ६ फेब्रुवारी २०२२ रोजी विंडीजसाठी भारताविरूद्ध टी२० चा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना एक कर्णधार म्हणून खेळला. त्यानंतर त्याने २० एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून आपली निवृत्ती जाहीर केली.

हे साधारण दीड शतकांचे सुंदर, देखणे करियर होते. आम्ही तुला मिस करू, पॉली!