
सामन्याचे पूर्वावलोकन RR vs MI- थोड्या आरामानंतर आशेचा किरण पुन्हा जागृत
वानखेडे स्टेडियमवर एलएसजीविरूद्ध खेळल्यानंतर सहा दिवसांनी आम्ही ३० एप्रिल रोजी डी वाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरूद्ध खेळत असल्यामुळे आता आणखी एक सामन्याचा दिवस आला आहे.
हा सामना खूप कठीण असणार आहे कारण आरआरने मागील पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत आणि ते अंकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
आरआरने आम्हाला या सीझनमध्ये सुरूवातीच्या सामन्यात हरवले होते.
परंतु आकडेवारीमुळे आम्हाला थोडासा फायदा मिळेल कारण आम्ही २५ पैकी १३ सामने जिंकले आहेत आणि आरआरने इतर १२ सामने जिंकले आहेत.
आम्ही रॉयल्सविरूद्ध आमच्या मागील पाच सामन्यांमध्ये ३-२ चे रेकॉर्डही ठेवले आहे.
या खेळाडूंकडे लक्ष ठेवा
ओपनर जोस बटलर या सीझनमध्ये उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने तीन शतकी खेळ्या केल्या असून त्यातील एक आमच्याविरूद्ध आहे आणि सध्या त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे.
स्पिन ट्विन्स यजुवेंद्र चहल आणि रवीचंद्रन अश्विन हे आरआरसाठी सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहेत. चहलकडे पर्पल कॅप आहे तर अश्विनने खूप कमी धावा देऊन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत धावांचे योगदानही दिले आहे.
आमच्यासाठी तिलक वर्मा हा सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने दोन अर्धशतके झळकवली असून इतर सामन्यांमध्ये सुंदर खेळही केला आहे.
बूमची कामगिरीही चांगली आहे. त्याने आपल्या यॉर्कर्स आणि स्विंगद्वारे प्रतिस्पर्धी फलंदाजांवर चाप लावला आहे. त्यामुळे त्याच्याविरूद्ध ते फारसा धोका पत्करत नाहीत.
आगामी टप्पे
कर्णधार रो ला आमच्यासाठी २०० षटकार पूर्ण करण्यासाठी एका हिटची गरज आहे.
बूमने सध्या आरआरविरूद्ध १७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने काही विकेट्स घेतल्या तर आरआरविरूद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा खेळाडू ठरेल.
स्कायला आमच्यासाठी टाटा आयपीएलमधील २००० धावा पूर्ण करण्यासाठी २८ धावांची गरज आहे.
टीम या लहानशा ब्रेकनंतर ताजीतवानी झाली असेल. आणि आपणही झालोय. तर पलटन, आपल्या पोरांना दिलखुलासपणे पाठिंबा देऊया!