ही पाहा!: आयपीएल २०२४ साठी मुंबई इंडियन्सची जर्सी आली आहे!
खेळ आणि स्टाइल या दोन्ही गोष्टी सहजपणे एकत्र आल्या आहेत. मुंबई इंडियन्स आणि स्केचर्स यांनी २०२४ सीझनसाठी ख्यातनाम डिझायनर मोनिषा जयसिंग यांनी डिझाइन केलेली जर्सी आणली आहे. टीम आणि तिचा चाहतावर्ग असलेल्या पलटन यांच्यामधील अतूट नात्याचे प्रतिबिंब असलेली ही जर्सी मुंबईची जिगर दर्शवणारा मुंबई इंडियन्सचा अभिमान आणि डिझाइनने युक्त आहे. अधिकृत मेन्स मॅच जर्सी २०२४ आणि अधिकृत मेन्स रिप्लिका जर्सी २०२४, इतर विविध प्रकारच्या उत्पादनांसह एमआय शॉपवर उपलब्ध आहे.
मुंबई इंडियन्सच्या खास ब्लू अँड गोल्ड या दोन्ही रंगांची उधळण असलेल्या या जर्सीची निर्मिती जयसिंग यांनी सातत्यपूर्ण वचनबद्धता आणि तग धरून ठेवण्याची क्षमता यांना चिन्हांकित करण्यासाठी केली आहे. या डिझाइनमध्ये एम हे आद्याक्षर आर्ट डेको स्वरूपात ग्रिड पद्धतीमध्ये कोरण्यात आले आहे आणि रॉयल ब्लू रंगाच्या शेड्सच्या पातळ आणि जाड रेषांनी पॅटर्न तयार केला गेला आहे. अत्यंत अचूक आणि नीटनेटकी भौमितिय रचना यात दिसते. रॉयल ब्लू हा रंग आत्मविश्वास आणि ताकदीची ओळख आहे. पण जयसिंग यांनी करूणा आणि आपसातील अवलंबित्व दर्शवण्यासाठी इम्पिरियल ब्लू रंगाचा वापर केला आहे. या सर्व भावना मुंबई इंडियन्स आणि तिच्या चाहत्यांसाठी खऱ्या ठरतात. त्यासोबत जर्सीच्या दोन्ही बाजूंना रेसिंग ग्राफिकच्या माध्यमातून गोल्ड रंगाची पट्टी देण्यात आली आहे. तिचा अर्थ सूर्याची ऊर्जा आणि शक्ती असा आहे. याचाच अर्थ असा की आमच्या चॅम्पियन खेळाडूंचे शरीर मजबूत आहे.
या अनावरणाबाबत बोलताना मुंबई इंडियन्सचे प्रवक्ते म्हणाले की, “आमचे खेळाडू ब्लू आणि गोल्ड जर्सीचे रंग परिधान करतात तेव्हा आमच्या एमआय पलटनच्या आशा आणि स्वप्नेदेखील परिधान करतात. त्याला मुंबई मेरी जानच्या ऊर्जेने भारून टाकलेले असते. ही जर्सी गौरवाचे प्रतीक आहे, परिधान करणाऱ्या सर्वांसाठी तो एक अभिमान आहे कारण ते आपल्यासोबत या टीमचा एक प्रतिभाशाली वारसा सोबत नेत असतात आणि टीमप्रति प्रेम दाखवत असतात.”
डिझायनर मोनिषा जयसिंग म्हणाल्या की, “मुंबई आणि एमआयची ऊर्जा कायमच बळकट असते आणि त्यात तिच्या आवडत्या टीमला आणि चाहत्यांना आकर्षित करणारी अथांग शक्ती, वैविध्यपूर्णता, आशावाद, हृदय आणि मेहनत या सर्व गोष्टींचा समावेश आहे. मी याच गोष्टीला या डिझाइनमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मला खेळाडू आणि चाहते या दोघांनाही प्रेरित करायचे होते कारण मुंबईचे आणि मुंबई इंडियन्सचे काळीज त्यात वसलेले आहे.”
मुंबई इंडियन्सची चाहत्यांची आर्मी असलेल्या एमआय पलटनला आपल्या बालेकिल्ल्यावरून म्हणजे वानखेडे स्टेडियमवरून आपल्या टीमचा उत्साह वाढवण्याची संधी मिळेल. या जर्सीच्या अनावरणाबरोबरच एमआयने सर्व वयोगटातील चाहत्यांसाठी आपली मेंबरशिप पॅकेजेस आणली आहेत. मेंबरशिप गोल्डसाठी २१९९ रूपये, सिल्वहरसाठी ६९९ रूपये आणि ज्युनियर पॅकेजसाठी ६९९ रूपये आहे. सदस्यांना घरच्या खेळपट्टीवरील तिकिटे लवकर उपलब्ध होतील, विशेष मर्चंडाइजवर सवलती मिळतील, कार्यक्रमांना उपस्थित राहता येईल आणि एमआय फॅमिलीकडून खास कंटेंट उपलब्ध होईल.
चाहत्यांसाठीची तिकिटे ६ मार्च २०२४ रोजी खुली होतील. मुंबई इंडियन्स आपला घरच्या खेळपट्टीवरील पहिला सामना १ एप्रिल २०२४ रोजी खेळेल.