
षट्कारांचा राजा “विक्रमादित्य” – रोहित शर्मा!!!
हिटमॅन आणि त्याचे विक्रम अक्षरशः हातात हात घालून जातात! 🤝
रोहित शर्माच्या चमकदार नावाभोवती कामगिरीचे एक वलय आहे आणि त्याने मुंबई इंडियन्स खेळाडूकडून सर्वाधिक षट्कार मारण्याची नोंद करून आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. 🚀 त्याने टाटा आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरूद्ध सामना जिंकून देणारी कामगिरी करताना हा महत्त्वाचा टप्पा पार केला.
𝗦𝗔𝗟𝗔𝗔𝗠 𝗥𝗢𝗛𝗜𝗧 𝗕𝗛𝗔𝗜 🫡🔥#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #SRHvMI pic.twitter.com/MT6CzBlv9q
— Mumbai Indians (@mipaltan) April 23, 2025
त्याने षट्कार मारणे किती सोपे असते हे दाखवून देताना कायर पोलार्डच्या डोक्यावरून अत्यंत जबरदस्त फटका मारला. आपला तात्या नक्कीच आनंदाने हसत असणार आहे! 😇
त्याच्या खास पुल शॉट्सपासून त्या सुंदर लोडेड ड्राइव्ह्जपर्यंत रोहितने वानखेडेवरील आणि मुंबईवरील आकाश फटक्यांच्या आतषबाजीने प्रकाशमान केले आहे. परिस्थिती कठीण असो किंवा पॉवरप्लेची पार्टी असो, हिटमॅनवर आपण आकाशात फटके मारण्यासाठी डोळे मिटून विश्वास ठेवायचा! 🔥
ब्लू अंड गोल्डमध्ये तो जेव्हा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा फक्त आकडेवारीपेक्षाही त्याचा नैसर्गिक खेळ आणि क्लास त्याचा हा विक्रम आणखी खास बनवतो.
तर, मग भरपूर टाळ्यांचा कडकडाट, व्हर्चुअल ढोल आणि भरपूर प्रेम या आपल्या एकमेवाद्वितीय, “विक्रमादित्य” रोसाठी! 👏 आम्हाला अजून हवेत…
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षट्कार
खेळाडू |
इनिंग |
षट्कार |
रोहित शर्मा* |
२२५ |
२६० |
कायरन पोलार्ड |
१९३ |
२५८ |
सूर्यकुमार यादव* |
१०५ |
१२९ |
हार्दिक पांड्या* |
१०३ |
११५ |
ईशान किशन |
८४ |
१०६ |
अंबाती रायाडू |
१२७ |
८४ |
तिलक वर्मा* |
४५ |
६८ |
क्विंटन डे कॉक |
४३ |
५४ |
हरभजन सिंग |
९९ |
४९ |
टिम डेव्हिड |
३४ |
४६ |
*मुंबई इंडियन्सचे विद्यमान खेळाडू